falbag lagwad yojana 2023 Maharashtraफळबाग लागवड अनुदान योजना मराठी महाराष्ट्र पात्रता नियम व अटी ऑनलाइन अर्ज 100% अनुदान संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

falbag lagwad yojana 2023 Maharashtraफळबाग लागवड अनुदान योजना मराठी महाराष्ट्र पात्रता नियम व अटी ऑनलाइन अर्ज 100% अनुदान संपूर्ण माहिती मराठी

falbag lagwad yojana 2023 maharashtra| फळबाग लागवड अनुदान योजना मराठी|भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना|Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2023| Falbag Lagwad Yojana 2023 Online Form| फळबाग लागवड योजना महाराष्ट्र| Falbag Lagwad Anudan Yojana 2023| Maharashtra Mahadbt Yojana 2023

राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची लागवड करतात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करणारे सांगली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, या जिल्ह्यात फळबागांचे उत्पादन मोठे घेतले जाते. दरम्यान राज्यशासनाकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये काही शेतकरी याचा फायदा घेतात तर काही शेतकरी यापासून वंचित राहतात. राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. 

२०१८-१९ पासून महाराष्ट्र राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना Fundkar Falbag Lagwad Yojana 2023 maharashtra) सुरु करण्यात आली. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.योजनेचे उद्दिष्ट काय आहे, कोणत्या फळबागेसाठी अनुदान किती मिळते, आवश्यक पात्रता काय, लाभार्थी कोणते, आवश्यक कागदपत्रे कोणती,अर्ज कुठे करायचा, फळझाड लागवडीसाठी मुदत किती, पूर्वसंमतीनंतरची प्रक्रिया काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

 

Table of Contents

Falbag Lagwad Yojana 2023 maharashtraफळबाग लागवड अनुदान योजना संपूर्ण माहिती मराठी 

Falbag Lagwad Yojana 2023 maharashtra  ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणूनही ओळखली जाते. मित्रांनो, जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटीवरील कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसेल, आणि तुम्हाला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची नोंदणी कशी करायची, शेतीसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. अवजारे, ट्रॅक्टर, कृषी सिंचन. यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा. आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घ्या. नोंदणीपासून ते अर्जापर्यंतची सर्व माहिती पहा. आणि जरूर अर्ज करा आणि योजनांचा लाभ घ्या.

फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येते.
लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते.

मुद्रा लोन योजना 2023 मराठी महाराष्ट्र

योजनेचे नाव Falbag Lagwad Yojana
विभाग कृषी विभागामार्फत राबविली जाते 
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभार्थी राज्यातील शेतकरी 
लाभ फळबाग लागवड अनुदान योजना लाभ
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन 
अधिकृत वेबसाईट येथे पहा

एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र 2023

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड अनुदान योजना मराठी उद्दिष्टे

 

 • ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे
 •  या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग शेतीला हि प्रोत्साहन मिळणार आहे. 
 • या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार आहे
 • देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना मोफत falbag lagwad yojana 2023 maharashtra देऊन त्यांना घरबसल्या  बागायती शेती करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे.
 • शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळून देणे हे  falbag lagwad yojana  योजनेचे उद्दिष्ट आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना Falbag Lagwad Yojana योजनेच्या माध्यमातून मोफत अनुदान देणे 
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळेल. 
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
 • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
 • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे
 • शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
 • अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% असणे गरजेचे आहे.
 • शेतकऱ्यांना पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
 • ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यक ठरेल.
 • फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे शक्य होईल.
 • हवामान आणि ऋतू बदलामुळे होणाऱ्या परिणामांची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होईल.

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

Falbag Lagwad Yojana योजना घटकांतर्गत समाविष्ट बाबी 

 प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड या घटकांतर्गत पुढील बाबींचा समावेश राहील तसेच, त्यापैकी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे व प्रकल्प अनुदानीत बाबी पुढीलप्रमाणे राहतील

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

    कामे आर्थिक भार
  शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने करावयाची कामे १००% लाभार्थी शेतकरी
1) जमीन तयार करणे
2)  माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे
3) रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे
4) आंतर मशागत करणे
5) काटेरी झाडांचे कुंपण (ऐच्छिक)
प्रकल्प अनुदानीत बाबी/कामे १००%  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
1) खड्डे खोदणे
2) कलमे लागवड करणे
3) पीक संरक्षण
4) नांग्या भरणे
5) ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड अनुदान योजना मराठी वैशिष्ट्ये

रमाई घरकुल आवास योजना 2023

 1. falbag lagwad yojana 2023 maharashtra  योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
 2. या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना एक नवीन  बागायती शेती करण्याचे शिक्षण मिळेल 
 3. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना  बागायती शेती  संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
 4. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे
 5. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील  शेतकऱ्यांना  बागायती शेती करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
 6. falbag lagwad yojana 2023 maharashtra योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोफत अनुदान देण्यात  येते. 
 7. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 8. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल 
 9. राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra तीन वर्षात मिळणारे रोपे व अनुदान

महाराष्ट्र महिलांसाठी मोफत पीठ गिरणी  योजना 2023 

अ. क्र. फळपीक  तीन वर्षात मिळणारे अनुदान (रु.)
कलमे  रोपे 
१. आंबा  (10×10 मी) ६५०८४ ५८४८४ 
२. आंबा कलमे(5×5 मी) १२६१४४
३. पेरु कलमे (6×6 मी)-  ७३६१९ 
४. पेरु कलमे (३x२ मी)-  २२३८११ 
५. संत्रा  मोसंबी  कलमे (6x 6मी)  ८१३८३ 
६. संत्रा कलमे ( ६x ३).  ११९०७१
७. कागदी लिंबू (६ x ६ मी.) ७१४११  ६९७४९ 
८. सिताफळ (5x 5 मी)-  ८६७६२  ७४७६२ 
९. चिकू कलमे (१० x १० मी.). ६२७८९ 
१०. डाळिंब कलमे(4.5×3 मी) ११७६१५ 
११. काजू (७x ७)  ६५७५२ ५७३५२ 
१२. आवळा (७x ७)  ५९०६१ ५१८६१ 
१३. चिंच  / जांभूळ  ( १०x १०) ५६०५४ ५०६५४ 
१४. कोकम  (७x ७) ५६५८६ ५२९८६ 
१५. फणस  ( १०x १०).  ५३५२९ ५०५२९ 
१६. अंजीर कलमे (४.५x ३) १११६५८
१७  नारळ रोपे (बाणावली/ टीडी ) पिशवीसहीत  ( ८ x  ८) ९२०३२ 
१८  नारळ रोपे (बाणावली) पिशवी विरहीत  ( ८ x  ८) ७४०३२ 
१९  नारळ रोपे (टीडी ) पिशवी विरहीत  ( ८ x  ८) ७७६३२ 

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड योजना मराठी  लागवडीसाठी मुदत

फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्षी 1 मे ते 30 नोव्हेंबर पर्यंत असेल. योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक राहील.

falbag lagwad yojana

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड योजना मराठी   फायदे

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra योजना देशातील शेतकऱ्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 

या योजनेचा लाभ  राज्यातील कष्टकरी  शेतकरी बागायतदार यांना मिळणार आहे.

 योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ बिगर बागायतदार शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.

गरीब शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना अंतर्गत शेती बागायती खाली आणता येईल.

या योजनेमुळे  शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडून येईल.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला जाईल.

या योजनेतून देशातील गरीब  शेतकऱ्यांनामोफत अनुदान देण्यात येणार आहे.

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड मराठी  योजनेच्या संबंधित नियम व अटी

 • महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना falbag lagwad yojana योजना चा लाभ दिला जाईल.
 • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे
 • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब बिगर बागायतदार शेतकरी घेऊ शकतात.
 • अर्जदार घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
 • जर  अर्ज दराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गतफळबाग लागवड योजना लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार  शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
 • या योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्‍टर ते कमाल १०.०० हेक्‍टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्‍टर ते कमाल ६.०० हेक्‍टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.
 •  कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.
 •  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा दोन हेक्‍टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी फळबाग लागवड अनुदान योजनेमूधन लाभ घेता येईल.
 • लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.
 • अर्जदार शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार अपंग पुरुष असल्यास, अशा पुरुषनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी या
 • योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहील.
 • फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनाच या योजने अंतर्गत लाभ घेता येईल. कृषि उत्पादक संस्था व गट यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड योजना मराठी  पात्रता

 • लाभार्थ्यास फळबाग लागवड करताना ठिबक सिंचन संच बसवणे आवश्यक आहे.
 • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना दिला जाईल. संस्थात्मक शेतकऱ्यांना शेतकरी लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार नाही.
 • सर्व प्रवर्गाअंतर्गत जी शेतकरी कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत, त्यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल. (कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अज्ञात मुले)
 • शेतकऱ्याच्या स्वताच्या नावावर शेत जमिनीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
 • संयुक्त मालकीची जमीन असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यांला स्व हिश्श्याच्या क्षेत्र मर्यादेत लाभ घेता येईल.
 • सातबारा वर कुळाचे नाव असेल, तर कुळाची संमती घेणे आवश्यक आहे.
 • परंपरागत वननिवासी अधिकार मान्‍यता अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असतील.
 • इतर सरकारी योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादेतच लाभार्थ्याला लाभ घेता येईल.

 

फळबाग लागवड योजना आवश्यक कागपत्रे

 1. आधार कार्ड 
 2. ७/१२ व 8-अ उतारा
 3. हमीपत्र
 4. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
 5. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
 6. आधार लिंक बँक खाते क्रमांक.
 7.  कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लागवडीकरिता माती परिक्षण अहवाल आवश्यक.

 

falbag lagwad yojana 2023 Maharashtra फळबाग लागवड योजना  Online Application

तुम्ही जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2023 साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली आम्ही ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते संगितले आहे, तुम्ही आमच्या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन अर्ज करू शकता.

falbag lagwad yojana

 • वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,
 • नंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या वर क्लिक करावे लागेल जसे की तुम्हाला falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड योजना  या लिंक वर क्लिक करायचे आहे.
 • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.
 • ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.
 • माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

 

falbag lagwad yojana 2023 maharashtra फळबाग लागवड योजना  पूर्वसंमतीनंतरची प्रक्रिया काय

 • पूर्व संमती दिल्यानंतर कृषी सहाय्यक सात दिवसात अंदाजपत्रक तयार करतात.
 • मंडळ कृषी अधिकारी यांनी अंदाजपत्रकाची छाननी करून 30 दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शिफारसी सह मंजुरीसाठी पाठवले जाते. 1 हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड अंदाजपत्रकास तालुका कृषी अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात.
 • एक हेक्‍टर क्षेत्र पेक्षा अधिक क्षेत्राकरिता फळबाग लागवड अंदाजपत्रकात उपविभागीय कृषी अधिकारी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देत देतात. अंदाजपत्रक प्राप्त झालेल्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान होते. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांना हे बंधनकारक असते.
 • प्रत्येक अर्जदार लाभार्थ्यांसाठी फळबाग लागवड स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येतो.
 • अशा प्रकल्पांसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देखील स्वतंत्रपणे दिली जाते.
 • लागवडीची अंदाजपत्रके तयार करून त्याला सक्षम प्राधिकरण कार्याच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी फळबाग लागवड करतात.

 

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

Leave a Comment