तूर लागवड - डिजिटल बळीराजा

तूर लागवड

नमस्कार शेतकरी बंधुनो तूर लागवड कश्या प्रकारे करता येईल. व तूर लागवड करताना कोनकोत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, तूर पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, तूर लागवड कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

तुरीच्या उत्पादनातही महाराष्ट्र राज्याची महत्वाची भुमिका आहे. उत्पादनातून आर्थिक फायदा तर होतोच शिवाय विविध अंगाने तूर डाळीचे महत्व आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण मापक असते

 

तूर लागवडीसाठी जमिन कशी असावी :-

दर्जेदार शेतजमिनीवर तूरीची लागवड केली जाते. पाण्याची उपलब्धता उथळ शेत जमिन ही या पिकासाठी सुपिक मानली जात आहे.

जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी पूर्ण करावी उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी

तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी

 

तूर लागवडीचे अंतर किती असावे :-

आय.सी.पी.एल-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ बाय १० सेंमी अंतरावर लागवड करावी.
मध्यम कालावधीतील जातीची ६० बाय २० सेंमी किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर लागवड करावी.

सर्वसाधारण तुरीची लागवड आंतरपिक पद्धतीत ४:२ किंवा ४:१ प्रमाणात केली जात असल्यामुळे ओळीतील दोन झाडांमधील अंतर २० सें. मी ठेवणे आवश्यक आहे. सलग पद्धतीने लागवड करायची असल्यास वाणाच्या प्रकारानुसार लवकर ते मध्यम परिपक्व होणाऱ्या वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ६० सें.मी तर दोन झाडातील अंतर २० से.मी ठेवावे. उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ९० सें.मी. आणि दोन झाडातील अंतर २० से.मी किंवा दोन ओळीतील अंतर ६० सें. मी ठेवून दोन झाडातील अंतर ३० सें. मी. ठेवावे. अर्ध रब्बी तूरीसाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें. मी व दोन झाडांमधील अंतर २० सें.मी. ठेवावे.

 

आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन :

तुरीचे पीक सुरूवातीला अतिशय सावकाश वाढते. तुरीच्या पिकाची विरळणी बी उगवल्यानंतर साधारपणे १० ते १५ दिवसांनी करावी. विरळणी करतांना एका ठिकाणी एक किंवा दोन सशक्त रोपे ठेवावी. पहिली कोळपणी २५ ते ३० दिवसांनी करावी. या नंतर २० ते २५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्या. त्याचप्रमाणे तुरीच्या पिकाला कमीत कमी २ वेळा निंदणी करण्याची आवश्यकता आहे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने तुरीचे पीक पेरणीपासून सुमारे ६० ते ७५ दिवसांपर्यत तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे. तुरीचे पीक सुरूवातीला अतिशय सावकाश वाढते. तुरीच्या पिकाची विरळणी बी उगवल्यानंतर साधारपणे १० ते १५ दिवसांनी करावी. विरळणी करतांना एका ठिकाणी एक किंवा दोन सशक्त रोपे ठेवावी. पहिली कोळपणी २५ ते ३० दिवसांनी करावी. या नंतर २० ते २५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्या. त्याचप्रमाणे तुरीच्या पिकाला कमीत कमी २ वेळा निंदणी करण्याची आवश्यकता आहे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने तुरीचे पीक पेरणीपासून सुमारे ६० ते ७५ दिवसांपर्यत तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे.

 

खत व्यवस्थापन:-

पेरणीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.
सलग तुरीसाठी पेरणीवेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद वेळी द्यावे.
आंतरपीक घेतल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त आहेत, त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करिता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.

 

पाण्याचे व्यवस्थापन

पावसाळयातील पाणी शेतात मुरविण्याच्या दृष्टीकोनातून पिकात एक महिन्यानंतर डवऱ्याला दोरी बांधून पिकामध्ये सन्या काढून घ्याव्यात, म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल व जास्तीचे पाणी सरीतून निघून जाईल. पाण्याची सोय असल्यास पाण्याची पहिली पाळी कळी अवस्थेत व दुसरी शेंगा भरण्याच्या वेळेस द्यावी

पाण्याची कमतरती भासल्यास सिंचनाची सुविधा ही करावीच लागते. पेरणीपसून ३० ते ४० दिवसांपासून हे पिक जोमात येते. ६० ते ७० दिवसांनी तूरीला फुले लागतात त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत हे पीक येते. शेंगा भरण्याच्या दरम्यान पाणी दिले तर उत्पादनात वाढ होण्यास मदत होते

 

किड व त्यांचे व्यवस्थापन

  1. तुरीवरील हेलीकोव्हरपाची अळी : शेंगा पोखणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहुपक्षी कीड आहे. हेलीकोव्हरपाची एक अळी साधारणतः ७ -१६ शेंगाचे नुकसान करते. पुर्ण विकसीत अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) असते. शरीराच्या बाजूवर तुटक करडया रेषा आढळतात.
  2. नुकसान: अळी लहान असतांना कळी फुलोऱ्यांवर तर मोठी अळी मुख्यतः शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खाते.
  3. तुरीच्या शेंगेवरील माशी: अळी पांढऱ्या रंगाची, व गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. शेंगाच्या बाहय निरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भावाचे लक्षण दिसून येत नाही. पुर्ण विकसीत अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडयासाठी शेंगेला छिद्र पाडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.
  4. नुकसान: तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करते. शेंगमाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून एका दाण्यावर उपजिवीका पूर्ण करते. अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांची मुकणी होते. बुरशीग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा लागवडीसाठी अयोग्य ठरतात.
  5. जैविक किटकनाशके : तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता एच.ए.एन. ९ पी. व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळयांचा अर्क (११० तीव्रता ) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात ५० ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण १ मि.ली. प्रती लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. फवारणी शेतात प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळया असतांना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
  6. रासायनिक किटकनाशके : तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यानंतर (१० ते २० अळया प्रति १० झाडे) इमामेक्टीन बेंझोएट ५ एस.

www.digitalvaliraja.com

 

तुरीच्या शेंगा ह्या वाळल्या की तूर काढणी योग्य झाली असे समजावे..तूर ही कापून काढली जाते. तूरीच्या शेंगा मशनरी किंवा बडवून ह्या वेगळ्या केल्या जातात. साठवून ठेवण्यापुर्वी चांगले ऊल देणे आवश्यक आहे. त्यानंतर पोत्यामध्ये साठवून ठेवावे शिवाय साठवलेल्या पोत्यामध्ये कडूलिंबाची पाने टाकली तर कीटकांपासून य़ा धान्याचे संरक्षण होणार आहे

काढणी व मळणी: या पिकाच्या ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची पाहणी करावी व पेंड्या बांधून ठेवाव्यात. कापणीस उशिर झाल्यास शेंगा तडकण्याची भिती असते. पेंडया दोन तीन दिवस उन्हात वाळवल्या नंतर मळणी करावी. नजिकच्या काळात कडधान्याचे मळणी यंत्र उपलब्ध झाले आहे. त्यांचा उपयोग वेळ वाचविण्यसाठी विशेष महत्वाचा आहे साठवणुक करण्यापूर्वी बियाणे उन्हात चांगले वाळवावे. म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होवून साठवणुकीतील कीड आटोक्यात राहते.

Leave a Comment