डिजिटल पद्धतीने शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय - डिजिटल बळीराजा

डिजिटल पद्धतीने शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डिजिटल पद्धतीने शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय यावर आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. यात मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे.

शेततळे निर्माण  केल्यामळे शेतकऱ्यांचे उत्पादनात  वाड होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली . शेततळे ही योजना शेतकऱ्यांस संजीवनी देणारी  योजना ठरली आहे.

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलट व जलसंधारणाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी विविध योजना मधून अनुदानावर शेततळे योजना राबविण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे

काय आहे शेततळं?

 1. यात आपण पावसाचे पाणी जमा करू शकतो आणि भविष्यात त्याचा वापर करू शकतो.
 2. शेततळ्याचा प्राथमिक उद्देश आहे शेतकऱ्याच्या खरीप पिकांसाठी पाण्याचा सुरक्षित स्त्रोत निर्माण करणे. 
 3. जमिनीच्या भू-गर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाणी मुरवण्याची पध्दत म्हणूनही शेततळ्याचा वापर करता येईल.
 4. या सारख्या बांधणीमध्ये साठ लाख लिटर्स इतकं पाणी साठवता येतं.
 5. शेततळ्यामुळे पिकाच्या गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते, ज्यामुळे चांगले उत्पादनही घेता येतं.

 

शेततळे व मत्स्यशेती व्यवसाय –

डिजिटल पद्धतीने शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय
डिजिटल पद्धतीने शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय    शेततळे

मत्स्यबीज निवडताना शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद महत्त्वाचा असतो

कागदाला कसलही प्रकारचा उपद्रव होणार नाही ह्यवर लक्ष देणे आवश्यक आहे  व त्यानुसारच मासे निवडावे

पाण्याच्या सर्व स्तरातील अन्न प्रहण करणारे मत्स्यबीज असावे

 • तळ्यातील शेवाळ खाणारे मासे असावेत.
 • बाजारात चांगली मागणी व सर्वोत्तम भाव मिळणारे मासे निवडावेत
 • निवडलेल्या माशांना दात नसल्याने कागदाला इजा होणार नाही
 • बाजारात चांगली मागणी व सर्वोत्तम भाव मिळणारे मासे निवडावेत.
 • सुलभ रित्या मिळणारे मत्स्यबीज उपलब्ध होईल हे पाहवे
 • मत्स्यशेती करता एकमेकांचे अन्न खाणार नाहीत किंवा करता स्पर्धा करणार नाहीत असे मिश्र जातीचे मासे निवडावेत
 • जलदगतीने वाढणारे मासे निवडावेत
 • मासे निवडताना तसेच माशांच्या खतांमुळे व खाद्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याच बाबींचा विचार करून मत्स्यव्यवसाय करताना पुढील मुदे महत्त्वाचे ठरतात.
 • मत्स्यबीज निवडताना शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद महत्त्वाचा असतो , कागदाला कसलही प्रकारचा उपद्रव होणार नाही ह्यवर लक्ष देणे आवश्यक आहे  व त्यानुसारच मासे निवडावे.
 • जुलौ -ऑगस्टमध्ये पाणीसाठा मिळतो व पाणी वापर एप्रिल-मेमध्ये करावयाचा आहे. याचाच अर्थ १० ते ११ महिन्यांत माशांचे पुरेसे उत्पादन मिळायला हवे. जेणेकरून दोन्ही पिके एकमेकांना पूरक ठरतील.

 

 

शेततळे माहिती /उद्दिष्टे

 

 

 1.  प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या गाव समूहातील अल्प व  अतल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदवलेल्या परिस्थितीशी ही जुळून घेण्यास  सक्षम बनवणे.
 2.  सुरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे दुबार पिकाखालील क्षेत्र वाढवणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
 3. शेततळ्याच्या जागा निवडीसाठी कोणत्या अटीची गरज आहे
 4.  शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.60  हेक्टर क्षेत्र असावे.
 5.  ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी
 6.  काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेत्रात योग्य असल्याने अशी जमिनीची निवड करण्यात यावी
 7.  क्षेत्र उपचाराचे काम झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळे प्राधान्याने घेण्यात यावे
 8.  मुरमाड व वालुक माय सचित्र खडक असलेली जागा शेततळ्याकरता निवडू नये.
 9.  लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे जेणेकरून पावसाची वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
 10.  इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यासाठी पाणी पुनर्भरणासाठी स्रोत असल्याची खात्री करण्यात यावी.
 11.  नाल्याच्या ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
 12.  शेततळ्याच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.
 13.  इनलेट आउटलेट शेततळे यासाठी लाभार्थी निवडताना पांडू क्षेत्रातून वाहून येणारा अपघात हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपघात हात नैसर्गिकरीत्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे याची प्रथम खात्री करावी 

 

 

शेततळ्यासाठी जागेची निवड

 

 

 1.  कमीत कमी 700 किमी सरासरी वार्षिक पर्जन्यमान व त्यापेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेततळे घेण्यास यावी
 2.  शेततळे ही  20x20x3  मी. या आकाराची असावीत त्यापेक्षा कमी आकाराची शेततळे घेण्यात येऊ नयेत
 3.  ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्के पर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावी
 4.  1000 घनमीटर पाणी साठ्यासाठी कमीत कमी पर्जन्य नुसार व स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पांडू निश्चित करण्यात यावा.
 5.  सर्व प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या समावेश क्षेत्रात शेततळे घेण्यात येऊ नये.
 6.  शेततळ्याची बांधकाम करताना अशा ठिकाणी जागेची निवड करावी की त्यामुळे जमीन पाणथळ अथवा खारवट होणार नाही
 7.  शेततळ्याच्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 30 टक्के रक्कम शेतकऱ्याने भरावी किंवा 20% रकमे एवढी शेततळे खोदण्याचे काम शेतकऱ्याने स्वतः करून पूर्ण केल्यास अशा शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्याची उर्वरित कामे घेण्यास शासनाची मान्यता आहे
 8.  शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्र 5  ते10  दहा हेक्टर असावे

 

 

 शेततळ्याची मोजणी व अंदाजपत्रक

 

 

 ज्या ठिकाणी शेततळे घ्यायचे आहे त्या ठिकाणी जमीन कशी आहे हे समजणे आवश्यक आहे त्याकरिता त्या गौरव अगोदर त्या जागेवर चाचणी खड्डे घेण्यात यावेत क्षेत्रीय जिथे काढायची त्या भागात निर्णया ठिकाणी 1.5x1x3मी. असे कमीत कमी2 दोन खड्डे घेण्यात यावेत तो खड्डा3  मी कठीण दगड लागेपर्यंत खोल खोदावा व त्याच्या अंतर्गत भागाचे मॉडर्न प्रोफाइल चे चित्र काढावे .मुरमाड दिसून आल्यास अशी जागा रद्द करावी शाडू अथवा चिकन काळी माती आढळल्यास अशी जागा निवडावी चाचणी खड्डे घेतल्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी त्याप्रमाणे नोंद  मापन पुस्तकात करावी

 

शेततळ्यासाठी अटी

 

 

 • कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निशित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
 • कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
 • लाभार्ठीने स्वताच राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सदर करावा .
 • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
 • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
 • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील . ७)पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
 • लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
 • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदने हे बंधनकारक राहील
 • इनलेट आउटलेट ची सोय असावी . शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरिकरण स्वखर्चाने करावे .

 

अ.क्र शेततळ्याचे आकारमान पृष्ठभागावरील क्षेत्रफळ चौ.मी होणारे खोदकाम घ. मी 
                               अ.    इनलेट आउटलेट्स  शेततळे
1. 15x15x3 मिटर 225 441 
2 20x15x3 मिटर 300 621
3 20x20x3 मिटर 400 876
25x20x3 मिटर 500 1131
5 25x25x3 मिटर 625 1461
6 30x25x3 मिटर 750 1791
7 30x30x3 मिटर 900 2196
                              ब.    इनलेट आउटलेट्स  विरहित शेततळे 
1. 20x15x3 मिटर 300 621
2. 20x20x3 मिटर 400 876
3. 25x20x3 मिटर 500 1131 
4. 25x25x3 मिटर 625 1461
5. 30x25x3 मिटर 750 1791
6. 30x30x3मिटर 900 2196

 

 

 

 

 

मागेल त्याला शेततळे योजना (लाभ)

 

 

 • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा महात्वपूर्ण फायदा होणार आहे, त्यांचा पावसाच्या पाण्यावरचे अवलंबन कमी होऊन, सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्थाई स्त्रोत उपलब्ध होईल.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुरून किंवा दुसरीकडून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही
 • ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
 • मागेल त्याला शेततळे योजनेचे मध्ये मिळणारी धनराशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल
 • या योजनेमुळे संकटग्रस्त व दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत झाली आहे, तसेच विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात दुष्काळामुळे त्रस्त आहेत, शेततळे हि योजना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल.

 

शेततळे अनुदान योजना 2023  कार्यपद्धती

 

 

दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये रुपये 10,000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून पंचवीस वर्षाच्या कालावधीत योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येईल अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 

शाश्वत संरक्षित सिचन व्यवस्था करण्यासाठी विभागवार पाच वर्षाचे आराखडे तयार करून व त्यानुसार जिल्हावार नियोजन करून पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव यांचे टप्प्या टप्प्याने बांधकाम करण्याचे नियोजन असून अशा कामांना महामंडळाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती (बीपीएल) व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे.

 • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करावी लागतील
 • जमिनीचा 7/12 उतारा
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
 • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
 • आधारकार्ड
 • ८ – अ प्रमाणपत्र
 • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज 

 

 • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल, शासनाची या वेबसाईटवर योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यावर प्रथम होम पेज उघडेल या होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’ या पर्यायावर क्लिक करावे.

 

                       शेततळे प्लास्टिकची किंमत

 

 

 • 15x15x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 28 हजार 275 रुपये मिळतील.
 • 20x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 31 हजार 598 रुपये मिळतील.
 • 20X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 41 हजार 218 रुपये मिळतील.
 • 25X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 49 हजार 671 रुपये मिळतील.
 • 25x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 58 हजार 700 रुपये मिळतील.
 • 30x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 67 हजार 728 रुपये मिळतील.
 • 30x30x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त मिळणारे अनुदान रक्कम 75 हजार रुपये असेल.

 

मत्स्यबीज 

 

 

 • शेततळ्यास पंपाने पाणी घेतले जाते असल्यास शक्‍यतो गावठी मासेकिंवा वनस्पती नसतात.
 • तरीही सुरक्षितता म्हणून नको असलेले मासे व वनस्पती काढून टाकाव्यात.
 • उत्पादनात वाढ करण्याच्या तळ्यातीलपाण्यात माशांच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी कोणत्या आहेत ते पाहू.
 • सामू : ७.- ८.५
 • नायल्रेजन : .५ ते .१० मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम
 • फॉस्फरस : .२ ते .४ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम
 • सेंद्रिय पदार्थ : १.५ ते २.५ मिलिग्रॅम
 • प्राणवायू : चार मिलिग्रॅम प्रति लिटर
 • पारदर्शकता : २५ ते ३0 सेंमी
 • जडता : १५ मिली प्रति लिटर

जाती

 

1) भारतीय प्रमुख कार्प मासे : कटला, रोहू, मृगळ या तीन मत्स्य जातींना भारतीय प्रमुख कार्प मासे म्हणतात. झपाट्याने होणारी वाढ व आकाराने खूप मोठे होत असल्याने मत्स्यशेतीकरिता या जाती फायद्याच्या ठरतात.
2) चिनी कार्प : चंदेरा व गवत्या हे चांगले उत्पादन देणारे मासे आहेत.
3) भारतीय प्रमुख कार्प मासे हे परंपरागतरीत्या नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावामध्ये वाढविले जातात. नैसर्गिक अन्न आणि जागेसाठी या तीन जातींची पूरकता असल्याने त्यांचे तलावामध्ये एकत्रित संवर्धन केले जाते.
4) मिश्र मत्स्यशेतीमध्ये कटला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राणी प्लवंगांचा अन्न म्हणून वापर करतो. रोहू मधल्या थरातील अन्न खातो, तसेच मृगळ तळाशी असलेले अन्न खातो. चांगली वाढ आणि उत्तम मागणी असल्यामुळे मिश्र मत्स्यशेती फायदेशीर ठरते.

 

 

मत्स्यशेती खतव्यवस्थापन

 

 

 • मत्स्यबीज सोडण्याआधी आठ दिवस २० किलो शेणखत, एक किलो युरिया, एक किलो सुपर फॉस्फेट एकत्र करून चांगले भिजवून पसरून टाकल्यास पाण्याची सुपीकता सर्वांत उत्कृष्ट होते व तलावमत्स्यबीज साठवणुकीसाठी तयार होतो,
 • १० गुंठे शेततळ्यासाठी मत्स्य बीज साठवणुकीच्या आठ ते दहा दिवस अगोदर १५० ते २०० किलो ताजे शेण भिजवून पसरून टाकावे.
 • साठवणुकीपूर्वीच्या खतांच्या वापरामुळे अन्न पुरेसे तयार झालेले असते. परंतु आता हे अन्न कमी पडू नये. म्हणून सुरुवातीला एक किलो मत्स्यबीजासाठी १०० ग्रॅम व चौथ्या आठवड्यात ४०० ग्रॅम खाद्य द्यावे. यामुळे माशांचा आकार बोटुकलीएवढा होईल.

 

 

Leave a Comment