नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण सिमला मिरची विषयी माहिती घेणार घेणार आहोत सिमला मिरचीला मागणी भरपूर प्रमाणात वाढताना आपणास दिसते सिमला मिरची शेती कारण्यासाडी काय नीवेजन करावे याची संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी बंधुनो निवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याच बरोबर जोड वेवसाय करणे गरजेचे आहे सिमला मिरचीची मागणी फार प्रमाणात वाढलेली आहे शहरी भागात जास्त मागणी आहे हॉटेल मध्ये त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो
महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पक्व असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजी शिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवी मधील फरक हा मुख्यत्वे करून फळामधील कॅपीसीन च्या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्केपर्यंत असते
हवामान
ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास व ठिपके पडल्यास या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो हरितगृहात किंवा शेडनेट हाउसमध्ये लाल माती, शेणखत, वाळू, भाताचे तूस यांची शिफारस केल्याप्रमाणे. (लाल माती-70 टक्के, शेणखत -20 टक्के, भाताचे तूस-10 टक्के याशिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ उदा. निंबोळी पेंड, बोनमिल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना त्यात घालाव.) रितगृहामध्ये बी उगवण्यापासून ते झाडांची वाढ, फुले व फळ धारणा होण्यासाठी तसेच फळांची वाढ होण्यासाठी प्रत्येक वेळी निरनिराळे तापमान सापेक्ष आर्द्रता नियंत्रत करावी लागते. बियाण्यांची समाधानकारक उगवण होण्यासाठी माध्यमातील तापमान 26अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. बियाण्यांची उगवण झाल्यावर रोपांची वाढ होण्यासाठी हरितगृहातील तापमान दिवसाचे तापमान 23 अंश सेल्सियस व रात्रीचे तापमान 20 अंश ते 21 अंश सेल्सियसपर्यंत नियंत्रित करावे. शेडनेट हाउसमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची लागवड यशस्वीपणे करता येते, परंतु शेडनेटमधील सिमला मिरची फळांचे उत्पादन हरितगृहांतील उत्पादनापेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी येते. महाराष्ट्रातील शेतकरी हरितगृहात आणि शेडनेट हाउसमध्ये सिमला मिरचीची लागवड करीत आहेत. एकंदरीत सिमला मिरचीचे हरितगृहात उत्पादन घेण्यासाठी रात्रीचे तापमान 18 अंश ते 20 अंश सेल्सियस, दिवसाचे तापमान 21 अंश ते 24 अंश सेल्सियस सापेक्ष आर्द्रता 70 ते 75 टक्के आणि प्रकाशाची तीव्रता 50,000 ते 60,000 लक्स असणे आवश्यक असते
सिमला मिरचीसाठी जमीन कशी असावी

ढोबळी मिरचीला जमिन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या पोयटयाच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असावा.
लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी 15-20 सें.मी. खोलीपर्यंत मशागत करून म्हणजे जमीन उभी आडवी नांगरट करून घ्यावी.आणि सेंद्रिय पदार्थ जसे की कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शणखत टाकून माती तयार करावी. यामुळे माती पोकळ आणि पोषक तत्वांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल. पूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर पाच ते सहा फुटांनी बेड पाडून घ्यावेत. लागवडीपूर्वी संतुलित NPK खत 60:40:40 किलो/हेक्टर दराने वापरण्याची शिफारस केली जाते. बेड पाडून झाल्यानंतर त्यावर ३० मायक्रॉन चा मल्चिंग पेपर अंथरून घ्यायचा आहे
नविन हायब्रीड वाणांच्या सहाय्याने, ढोबळी मिरची हे पिक आता काही प्रमाणात उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागात देखिल घेतले जावु शकते. ज्या वेळेस तापमान हे ३० डि. से. पेक्षा जास्त असते त्यावेळेस ढोबळी मिरची पिकाची शाकिय वाढ जास्त प्रमाणात होते, शेंडाकडील वाढ जोमात होते, पिकावरिल फुलांचा संख्या आणि फळांची संख्या ह्यावर विपरित परिणाम होतो. ढोबळी मिरची पिकास दिवसाचे तापमान ३० डि.से. पेक्षा कमी असलेले मानवते. दिवसाचे तापमान २४ ते ३० डि.से. आणि रात्रीचे तापमान १५ ते १७ डि.से. असल्यास फुलधारणा आणि फळधारणा ह्यात मदत होते
ढोबळी मिरची लागवड डिजिटल पद्धतीने कधी करावी
पुर्नलागवड करण्यासाठी 60 सेमी अंतराने स-या काढाव्यात. रोपे सरीच्या दोनही बाजूस सरीच्या बगलेत 30 सेमी अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पूर्नलागवड शक्यतो दुपारी 4.00 नंतर करावी. व रोपांना लगेच पाणी द्यावे. रोपांची लागवड केल्यानंतर रोपांना तीन ते चार खते, टॉनिक व बुरशीनाशकांच्या आळवण्या कराव्यात. सिमला मिरचीला नियमित पाणी पिण्याची गरज असते, विशेषत: फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत. शेतकऱ्यांनी झाडांना दर आठवड्याला २ वेळा मुबलक पाणी मिळेल याची खात्री करावी.
अधिक रोपे तयार करण्यास निवडलली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी.
त्यानंतर तीन मीटर लागवडीसाठी लांब 1 मीटर रूंद व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून वाफयावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफयांच्या रूंदीला समांतर अशा 2 सेमी खोलीच्या रेघा ओढून त्यांत फोरेट 10 जी हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफयात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे व बियाण्यांची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफयांना झारीने हलकेसे पाणी दयावे. बी 6 ते 8 आठवडयाने लागवडीस तयार होते
हिरवी मिरची पिकवण्यासाठी सर्वोत्तम हंगाम कोणता आहे
ढोबळया मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात करतात. त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रूवारी या कालावधीत करता येते यामुळे सर्वोत्तम हंगाम आणि चांगल्या प्रकारे समजले जाते आणि त्याचा फायदा उरपादनात वाढ होताना दिसतो
आंतरमशागत डिजिटल पद्धतीने
मिरचीचा मळा नेहमी स्वच्छ असणे आवश्यक असते. त्यासाठी सुरुवा

तीच्या काळास जरूरीप्रमाणे दोन तीन वेळा निंदणी करावी. तसेच झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा.झाडाच्या बुडाला नेहमी मातीचे थर द्यावे त्यामुळे झाडाची झीज होणार नाही याची काळजी घावी तसेच वेळोवेळी खुरपणी करावी तन नास्काच वापर करावा
1) झाडाला आधार देणे :-
सिमला मिरची तिच्या पूर्ण वाढीच्या काळात 10 ते 12 फुटापर्यंत वाढते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते
2)रोपांचा शेंडा खुडणे : रोपांची लागवड झाल्यानंतर 21 दिवसांनी रोपांचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा.
3)छाटणी/पिंचिंग :- झाडाला आकार येण्यासाठी झाडाची छाटणी आवश्यक आहे. फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून छाटणी आवश्यक आहे.
फळांची विरळणी :– सुरवातीच्या अवस्थेमध्ये नैसर्गिक फुले आणि फळांची गळती होते आणि झाडाचे शाकीय वाढीत संतुलन होते. परंतु एकाच वेळेस भरपूर फळे आली तर त्यापैकी काही फळे काढणे आवश्यक असते. त्यामुळे उरलेल्या फळांचा विकास चांगला होतो. याला फळांची विरळणी म्हणतात.
सिमला मिरची व खत वेवस्तापन
रंगीत सिमला मिरची पिकांची निरोगी आणि संतुलित वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व मिरची फळांची आकार, वजन आणि चव वाढवण्यासाठी ‘माइक्रोला’ची पहिली फवारणी 60-65 दिवसांनी सायंकाळचे वेळी पानांच्या दोन्ही बाजूंवर करावी. शिमला मिरचीला नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) यांचा संतुलित पुरवठा आवश्यक असतो. नायट्रोजन वनस्पतिवृद्धी वाढवते, फॉस्फरस मुळांच्या विकासास प्रोत्साहन देते आणि पोटॅशियम फळांच्या विकासास प्रोत्साहन देते. शेतकऱ्यांनी 18:18:18 किंवा 20:20:20 च्या NPK गुणोत्तरासह खतांचे मिश्रण निवडावे. सिमला मिरचीच्या झाडांची जोमदार वाढ होणेसाठी, भरपूर उत्पादन आणि फळांची प्रत चांगली मिळण्यासाठी 40 आर आकारमानाच्या हरितगृहांतील सिमला मिरचीस नत्र 80 कि. ग्रॅ. स्फुरद 72 कि. ग्रॅ. आणि पालाश 80 कि. ग्रॅ. विद्राव्य खते वापरून झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावेत. सोबत लोह, मॅग्नेशियम, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा द्यावीत. फळधारणा झाल्यावर मिरची फळे वाढण्याच्या काळात सुजला 19:19:19 विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात
रोग व कीड नियंत्रण
सिमला मिरची हे ऍफिड्स, थ्रिप्स आणि बॅक्टेरियल विल्ट यांसारख्या कीटक आणि रोगांसाठी देखील संवेदनाक्षम आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे झाडांचे निरीक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरावीत
मर :-
या रोगामध्ये शेंडयाखालील भाग वाळत जातो. हा रोग फायटोप्थोरा या अळिंबीच्या प्रकारामुळे होतो
उपाय –
रोगग्रस्त झाडे समुळ नष्ट करावीत व राहिलेल्या झाडांच्या मुळाजवळ 0.6 टक्के तीव्रतेने बोर्डो मिश्रण ओतावे
पांढरी मासी :-
हि कीड खोड मधील रस शोषण करते त्यामुळे खोड कमजोर बनतात पाने गळून पडतात आणि झाडे सुकतात
उपाय :-
प्रोफेनोफेस १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे
बोकडया –
हा व्हायरस रोग असून या विषाणूंचा प्रसार माव्याच्या किडीमार्फत रोगट झाडा पासून चांगल्या झाडाकडे होत असतो. या रोगामुळे पाने आखडून झाडांची वाढ खुंटते. झाडांना फूले येत नाहीत. व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
उपाय –
रोगग्रस्त झाडे समुळ उपटून नष्ट करावीत. 1 किलो मोनोक्रोटोफॉस प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन झाडांवर दर 15 दिवसांचे अंतराने नेहमी फवारणी करावी.
मावा :-
हे कीटक मिरचीच्या कावळ्या पानातील आणि सेन्ड्यातील रस शोषण करते
उपाय मिरची लागवडी नंतर १० दिवसांनी १५ मिली मोनोकोटोफास १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
भुरी :-
या रोगामुळे मिरचीच्या पानाची वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकडी दिसते या रोगाचा पादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात
उपाय ३० ग्राम पाण्यात मिसळणारे गंधक व १० मिली करॉथॉन १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांनी अंतराने पिकावर दोन फवारण्या करावेत
काढणी व उत्पादन
- फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी.
- त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा.शिमला मिरची लावणीनंतर ६०-७० दिवसांनी फळ देण्यास सुरुवात होते.
- फळे कापणीसाठी तयार असतात जेव्हा ते टणक, चमकदार आणि मोठ्या आकाराचे तयार होतात, यावेळी फळांची काढणी चालू करावी.
- फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते.
- फळे झाडावरून देठासहीत काढावीत.
- साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्व पिक निघते.
- फळे तोडण्यासाठी धारदार चाकू किंवा कात्री वापरावी
- काढणी सकाळी करावी व सूर्योदयापूर्वी संपवावी.
शिमला मिरचीला एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळते.
विक्री आणि नफा
देशांतर्गत आणि निर्यात बाजारात शिमला मिरचीला मोठी मागणी आहे. शेतकरी आपला माल घाऊक बाजार, स्थानिक भाजी मंडई किंवा थेट किरकोळ विक्रेत्यांना विकू शकतात. त्यांचा नफा वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांनी बाजाराच्या निर्देशांकात बसणारी उच्च-गुणवत्तेची फळे तयार करण्यावर भर दिला पाहिजे.
शेवटी, भारतीय शेतकऱ्यांनी योग्य पद्धतींचे पालन केल्यास सिमला मिरची शेती हा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. योग्य जातीची निवड करून, लागवडीची तयारी करून, रोपांची लागवड आणि काळजी, काढणी व्यवस्थापन आणि विक्री आणि नफा यावर लक्ष केंद्रित करून शेतकरी त्यांचे उत्पादन आणि नफा वाढवू शकतात.
शिमला मिरचीचे फायदे
- शिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात आणि त्यात ए, बी 6, सी, ई आणि के 1 जीवनसत्त्व असतात. शिमला मिरची अशक्तपणासारख्या विविध आजारांपासून आपला बचाव करू शकते. ती त्वचा स्वच्छ ठेवण्यास आणि केसांच्या वाढीसाठी देखील मदत करू शकते.
- शिमला मिरची रक्त प्रवाह वाढवून रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून आणि हृदयरोग रोखण्यासाठी देखील मदत करू शकतात
- स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय ह्या प्रकारच्या कॅन्सर मध्ये फायदेशीर आहे.
- शिमला मिरची चयापचय metabolism वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
- बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सीच्या उच्च पातळीमुळे शिमला मिरची आपल्या डोळ्यांना मोतीबिंदूपासून वाचवते.
- शिमला मिरची आपल्या शरीरातील रक्त प्रवाह नियमित करण्यात मदत करते.
- निरोगी राहून रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा आणि सांधे तयार करण्यासाठी मजबूत कोलेजन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते.
- शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात असलेली अँटी-ऑक्सिडेंटस् त्वचेला हानिपासून वाचवतात
ला एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळते.
पोटदुखी :-पोटदुखी आणि बिघडलेले पोट असे काही काही दुष्परिणाम जास्त प्रमाणात शिमला मिरची खाल्ल्याने होऊ शकतात.शिमला मिरची किंवा जास्त मिरचीचा आहार घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो.
शिमला मिरचीमुळे शस्त्रक्रिये दरम्यान आणि नंतर अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो.