बांबू बहुउपयोगी असल्याने दिवसेंदिवस बांबूच्या मागणीत वाढ होत चालली आहे. यामुळे आता शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीकडे पाहिले जात आहे. पारंपारिक पिके सोडून बांबूची लागवड (bamboo Farming) आपल्यासाठी चांगली कल्पना असू शकते. बांबूची लागवड करुन आता शेतकरी कोट्यवधींची कमाई करू शकतात.बांबू हा शेतकऱ्यांसाठी हिरवे सोने आहे. बांबूपासून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकूण शेतीच्या किमान दहा टक्के शेतीमध्ये बांबूची लागवड करावी. हवामानाशी व वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या बांबूच्या सुमारे १४०० जाती आहेत.या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्याला कीटकनाशक कमी प्रमाणात वापरावी लागतात. त्यामुळे बांबू शेती फायदेशीर आहे. मात्र तीन वर्षांनंतर उत्पादन मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.बांबू लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती ओसाड जमिनीवरही करता येते.बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने (Green Gold) असे संबोधले जाते. देशात बांबूची बाजारपेठ सुमारे २६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ठ आहे. विशेष म्हणजे एकदा बांबू लागवड केल्यानंतर शेतकरी पुढील 40 वर्षे नफा मिळवू शकतात. त्याच वेळी, बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय बांबू मिशन देखील सुरू केले आहे. बांबू पासून जैविक इंधन देखील अलीकडे तयार केले जात आहे जैविक इंधनाची वाढती मागणी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बांबूची लागवड तीन पद्धतीने केली जाते. बांबूची लागवड ही बियाणे पेरून, कलम पद्धतीने तसेच रायझोम पद्धतीने करण्यात येते.
बांबू लागवड कशी करावी?
बांबू लागवड | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उत्तम निचरा | ||||||||||
तांबडी गाळाची,मुरूम युक्त, किंचित आम्लधर्मी | ||||||||||
|
बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही. सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते.बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत ‘५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खडे खोदावेत.पेिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून, अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.

बियाण्याची पेरणी
साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या तऱ्हेने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यात लागवडीसाठी वापरता येतात. पॉलिथिन पिशवीत लावून बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवित सुद्धा लावून करता येते. कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर दोन ते तीन डोळे असणे आवश्यक असते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबुची काढणी करू नये, कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.
पाणी व्यवस्थापन
साधारणपणे 750 ते 800 मिलिमीटर पाऊस पडत असलेले ठिकाणी बांबूस पाणी देण्याची गरज भासत नाही. तरीही लागवडीनंतर एक ते दोन वर्ष विशेषता उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीमध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक ते दोन वर्षानंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.
महाराष्ट्रातील बांबूच्या जाती
महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या जाती आढळून येतात तर कळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यावरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत. विदर्भात मानवेल, कटांग, गोल्डन बांबू तर कोकणात मांडगा व चिवार बांबू जंगलात आणि शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या आढळून येतात.
मानवेल

ही महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाणारी जात असून हिचे शास्त्रिय नाव डेंड्रोकॅलॅमस स्ट्रकट्रस् (Dendrocalamus strictus) असे आहे. या जातीचा फुलण्याचा कालावधी 30 ते 35 वर्षे आहे. योग्य वातारण आणि चांगल्या देखभाली खाली या बांबूची उंची 25 ते 50 फुटापर्यंत जावू शकते तर गोलाई दोन ते साडेतीन इंच होवू शकते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड, खाण्यासाठी कोंब, चारा आणि शेतीकामासाठी काठ्या म्हणून होतो.
माणगा
याच जातीला मेस असेही म्हणतात. याचे शास्त्रय नाव डेंड्रोकॅलॅमस स्टोक्सी (Dendrocalamus stocksii) असे असून, याचा फुलण्याचा ठरावीक असा कालावधी नाही. याची योग्य वातारणात देखभाल केल्यास याची उंची सर्वसाधारण 25 ते 40 फुटापर्यंत जाते तर जाडी दोन ते साडेतीन इंच होते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा आणि शेतीमधील कामासाठी काठ्या म्हणून होतो. हा बांबू सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच कोकणात लागवडीसाठी योग्य असून इतर ठिकाणी लागवड केल्यास याची उंची आणि जाडी कमी राहू शकते.
एस्पर

- याचा फुलण्याचा कालावधी 60 ते 80 वर्षोपर्यत आहे.
- याची उंची 60 ते 80 फुटापर्यंत जावू शकते तर जाडी 6 ते 8 इंच होवू शकते.
- कोंब, बांधकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन व प्लायवूड म्हणून करता येतो
बुल्का
या बांबूच्या जातीला वनन, ब्रांडीसी असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव डेंड्रोकॅलॅमस ब्रांडीसी (Dendrocalamus brandisii) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 45 ते 60 वर्षे असा आहे
याची उंची 60 ते 80 फुटापर्यंत जावू शकते तर याची जाडी 6 ते 8 इंचापर्यंत होतेविणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड तसेच खाण्यासाठी कोंब म्हणून होतो
देवबांस
या जातीच्या बांबूला जारी, किरंती, वारी, मकार, मिरतींगा, रॉथिंग, पाओशिडीग, पिंग असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा तुल्दा (Bambusa Tulda) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 30 ते 60 वर्षे असून, याची पोषक वातारणात देखभाला केल्यास याची उंची 50 फूट तर जाडी सव्वातीन इंच होऊ शकते
टूल्डा
फुलण्याचा कालावधी 35 ते 60 वर्षे आहे उंची 35 ते 45 फुटापर्यंत जावू शकते तर जाडी दोन ते साडेतीन इंच होवू शकते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड, खाण्यासाठी कोंब, जनावरांसाठी चारा, शेतीसाठी काठ्या यासाठी केला जातो
बांबू लागवडीचे उद्दिष्टे
१. वातावरणातील कार्बन उत्सर्जनामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष आच्छादन वाढवणे, जमिनीतील सेंद्रिय घटकांचे संवर्धन, पीक आणि पीक पद्धतीतून उत्पादकता वाढविणे.
२. जमिनीची धूप थांबविणे व जमिनीचा कस वाढविणे.
३. शेतीपिकांना पूरक म्हणून बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे.
४. शेतीपद्धतीवर आधारित बांबू लागवडीखालील क्षेत्रात वाढ करून एकमेकांना पूरक व एकात्मिक पद्धतीने पिकांची उत्पादकता वाढविणे, रोजगाराच्या संधी, उत्पन्नाच्या संधी व ग्रामीण भागातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारणे यासाठी प्रोत्साहन देणे.
५. विविध कृषी पर्यावरणीय प्रदेश आणि जमीन वापराच्या परिस्थितीनुसार बांबूसाठी अनुकूल पद्धती /आदर्श पद्धती लोकप्रिय करणे.
६. शेतीपद्धतीवर आधारित बांबू लागवड क्षेत्राचा विस्तार व क्षमता बांधणीसाठी सहाय्य करणे.
बांबू लागवडीमधील तण काढणे
बांबू पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर किट व रोगनियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लागवडीनंतर एक वर्ष पिकाचे निरीक्षण करावे लागेल. यासोबतच लागवडीनंतर दर महिन्याला पिकात खुरपणी केली. वेळोवेळी तण काढल्याने बहुतेक तण नष्ट होतात. बांबूची शेती याशिवाय, लावणीच्या दुसऱ्या वर्षी रोपांभोवती 2 ते 2.5 मीटरचे वर्तुळ करून त्यात 30 सें.मी. खोल खणून घ्या.
बांबू लागवडीमध्ये खत व्यवस्थापन
बांबूच्या लागवडीमध्ये तुम्हाला खते किंवा खतांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. मी तुम्हाला लेखाच्या सुरुवातीला सांगितले होते की तुम्ही फार कमी गुंतवणूक करून बांबू शेती सुरू करू शकता. बांबूच्या शेतीत, सिंचनात खूप लक्ष द्यावे लागते. बांबू लागवडीसाठी भरपूर पाणी लागते. काही जाती आहेत ज्यांना जास्त पाणी लागत नाही.
बांबू वरील रोग व व्यवस्थापन
बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळे सडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, विचेस बूम या रोगात रोपांची वेडीवाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणा-या ब्लाईट या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी सेरेशन या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी प्रतिजैविकांचाही आजकाल उपयोग केला जातो
बांबू वरील कीटकाचा प्रादुर्भाव
- पाने खाणा-या किटकांमुळे पानावर छिद्रे पडतात.
- सायपरमेष्धिन (o.o२ टक्के) किंवा मॅलिथिऑन ५o ई.सी. (o.o२ टक्के) पाण्यामध्ये मिसळून फवारावे. बीजकृमीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३o ई.सी. या औषधाचा पाण्यात मिसळून फवारा
- कटी आढळून येते, अशावेळी या मुंग्याच्या बंदोबस्तासाठी सायपरमेश्रीन (०.४ टके) डिझेल/ऑईलमध्ये मिसळून फवारावे.वाळवी/उधईच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या ठिकाणी थायमेट आणि तोडलेल्या बांबूवर सी.सी.ए. (कॉपर क्रोमियम अरसेनिक) फवारावे. नवीन कोवळे बांबू,पोखरणा-या कीटकांसाठी डायमेथोएट (०.०१ टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (०.२ टक्के) पाण्यात मिसळून फवारावे. बांबू हा पानझडी वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे आगीपासून संरक्षण करावे.
- खालील प्रपत्रात दिल्यानुसार टिश्यू कल्चर बांबू प्रजातीची रोपे उपलब्ध आहेत व त्याचे दर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने मंजूर केलेले आहेत.
अ.क्र | टिश्यू कल्चर बांबू प्रजातीचे नांव | मंजूर दर |
01. | मानवेल (Dendrocalamus Strictus | 35/- |
02. | कटांग (Bambusa Bambusa) | 35/- |
03. | माणगा ( Oxytenenthara stocksii | 35/- |
04. | बालकोवा (Bambusa balcooa) | 30/- |
05. | ब्रॉन्डीसी (Dendrocalamus brandissi) | 35/- |
06. | न्यूटन्स (Bambusa Nutans) | 35/- |
07. | अँस्पर (Dendrocalamus asper) | 25/- |
08. | टूल्डा (Bambusa Tulda) | 35/- |
09. | लॉजीसपॅथीस (Dendrocalamus longispathes) | 35/- |
बांबू लागवडीचे फायदे-
- बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता राहत नाही.बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटा मध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात. पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड करता येते.
- इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के खर्च कमी येतो. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळते.
- बांबू हे गवत आहे कोळशाला पर्याय म्हणून याचा वापर करता येतो. शिवाय बांबूपासून जर्सी तयार करता येते. या जर्सीमुळं घाम फुटत नाही
- बांबूचा वापर कपडे तयार करणे ,साॅक्स तयार करणे, अशा अनेक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो
बांबू लागवड पोखरा योजना अंतर्गत
मलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या लाभार्थी
१. गाव समूहातील इच्छुक शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
२. पूर्व संमती प्राप्त झाल्यावर विहीत वेळेत काम सुरु करावे .
३. सदर घटकाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याने जमीन आरोग्य पत्रिका काढावी.
४. संबंधित कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनानुसार शासकीय अथवा शासनाची मंजुरी असलेल्या किसान रोपवाटिकेतून बांबू रोपे घ्यावीत.
५. कृषी सहाय्यकामार्फत नियोजित प्रकल्प क्षेत्राची पाहणी करून शिफारस केल्यानंतर व उपविभागीय कृषि अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता दिल्यावर लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष रोपांची लागवड करावी. देय अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी करावी व रोपे खरेदीची व इतर साहित्याची आवश्यक देयके संकेतस्थळावर अपलोड करावीत .
६. प्रकल्पांतर्गत शासनाने ठरवून दिलेली खर्च प्रमाणके सहभागी लाभार्थ्याने मान्य करावीत. प्रमाणापेक्षा जास्त होणाऱ्या खर्चाची जबाबदारी लाभार्थ्याने स्वतः घ्यावी. त्यासाठी आवश्यक असणारी खड्डे खोदणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, रोपांची वाहतूक करणे, त्यांची लागवड करणे, रोपांना कुंपण करणे व वेळोवेळी निंदणी करून पाणी देणे इत्यादी कामे करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील.
अटल बांबू समृद्धी योजना
बांबू लागवड केल्यापासून ४ ते ५ वर्षानंतर त्याचे उत्पादन मिळायला सुरुवात होते . भारतात दरवर्षी ६० दशलक्ष कोटी रुपये बांबूची आयात केली जातीय. जवळपास 26 हजार कोटींची बाजारपेठ बांबूंची आहे. बांबूच्या बाजारपेठेमध्ये आपल्या भारत देशात बोर्ड कार्टेज, इंडस्ट्रीज प्लाय बोर्ड, बांबू फर्निचर, बांबू पल्प व बांबू मॅट इत्यादी बाबींचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या वतीने बांबू मिशनची स्थापना केलेली आहे. केंद्र शासनाच्या या मिशन अंतर्गत शेतकरी बांधवांना बांबूच्या झाडांची लागवड करण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बांबूच्या रोपांचा पुरवठा करणे तसेच लागवडीवर अनुदान देणे यासारख्या बाबीवर केंद्र शासन भर देत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र (Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra) शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याकरिता शासन मान्यता दिलेली आहे.
atal bamboo samruddhi yojana ची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
- या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना टिशू कल्चर बांबूच्या रोपांचा पुरवठा करणे.
- बांबूच्या लागवडीसाठी शेतकरी बांधवांना अनुदान वितरण करणे.
- महाराष्ट्र राज्यातील बांबूच्या लागवडीचे क्षेत्र वाढविणे.
- बांबूच्या लागवडीमुळे शेतकरी बांधवांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणे.
- बांबू पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.
हे पण वाचा
सिमला मिरचीची शेती डिजिटल पद्धतीने
नॅशनल बांबू मिशनचे उद्दिष्टेे
1) वन रहित शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात बांबूची लागवडीत वाढ घडवून आणणे.
२)कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून लागवड तसेच जमिन आणि हवामान व पर्यावरण समतोल राखण्यासाठी.
३) उद्योगासाठी ग गुणवत्तापूर्ण कच्चा मालाच्या आवश्कतेच्या पूर्ती साठी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे.
४) मुख्यतः शेतकऱ्यांना शेतात व घराजवळ बांबूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.
५) सामूहिक जमीन, शेतीयोग्य कोरड जमीन, आणि नदी नाल्याजवळ बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.
अटल बांबू योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड
- आधार कार्ड प्रत
- शेतीचा गाव नमुना सातबारा ,गाव नमुना आठ , गाव नकाशाची प्रत
- ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याचा दाखला
- बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार बँक खात्याशी जोडणे आवश्यक राहील
- बांबू लागवड करत असलेल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून स्वरक्षण व्हावे तसेच रोपे लहान असताना यासाठी कुंपण असणे आवश्यक आहे झाडांच्या चांगल्या वाढीसाठी ठिबक सिंचन असल्याचे हमीपत्र .
- जिओ टॅग/जीआयएसद्वारे फोटो काढल्याचे हमीपत्र
- शेतामध्ये विहीर /शेततळे /बोअरवेल असल्याचे हमीपत्र