शेवगा लागवड Sevga lagawad हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात वमहाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते.याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे.
हवामान
शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते.उष्ण भागात सहज फुले येतात. तसेच या वनस्पतीला जास्त पाणीही लागत नाही. त्याची लागवड थंड भागात क्वचितच केली जाते कारण त्याची वनस्पती अत्यंत थंडी आणि दंव सहन होत नाही. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४०डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.
शेवगा लागवडीसाठी जमीन
शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.शेवग्याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. उदाहरणार्थ, पडीक, नापीक आणि कमी सुपीक जमिनीतही त्याची लागवड करता येते. कोरड्या चिकणमाती किंवा चिकणमाती असलेल्या जमिनीत ते चांगले वाढते. त्याच्या रोपाला उष्ण भागात सहज फुले येतात.
शेवगा लागवडीचा कालावधी
- जून ते जुलैमध्ये पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याच वेळी लागवड करावी.
- फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे.
- लागवडीनंतर ६ ते ७ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन किंवा ठिबक सींचनाने झाडे जगवावीत.
शेवगा लागवडीसाठी किती अंतर असावे
शेवगा लागवड Sevga lagawad हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात.लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे.
जर एका वर्षाकरिता करायची असेल
शेवगा लागवड जर एका वर्षाकरिता करायची असेल तर घन लागवड म्हणजे ६६ फुट ते ८ x ६ फुट अंतर ठेवावे. अशा लागवडीमध्ये पुढील वर्षी एक आड एक झाड कमी करून दुबार व तिबार पिके घेता येतात, जमिनीच्या प्रकारानुसार शेवगा पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी ८x ८ किंवा १० x १० फूट अंतर ठेवून एकरी ६८० ते ४३५ रोपे असणे गरजेचे आहे.
शेवगा लागवडीनंतर घ्यावयाची काळजी
1) झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावी. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी.म्हणजेच तणांचा उपद्रव होणार नाही.
2) प्रत्येक झाडास 10 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र,( 165 ग्रॅम युरिया ), 50 ग्रॅम स्फुरद,( 312 ग्रॅम सुपर फॉस्फेट) व 75 किलो पालाश ( 120 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ) द्यावे.
3) शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणे अवघड जाते.
शेवग्याची छाटणी कधी करावी
शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे सहा महिन्यात शेंगा येण्यास सुरूवात होते म्हणून सुरूवातीस वळण देणे गरजेचे आहे. वळण देणे जर व्यवस्थित व वेळीच केले नाही तर झाड उंच वाढून शेंगा काढणे अवघड होईल. यासाठी लागवडीनंतर अडीत ते तीन महिन्यात झाडांची उंची ५ ६ फुटांपर्यंत वाढते
1) लागवडीनंतर साधारण पणे 3 ते 4 महिन्यानंतर व झाडांची उंची 3 ते 4 फुट झाल्यानंतर वरून अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा. त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या 3 ते 4 फुटाच्या खाली आल्याने शेंगा काढणीस सोपे जाते.
2) लागवडीपासून 6 ते 7 महिन्यात शेंगा तोडणीस येतात. त्यानंतर 3 ते 4 महिने शेंगाचे उत्पादन मिळते.
3) एक पीक झाल्यानंतर पुन्हा झाडांची छाटणी करून झाडास योग्य तो आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा
3 ते 4 फूट ठेवून बाजूच्या फांद्या साधारणत: 1 ते 2 फूट ठेवाव्यात
फांद्याची जोमदार वाढ झाल्याने भरपूर फुले येतात, छाटणी तंत्राअंतर्गत फळ काढणीनंतर शेवम्याचे पाणी देणे काही काळ बंद कराये, नंतर प्रत्येक मुख्य फांदी एक ते दोन फुटावरून करवतीने कापावी (छाटावी) त्यामुळे प्रत्येक फांदीवर अनेक नवीन फांद्या येतात, अशाप्रकारे ओलीताखालच्या शेवगा झाडाची कापणी (छाटणी) शक्यतो एप्रिल महिन्यातच करावी. झाडांवर जेवढ्या
शेवगा मधील आंतरपीक
1) आंबा, चिकू, लिंबू, जांभूळ, आवळा, चिंच व सीताफळ या भागांमध्ये पहिले 5 ते 6 वर्षे आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.
2) शेवग्याची लागवड सलग पद्धतीने केल्यास त्यामध्ये खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, हुलगा अशा कडधान्यांची व रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता वाढून आंतरपिकाचे उत्पादन मिळते.
3) मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड करावयाची असल्यास व पाण्याची उपलब्धता असेल तर नगदी पिके सुद्धा घेणे फायद्याचे ठरते.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे
1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
2)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
3)नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
4)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
5)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.
6)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.
7)शेवग्या ची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.
8)ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.
9)शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात.
शेवगाच्या सुधारित जाती
.
१) जाफना –
हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.
२) रोहित-१ –
या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात.
३) कोकण रुचिरा –
हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केला आहे. झाडाची उंची ५ ते १६ मीटर. या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाचे असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते.
४) पी. के. एम. १ –
हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत.
१) रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात.
२) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात.
३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात.
४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही.
५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात.
६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
५) पी. के. एम. २ – हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे.
हे पण वाचा
SBI स्त्री शक्ती कर्ज योजना 2023
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023
अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट
शेवगा वरील किट पादुर्भाव
या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु, काही वेळा जून ते ऑगस्ट महिन्यात पानांची गळ होते. खोड व फांद्यांवर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोेपे मरतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा बोर्डोमिश्रण (०.२५%) फवारावे.
- बड वर्म ( नूरदा शेवगा)
- लीड सुरवंट ( Noordablitealis )
- केसाळ सुरवंट ( Eupterotemollifera )
- पॉड फ्लाय ( गिटोना भेदभाव )
- बार्क कॅटरपिलर ( इंदरबेला टेट्राओनिस )
शेवगा काढणी व उत्पादन
Sevga lagawad लागवडीपासून सुमारे ६ ते ७ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागदाच्या गोणपाटात गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. एका वर्षानंतर दरवर्षी एका चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात.
FAQ
मी प्रति एकर किती शेवगा झाडे लावू शकतो?
5 बाय 12 फूट अंतरावर एकरी 700 ते 750 शेवगा रोपे लावता येतात.
शेवग्याच्या झाडाचे आयुष्य किती असते?
ते सुमारे 10 ते 12 वर्षे जगू शकते आणि या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
शेवगा वाढण्यास किती वेळ लागतो?
शेवगा लागवडीच्या कालावधीपासून पहिल्या कापणीपर्यंत पोहोचण्यासाठी 6 महिने लागतात.
शेवगा लागवड अंतर किती असावे?
2 शेवगा रोपांमध्ये 5 फूट अंतर आणि ओळीपासून ओळीच्या अंतरासाठी 12 फूट.
शेवगा शेतीसाठी किती पाणी लागते?
शेवगा लागवडीसाठी कमी पाणी लागते, काळ्या जमिनीत आठवड्याला 1 पाणी पुरेसे आहे.