नमस्कार शेतकरी बंधुनो आपण आज डिजिटल पद्धतीने कांदा लागवड व खत व्यवस्थापन पिका बद्दल माहित करून घेणार आहेत. आपल्या जीवनात कांद्याला खूप महत्त्व आहे. कारण आपल्या रोजच्या आहारात नेहमी कांद्याचा वापर केला जातो. कांद्यामध्ये ‘ब’ व ‘क’ जीवनसत्व असते. जीवनसत्वे, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात, उन्हाळी व पावसाळी कांदा लागवड करण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो कोणतही पीक लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे बियाण्यांची चांगल्या प्रकारे निवड करणे हे खूपच गरजेचे असतं आणि जर आपण बियाणे हे चांगल्या प्रकारचे किंवा चांगल्या क्वालिटीचे निवडले नाही तर याच नुकसान आपल्याला पुढे कांदा उत्पादनात देखील होतो,त्यामुळे योग्य प्रकारचे बियाणे निवडणे हे खूपच गरजेचे आहे.कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच स्वाद आहेत. पित्त आणि वातशामक म्हणून कांद्याचा वापर केलं जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्त वाहिण्यातील दोष या आजारावर कांदा अत्यंत गुणकारी आहे.कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात कांदा लागवडी खाली क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्हा हा पहिला क्रमांक लागतो. जगातील कांदा पिकविणाऱ्या देशात भारताचा लागवडीखालील क्षेत्रात प्रथम क्रमांक असून उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. परंतु भारतात कांद्याची उत्पादकता अतिशय कमी असून भारतातील कांद्याचे सरासरी दर हेक्टरी उत्पादन फक्त १० टन इतके आहे.
डिजिटल पद्धतीने कांदा लागवड व खत व्यवस्थापन
कांदा लागवडीसाठी हवामान
कांदा हेक्टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची २ ते ३ पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
कांद्याची वाढ आणि बिजोत्पादन हे तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी (लहान आणि मोठा दिवस) यावर अवलंबून असते. कांद्यामध्ये लहान दिवसांत वाढणाऱ्या (शॉर्ट डे) आणि मोठ्या दिवसांत वाढणाऱ्या (लाँग डे) अशा
कांदा पिकाच्या लागवडीनंतर गाठ थोडी मोठी होत असताना १२ ते १५ अंश सेल्सिअस, कांदा पोसत असताना १५ ते २० अंश सेल्सिअस आणि कांदा काढणीच्या वेळी २५ ते ३० अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते. कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढते.
जमीन :
पाण्याचा उत्महिन्यातम निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते. कांदा पिकासाठी हलक्या आणि मध्यम भारी जमिनी उपयुक्त ठरतात. कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ पर्यंत असावा. कांद्याची वाढ जमिनीच्या वरच्या थरात होत असल्याने आणि त्याची मुळे २४ – ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत वाढतात म्हणून कांद्याच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा वरचा थर किमान २५ ते ३० सेंटिमीटरपर्यंत भुसभुशीत असावा. कांद्याच्या मुळाभोवतीच्या जमिनीत ‘ भरपूर ओलावा आणि खेळती हवा असल्यास कांद्याची वाढ चांगली होते. यासाठी जमिनीच्या वरच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. चोपण किंवा भारी काळ्या जमिनीत कांद्यानी पालेवाढ जास्त प्रमाणात होते. मात्र कांदे त्या प्रमाणात पोसत नाहीत. याशिवाय चोपण किंवा काळ्या जमिनीत कांद्याचा आकार वेडावाकडा होतो.
कांदा पिकाची पूर्व मशागत कशी करावी?
कांदा पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. आणि कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
लागवड हंगाम :
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
रब्बी हंगामात १०’ x १० सेंमी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कार्बन्डॅझिम व १० मिलि. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल टाकून द्रावण करावे. रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी.
कांदा पिकाची लागवड कशी करावी?
- कांदा पिकाची लागवड करताना, कांद्याची रोपे गादीवाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादीवाफा १ मीटर रुंद ३ मीटर लांब आणि 15 सेंटिमीटर उंच करावा.
- वाफ्यातील ढेकळे बाजूला काढावीत.
- रुंदीशी समांतर ५ सेंटीमीटर बोटाने रेषा पाडावेत आणि त्यात बी पातळ पेरावे आणि हे बी मातीने झाकून घ्यावे.
- बी उगवून येईपर्यंत त्याला पाणी घालावे.
- बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
- रोपांना गाठी तयार झाल्या की रोप लागवड योग्य झाले असे समजावे.
- खरीप कांद्याची रोपे साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांनी तयार होतात. तर रब्बी कांद्याची रोपे आठ ते नऊ आठवड्यांनी तयार होतात.
- रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादीवाफ्यात पुरेसे पाणी द्यावे.
- कांद्याची लागवड गादीवाफ्यावर तसेच सरी वरंब्यावर करता येते.
- सपाट वाफ्यामध्ये हेक्टरी रोपांची प्रमाण जास्त असले, तरी देखील मध्यम आकाराचे एकसारखे कांदे तयार होतात.
- सपाट वाफा दोन मीटर रुंद आणि उताराप्रमाणे वाफ्याची लांबी ठेवावी.
- रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करणे गरजेचे असते.
- 12.5 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी

खते व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी ४0 तें ५0 बैलगाड़या शेणखत व शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत हेक्टरी १oo किलो नत्र,
५० किलो स्फुरद व ५० किलो पालाशपैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे. राहिलेले ५० किलो नत्र ३० व ४५ दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे. साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.
कांदा पिकास रासायनिक खतांमधून प्रतिएकरी नत्र ४४ किलो (९५ किलो युरिया), स्फुरद १६ किलो (१०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व पालाश २४ किलो (४० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) देणे आवश्यक आहे
कांद्याकरिता ठिबक सिंचनाचा वापर केला असल्यास रोपांच्या पुनर्लागवडीच्या वेळी १६ किलो नत्र देऊन उर्वरित नत्र सहा समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे ६० दिवसांपर्यंत दर १० दिवसांनी द्यावे.
कांद्याच्या जाती
खरीप हंगामासाठी जाती :
1) एन – ५३:
नाशिक येथील स्थानिक वाणातून ही जात १९६० मध्ये विकसित केलेली आहे. या जातीचे कांदे गोलाकार परंतु थोडे चपटे असतात. या जातीच्याकांद्याचा रंग जांभळट लाल असतो आणि चव तिखट असते. ही जात खरीप हंगामातील लागवडीसाठी चांगली आहे. या जातीचे कांदे लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचें उत्पन्न हेक्टरी २० ते २५ टन इतके मिळते. घन पदार्थाचे प्रमाण ११-१२% एवढे आहे.
2) अर्का कल्याण :
बंगलोर येथील भारतीय बागवानी संस्थेने ही जात नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम आकाराचे आणि गर्द लाल रंगाचे असून चव तिखट असते. या जातीचे कांदे ९० ते ११० दिवसात काढणीला तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन मिळते, घन पदार्थाचे प्रमाण ११-१२% एवढे आहे.
३) ॲग्रीफाऊंड डार्क रेड:
नाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ. (ए.ए.डी.एफ.) या संस्थेने ही जात स्थानिक वाणांतून १९८७ मध्ये विकसित केली आहे. या जातीचे कांदे आकाराने गोल, मध्यम आकाराचे असतात आणि त्याचा रंग गर्द लाल असतो. या जातीचे कांदे लागवडीनंतर ९०११० दिवसांनी काढणील येतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ४० टन मिळते. घन पदार्थाचे प्रमाण १२- १३%, साठवणीस मध्यम, खरीप हंगामास योग्य, निर्यातीसाठी योग्य. पेरणी करूनही कांदा पिकाचे उत्पादन घेण्यास योग्य वाण आहे.
4) बसवंत – ७८०:
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात स्थानिक वाणांतून खरीप हंगामासाठी १९८६ मध्ये विकसित केली आहे. या जातीचे कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. या जातीच्या कांद्याचा रंग आकर्षक लाल असून तो काढणीनंतर ३ ते ४ महिने चांगला टिकून राहतो. डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण एन -५३ या जातीच्या तुलनेत अतिशय कमी असते. या जातीचा कांदा लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणीसाठी तयार होतो. या जातीचे उप्तादन हेक्टरी २५ ते ३० टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण १२% एवढे आहे.
रोग व कीड
कांदयावर प्रमुख रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल् यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्टभागात खरडतात. व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
उपाय
फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुर्नलागण केल्यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्टरी फॉस्फॉमिडॉन ८५ डब्ल्यू.एस.सी. १०० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ इसी ६०० मिली किंवा डायथेन झेड- ७८, ७५ डब्ल्यू डी पी १००० ग्रॅम अधिक ५०० ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्या वेळी प्रती हेक्टरी फॉस्फोमिडॉन ८५डब्ल्यू. एस. सी. १०० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ इसी ६०० मिली किंवा डायिन झेड ७८, ७५ डब्ल्यू.डी. पी. १००० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
हे पण वाचा
ठिबक सिंचन वापरून कांदा उत्पादन :
ठिबक सिंचनावर कांदा लागवड करावयाची झाल्यास त्यासाठी १५० ते १८० सें.मी. रुंदीचे गादेवाफे तयार करावेत. एका वाफ्यावर दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर पसरवून घ्याव्यात. दोन ड्रीपमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे. वाफ्यावर ठिबक संच चालवून वाफसा येईपर्यंत पाणी द्यावे आणि वाफसा आल्यावर १० बाय १० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
कांद्याची लागवड मध्यम, भारी, कसदार आणि भुसभुशीत जमिनीत करावी. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे भरपूर प्रमाण असणाऱ्या जमिनीत कांद्याचे पीक चांगले येते.
ठिबक सिंचनावरील लागवड
१) कांद्याची लागवड आपल्याकडे साधारणपणे सपाट वाफा पद्धतीने अथवा सरी वरंबा पद्धतीवर केली जाते. कांद्याची उत्पादकता कमी असण्याच्या प्रमुख कारणांमध्ये पाणी व्यवस्थापनाची अयोग्य पद्धत, सुधारित जातीचा अभाव, असंतुलित पोषण, एकरी रोपांची संख्या पीक संरक्षणाकडील दुर्लक्ष ही आहेत. या सर्व बाबींचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून कांद्याचे आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीने एकरी २०० क्विंटल एवढे उत्पादन मिळू शकते.
२) ठिबक सिंचनावर कांदा लागवड करावयाची झाल्यास त्यासाठी १५० ते १८० सें.मी. रुंदीचे गादेवाफे तयार करावे लागतात. एका वाफ्यावर दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर पसरवून घ्याव्यात. दोन ड्रीपमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे. वाफ्यावर ठिबक संच चालवून वाफसा येईपर्यंत पाणी द्यावे आणि वाफसा आल्यावर १० बाय १० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
विशेष माहिती :
काढणीपुर्वी १५ ते २० दिवस आधि एमएच-४०,३००० पीपीएम द्रावणाची फवारणी करावी. कांदयाचा टिकावुपणा वाढतो. काढणीपुर्वी ३ आठवडे पाणी बंद करावे.
काढणीची योग्य वेळ :
स्थानिक बाजारपेठेसाठी हिरवा कांदा चालतो. काढणीपुर्वी ६० – ७० टक्के माना मोडलेला, ३ – ४ दिवस शेतात सुकवलेला, ४ – ५ से मी पात ठेवुन पिरगाळलेला, लाल / पांढरा गडद रंगाचा, आकर्षक, हवेशीर साठवणगृहात साठवलेला a जास्त टिकतो.
FAQ
एलोरा कांदा बियाणे किंमत
एलोरा कांदा बियाणे किंमत ही प्रती किलो ३००० हजार रुपये इतकी आहे.
पंचगंगा कांदा बियाणे किंमत
पंचगंगा कांदा बियाणे किंमत ही प्रती किलो ३४०० इतकी आहे.
लागवडीपासुन कांदे वाढण्यास किती वेळ लागतो?
कांदा लागवडी पासून काढणीपर्यंत सुमारे ९० ते १०० दिवस हे लागतात.
कांदा पीक किती दिवसात येते?
कांद्यामध्ये कोणते तणनाशक वापरावे?
तणनाशके. डीसीपीए आणि पेंडिमेथालिन कांद्यामध्ये लेबी कालावधी दरम्यान वापरण्यासाठी नोंदणीकृत आहेत