नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल बळीराजामध्ये आपले स्वागत आहे राज्यात पुढील दहा दिवस म्हणजेच दिनांक 24 एप्रिल ते दोन मे पर्यंत विजा गारपीट वारे यासह मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी दिलेला आहे. पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे त्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी मेघ गरजने नुसार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची दखल घ्यावी.
24 एप्रिल ते 2 मेपर्यंत राज्यामध्ये येणारा पाऊस
आपल्या राज्यात दिनांक २४ एप्रिल ते २ मे च्या दरम्यान पाऊस,वादळ वारा, वीजा,गारपीठ होणार असून शेतकऱ्यांनी आपली तसेच पशू प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.
- उत्तर महाराष्ट्रात दिनांक २२,२६,२७,२८,२९,३० या दिवशी भाग बदलून वीजा, वादळ वारा,तसेच गारपीटही होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
- पूर्व विदर्भात दि.२१,२२,२३,२४,२५,२६,२८,२९ रोजी काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
- दक्षिण व पश्चिम :-महाराष्ट्रातील काही भागात २६,२७,२८,२९,३० या दिवशी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस होईल.
- मराठवाड्यातील काही भागात २५,२६,२८,२९,३० रोजी भाग बदलून अवकाळी पाऊस पडेल. www.digitalbaliraja.com
वरील अंदाज हा वातावरणाचा अभ्यास करून वर्तविला असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.शेवटी तो अंदाज आहे वाऱ्याची दिशा बदलली की वेळ,ठिकाण दिशा बदलते हे लक्षात असावे.