कापूस पीकाची लागवड :-
कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून २०१८-१९ मध्ये
त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के म्हणजेच ४२.१८ लाख हेक्टर इतके
आहे. तसेच कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता २६६ किलो / हेक्टर ही राष्ट्रीय
उत्पादकतेपेक्षा ३०५ किलो / हेक्टर कमी आहे. राज्यामध्ये कापूस पिकाच्या एकूण
क्षेत्रापैकी जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड होत आहे.
हवामान :-
- कापूस लागवड स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते.कापूस पिकास प्रखरसूर्यप्रकाश व धुके विरहीत हवामान लागते.
- कापूस लागवड या पीकाची लागवड उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जाते.
- या पिकास ५००-८०० मिमी पावसाची आवश्यकता असते.
- बीयाण्याच्या उगवणीसाठी किमान ३२ ते३४ डिग्री सेल्सिअस, वाढीच्या अवस्थेत ३२ ते३८ डिग्री सेल्सिअस तापमान मानवते. रात्रीचे तापमान १५ ते२० डिग्री असावे.
- बोंडे भरण्याच्या काळात उष्ण दिवस व रात्रीच्या वेळी थंड हवामान लागते.
जमीन कशी असावी
- कापूस पीकाची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जपमनीवर करावी.
- अन्नद्रव्याची उपलब्धता व जपमनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमीनीचा सामू साधारणत: ६ ते८.५ पर्येंत .
- उथळ किंवा कमी खोली असणाऱ्या व हलक्या जपमनीवर कपाशीची लागवड करू नये.
- कोरडवाहू लागवडीमध्ये हलक्या जमीनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार घट होते.
- तसेच पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीन कपाशीला हानीकारक असते.
- कपाशीचे पीक अधिक ओलावा व चिबड परिशीतित तग धरू शकत नाही.
- जपमनीतील पाण्याचा निचरा होत नसल्यास चर काढावे.
निवडक बीटी संकरित कापूस :-
- मध्यम ते भारी जमिनित सिंचनाची व्यवस्था असल्यास किंवा संरपक्षत पाणी देण्याची व्यवस्था असेल तरच अमेरिकन संकरीत बी.टी.वाणांची निवड करावी.
- कोरडवाहू परिस्तितीत सिंचनाची व्यवस्था नसल्यास देशी किंवा देशी संकरीत वाण शाश्वत उत्पादन देतात म्हणून त्यांची लागवड फायदेशीर आहे.
- बी.टी.संकरीत वाणांची निवड करताना आपल्या मागील हंगामाच्या अनुभवानुसार किंवा आपल्या शिवारातील गावातील त्या संकरीत वाणाची उत्पादन क्षमता व इतर गुणधर्म पडताळून लागवडीसाठी निवड करावी.
- शक्यतोवर जाहीराती किंवा इतर लोकांच्या सांगण्यावरुन वाणांची निवड न करता अनुभवानुसार किंवा आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रत्यक्ष पाहणीनुसार करावी
बियाणे :-
बीटी कापूस बियाणास रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रपिया केलेली असते.बियाणास थायरम / कॅ प्टन / कारबोक्झीन / सुडोमोनास या बुरशीनाशकाची ३ ग्रॅ. प्रति किलो ग्राम बियाणे या प्रमाणात करावी. यामुळे मर, करपा यासारख्या रोगांचा प्रमाण कमी होतो.
अझोटोबॅक्टर / अझोस्पीरीलम या जिवाणूसंवर्धकारची २५ ग्रॅम प्रति किलो ग्राम बीजप्रपिया करावी.
जपमनीतील स्फुरद पिकास उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅमप्रति किलो ग्राम बियाणे.याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
बीजप्रपियासाठी गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळे पर्यंत पाणी कोमट करावे.
थंड झालेले गुळाचे द्रावण बियांवर हलके शिंपडून नंतर त्यावर जीवाणू चोळावे व सावलीत वाळवावे.
कापूस कोरडवाहू लागवट
कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा पेरणीयोग्य म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच वापस आल्यानंतर करावी.
पेरणी योग्य वेळेवर म्हणजेच १५ जुन ते१५ जुलैया कालावधीत करणेआवश्यक आहे.
१५ जुलैनंतर केल्यास उत्पादनात घट येते, त्यामुळे१५ जुलैनंतरपेरणी करु नये.
कोरडवाहू कपाशीची लागवड ९० x ३० सेंमी (३ x १ फुट) पकं वा ९० x ४५ सेंमी (३ x १.५ फु ट) किंवा ९० x ६० (३ x २ फुट) अंतरावर करावी
कोरडवाहू लागवडीमध्ये हेक्टरी १८,५१८ (एकरी ७,४०७) झाडे राहतील याची काळजी घ्यावी.
कापूस लागवड कधी करावी :-
बागायती लागवड : –
बागायती लागवडीसाठी ओळीच्या व लागवडीच्या अंतरानुसार सऱ्या

पाडू न घ्याव्यात किंवा नांगराच्या सहाय्याने एक फुट रुंदीच्या सऱ्या तयार करून घ्याव्यात.
लागवडीपूवी या सऱ्या ओलवून घ्याव्या व वरंब्याच्या पोटावर सरकी लावावी.
लागवडीनंतर दोन-तीन दिवसांनी आंब वणीचे पाणी द्यावे. बागायती लागवडीमध्ये कपाशीचे अंतर १५० x ३० सें.मी. (५ x १ फु ट) किंवा १८० x ३० सें.मी. (६ x १ फुट) ठेवल्यास सरस उत्पादन
वाढ होताना आढळून आले आहे .कपाशीचे ओळीमधील अंतर वाढवून दोन झाडांमधील अंतर कमी के ल्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या समान राखली जाते.
त्याचबरोबर बागायती लागवडीमध्ये ओळीतील अंतर वाढल्यामुळे झाडांमध्येसूर्यप्रकास हवा खेळती रापहल्यामुळे कपाशीची वाढ समाधानकारक होऊन बोंडेलागणे व पक्व होण्यास त्याचा फायदा होतो
बागायती बी टी कापूस लागवड पाट पाण्यावर किंवा ठिबक सिंचनावर केल्यास जून महिनेच्या पहिल्या आठवड्यामध्ये करावी.
ठिबक सिंचन पद्धतीने कापूस लागवड :-
ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी देण्याची सुविधा असल्यासओळीच्या अंतरानुसार उपनळया अंथरून घ्याव्या. उपनळयांतील अंतर जपमनीच्या प्रकारानुसार ठरवावे. भारी जमिनीमध्ये मुरण्याचा वेग कमी असल्यामुळे पाणीआडवे पसरते.त्यामुळे भारी जपमनीत तोटयांमधील अंतर जास्त म्हणजेच ५०-६० सें.मी. असेल तरी चालते.परंतुहलक्या जपमनीमध्ये पाणी लवकर मुरते. त्यामुळे खोलवर जाते. म्हणून तोटयांमधील अंतर कमी म्हणजेच ३० सें.मी. ठेवावे.उपनळया अंथरल्यानंतर आवश्यकतेनुसार ठिबक सिंचन चालूकरुन सरकीची लागवड करावी.

ठिबक संचाद्वारे खते देणे:-
ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठिबक संचावर लागवड केली आहे. त्यांनी रासायनिक
खते व्हेंच्युरीद्वारे ठिबक संचाच्या माध्यमातूनच द्यावी.
यासाठी आपल्या संचास व्हेंच्युरी (ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत
सोडणारे साधन) असणे आवश्यक आहे.
ठिबक संचाद्वारे रासायनिक खतांची मात्रा : १००:५०:५० कि .ग्रा नत्र, स्फुरद
व पालाश प्रति हेक्टर शिफारस करण्यात आलेली आहे.
ठिबक संचाद्वारे खते देतांना त्यांची अधिक विभागणी वाढीव खर्चाशिवाय करणे.
शक्य आहे. त्यामुळे खतांची कार्यसमता व उत्पादनात वाढ मिळते .
ठिबक सिंचनातून खते देतांना खते १०० दिवसापर्यंत विभागून द्यावी.
कापूस लागवड ठिबक सिंचनावर करूनही बरेच शेतकरी खते जमिनीतूनच देतात.
-
खतांची फवारणी :
कपाशीला पाते लागण्याच्या वेळी दोन टक्के युररयाची फवारणी करावी.
बोंडेलागण्याची वेळी दोन टक्के डी.ए.पी.चे द्रावण म्हणजेच २०० ग्राम डी.ए.पी खत प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. बी टी कपाशीस मुख्य अन्नद्रव्यांच्या मात्रे बरोबरच काही सूक्ष्म मुलद्रव्यांची आवश्यकता असते. या करिता माती परीक्षणानुसार माती मध्ये सल्फर, मॅग्नेपशयम, पझंक, बोरॉन यापैकी ज्या मुलद्रव्यांची कमतरता असल्यास सल्फर २० प्रति .ग्रॅ. / हेक्टर, मॅग्नेपशयम सल्फेट २० प्रति .ग्रॅ. / हेक्टर, झिंक सल्फेट २५ प्रति .ग्रॅ. / हेक्टर व बोरॉन ५ प्रति .ग्रॅ. / हेक्टर आवश्यकतेनुसार जपमनीतून द्यावे. सूक्ष्म मूलद्रव्ये शेण खतामध्ये मिसळून पेरणी पूर्वी किंवा पेरणी नंतर एक महिण्यातच द्यावी. रासायनिक खतासोबत सूक्ष्म मूलद्रव्ये देऊ नयेत.मॅग्नेपशयम सल्फे ट ०.२% म्हणजेच २० ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्याची फवारणी फुले लागणे व बोंडेपक्व होण्याच्या वेळी करावी.
शेंदरी बोंड अळी

पुढील हंगामात शेंदरी बोंडअळीचा प्रादुभायव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून फरदड न घेतावेचणी पूर्ण झालेल्या शेतातील पऱ्हाटया डिसेंबर महिन्यात उपटू त्या नष्ट्क रणे गरजेचेआहे.पऱ्हाटया शेतात पडलेली बोंडे व नख्या वेचून कंपोष्ट् खड्ड्यामध्ये गाडावे.कापूस पिकाची वेचणी पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात जनावरे, गुरेव शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडावी.चालू हंगामातील गुलाबी बोंडअळीचे कोष जपमनीमध्ये सुप्त अवस्थेत राहात असल्यामुळे शेताचीउन्हाळ्यापूवी खोल नांगरट करणेआवश्यकआहे.गुलाबी बोंडअळी कापसातील बियांस खात असल्यामुळे पररसरात गुलाबीबोंडअळीचेकोष, पतंग इत्यादी आढळून येतात. त्यामुळेत्या प्रकाश सापळेव कामगंधसापळे लावणेआवश्यक आहे.
लाल्या टाळण्यासाटी व्यवस्थापन .

पिकाच्या संतुलीत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार रासायपनक खतासोबत शेणखत किंवा वा कंपोस्ट् खत, हिरवळीची खते,जिवाणू खाते याचा वापर करावा.
नत्रयुक्त खतांच्या मात्रा विभागून देण्यात यावा .
युररया किंवा डीएपी या नत्रयुक्त खतांची २% प्रमाणात पाते व बोंडे लागतांनाफवारणी करावी.
पेरणीपूवी २० किलो .ग्रॅ. प्रति हेक्टर मॅग्नेपशअम सल्फेट जपमनीतून द्यावे.
फुलेव बोंडे लागतांना ०.२% मॅग्नेपशअम सल्फेटची (२० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी)फवारणी करावी.
रस शोषणाच्या किडीचे रोगांचे योग्य वेळे वर उपचत व्यवस्थापन करावे.
जपमनीत पाण्याची उपलब्धता वाढपवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
पावसाचा खंड पडल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. पीक फेरपालट करावी.