मिरची लागवड

बाजारात हिरव्या मिरच्यांची वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची होत असते. महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. मिरची मध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मिरचीचा संतुलित आहारात समावेश केला जातो. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरची महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो.

मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो. मिरची हे हमखास नफा देणारे पिक मानले जाते. मिरचीची मागणी वर्षभर असते. मिरचीमध्ये नवनवीन सुधारित वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरुन मिरचीच्या जातीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे तिखट व मसाल्यासाठी वापरण्यात येणार्‍या जाती. या लांब, तिखट, हिरबी किंबा वाळलेली मिरची म्हणून उपयोगात आणतात. या प्रकारामध्ये संकेश्बरी, पुसा ज्वाला, एन.पी. ४६,पंत सी – १, फुले ज्योती जी-४ यांचा समावेश होतो. दुसरा प्रकार म्हणजे भाजीसाठी वापरण्यात येणारी ढोबळी मिरची.

 

मिरचीसाठी अनुकूल हवामान कोणते ?

मिरची साठी उष्ण किंवा दमट हवामानात अनुकूल असते. अश्या हवामानात मिरचीचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते. मिरचीची लागवड ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने फुलांची गळ जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पाने व फळे कुजण्याची शक्यता असते. मिरचीची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादन ही भरपूर प्रमाणात निघते. मिरची पिकाच्या बियाण्यांची उगवण ही १८ ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम प्रकारे होते.

मिरची लागवडीसाठी आवश्यक जमीन

मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये मिरचीचे पीक अतिशय चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.

मिरची लागवड व खत व्यवस्थापन :-

मिरचीलागवड खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी. तर उन्हाळी मिरची पिकाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.
उंच आणि पसरट वाढणार्‍या मिरचीच्या जातींची लागवड 30 लांबी आणि 60 रुंदी सेंटीमीटर अंतरावर आणि बुटक्या जातींच्या मिरचीची लागवड 60 लांबी आणि 40 रुंदी सेंटीमीटर अंतरावर करावी . कोरडवाहू मिरची पिकाची लागवड करताना 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. मिरचीच्या रोपांची सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. ही रोपे गादी वाफ्यातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे दहा लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोफॉस 60 टक्‍के प्रवाही आणि 25 ग्रॅम डायथेनम 45 आणि 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावेत.

मिरची लागवडीसाठी जमिनीची मशागत

लागवड करण्याआधी जमिनीची चांगली आडवी उभी नांगरट करून घ्यावी. नांगरणी नंतर रोटरच्या मदतीने जमीन भुसभुशीत करून घ्यावी. नांगरणी करण्याआधी जमिनीत दहा ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. ठिबकवर लागवड करायची असल्यास साडेचार ते पाच फुटावर बेड टाकून घ्यावे. आणि त्यावर ठिबक मल्चिंग अंथरून घ्यावे.

मिरचीच्या रोपांच्या लागवडी नंतर पहिली खुरपणी 20 ते 25 दिवसांनी करावी.
त्यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
खरीप मिरचीला लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी.
मिरची पिकाच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर दोन महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

मिरची जाती

  1. पुसा ज्वाला
  2. पंत सी एक
  3. संकेश्वरी 32
  4. जी- 2, जी- 3, जी- 4, जी- 5
  5. मुसळवाडी
  6. पुसा सदाबहार

 

पाणी व्यवस्थापन : पाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार वा मगदूर, पाऊसमान, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.

 

मिरचीवर पडणारे रोग आणि उपाय:-

मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.

फळे कुजणे आणि फांद्या वाळणे : ( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.

उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

भुरी ( पावडरी मिल्‍डयू ) : भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

किड :– फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.

उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी

प्रति हेक्टर मिरचीचे उत्पादन किती निघते ?

बागायती हिरव्‍या मिरच्‍यांचे उत्पादन हेक्‍टरी ८०-१०० क्विंटल मिळते. तर कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन ६ ते ७ क्विंटल येते.
वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन ९-१० क्विंटल निघते.

By KARAN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *