डिजिटल शेती विषयक माहिती. - डिजिटल बळीराजा

डिजिटल शेती विषयक माहिती.

नमस्कार शेतकरी बांधवांनो डिजिटल बळीराजा यामध्ये आपले स्वागत आहे. डिजिटल बळीराजा हे नुसता माहिती देणारे नसून माणुसकी जोडणारी म्हणजे नाते  जोडणारी वेबसाईट  आहे. आपल्या शेतकरी बांधवांना कशाप्रकारे मदत करता येईल, आणि निरनिराळ्या तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करून घेता येईल, आणि कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कशा प्रकारे होईल यासाठी डिजिटल बळीराजा याचा संशोधन करते व मार्गदर्शन करते.

डिजिटल शेती विषयक माहिती.

शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच आहे की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. शेतीसोबत जोड व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी बांधवांनो आजची शेती ही परंपरानुसार केली जात नाही. यामध्ये नवनवीन बी बियाणे तसेच खत औषधे  शेती मशागत काढणी यंत्रे, पेरणी यंत्र, यांचा समावेश झालेला आहे. शेतीला  ग्रामीण भागात प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले जाते. ग्रामीण भागातील आपले शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून आहे.

डिजिटल शेती म्हणजे काय?

शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून शेतजमिनीवरील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकाची केलेली लागवड म्हणजेच शेती होय.

डिजिटल शेती का करावी?

आज दिवसेंदिवसे महागाई वाढत चाललेली असल्यामुळे त्यामानाने उत्पन्न मात्र कमी आणि खर्च मात्र जास्त होत आहे. यासाठी आपणास पारंपारिक शेती न करता डिजिटल शेती करावी लागणार आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आपणास शेतीची मशागत पासून ते पीक काढणीपर्यंत तंत्रज्ञानाचा  उपयोग करुन घ्यावा  लागणार आहे.

आता मात्र बाजारामध्ये नवनवीन बियाणे कीटकनाशके काढणी यंत्रे मशागत यंत्रे पेरणी यंत्रे असे वेगवेगळ्या प्रकारची यंत्र मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापरामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न होतो. लागणारा वेळ वाचेल आणि उत्पन्नात वाढ होईल. डिजिटल तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ वाचत आहे आणि उत्पन्नामध्ये भर पडत आहे. पेरणी वेळोवेळी होते मशागत चांगल्या प्रकारे होते. जमीन सुपीक राहते. मऊपणा राहतो. यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना डिजिटल शेती करावा लागणार आहे.

 

शेतीची मशागत का करावी?

 

 

शेतीची मशागत मार्च आणि एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते, वाढत्या उन्हामुळे शेतकरी बंधू सकाळी लवकर उठून मशागतीची यंत्र घेऊन शेतात जातात. ट्रॅक्टर द्वारे नागरेट करणे, कचरा गोळा करणे, उलटण करणे, अ

से वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे कामे मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत मशागतीचे काम शेतकरी बांधव करत राहतो. जसे बांधावरील झाडे तोडणे शेतामधील काडीकचरा जमा करणे धसकटे जमा करणे रुटर चालवणे वेगवेगळ्या प्रकारे काम शेतकरी बांधव करत राहतो.

शेतीची मशागत लवकर केली तर त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात फायदा होतो. उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाचे प्रयत्न वाढत आहेत. औद्योगीकरण नागरिकरण तसेच तरुणाचा शेतीकडील कमी झालेला ओढ अशा अनेक समस्यांमुळे शेतीची उत्पत्ती कमी होताना आपणास दिसते. शेती ही काळाची गरज झाली आहे कारण शेरी भागातील शेतीही पूर्णपणे औद्योगीकरणांमध्ये गेली आहे.

मशागतीने जमिनीचे थर खालीवर होतात जमीन भुसभुशीत व नरम होते. तसेच पावसाळ्याचे पाणी वाहून न जाता जमिनीमध्ये मुरते त्यामुळे जमिनीत ओलावा साठवून राहतो मशागतीमुळे जमिनीवर येणारा गवत तन कमी होते. खत चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळतो जमिनीत रासायनिक क्रिया जास्त चांगल्या प्रकारे होऊन जमिनीतील पोषक अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते व उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते.

पिकांची पेरणी किंवा लावणी करण्यापूर्वी शेतीची जी कामे केली जातात त्यांना पूर्व मशागत म्हणतात जसे जमीन नागरने ढेकळे फोडणे जमीन सपाट करणे पाण्याची वळण काढणे शेतीमधील काडीकचरा  जमा करून पुजून घेणे शेतीमध्ये शेणखत टाकून घेणे,हे सर्व कामे पेरणी करायच्या अगोदर करावे लागते.

दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी काही खोल नागरट करावी लागते चिकन मातीची प्रमाण 50% किंवा त्याहून अधिक असेल तर अशा जमिनीतील निश्चारक्षमता सुधारण्याकरता त तीन ते चार वर्षातून एकदा खोल नागरट करावी लागते नागरलेली जमीन जास्त दिवस उन्हात आपल्यामुळे निर्जतूक घेऊन तिची सुपीकता वाढते व पोत सुधारते. उन्हाने नागरिक निघालेली ढेकळे ठिसूळ होतात व ती नंतर अवताणे लोटणे सोपे जाते. ज्या भागात फक्त कोरडवाहू शेती केली जाते अशा जिराईत जमिनिनित नागरड केल्यानंतर ढेकळे कुऱ्हाळाच्या फाळ्या देऊन फोडतात.

पेरणी कशा प्रकारे केली जाते?

धान्य भाजीपाला फुले फळे बागायती कुरडवाहू यासारख्या कोणत्याही पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्या त्या बियाण्याचे पद्धतशीर लागवड करणे

आवश्यक असते. पूर्वी माती उकरून  हाताने बी बियाणे पेरणी केली जायची. आता मात्र तसे राहिले नाही कारण आज नवनवीन तंत्रज्ञान पेरणी यंत्रे बाजारांमध्ये उपलब्ध आहेत.

बीज विकीकरण हा पूर्व पार चालत आलेला पेरणीचा प्रभात आजही यात काही विशिष्ट करण्यासाठी विशिष्ट पिकाच्या बाबतीत वापरला जातो. खार जमिनीत जिथे भाताची बी बियाणे अवताने पेरता येत नाही त्यासाठी तेथे भिजवून मोड आणलेली बी बियाणे बिज विकरण पेरणी यंत्राच्या साह्याने पेरली जातात.

पेरणी यंत्रे

 

पेरणीचा दुसरा प्रकार जमिनीत बी टोचून लावणे

पारंपरिक शेती करताना अगोदर आपले शेतकरी बांधव बी टोचून लावायची आता मात्र बी बियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र उपलब्ध आहे धान्य पिकांमध्ये पडफळा दोटका भोपळा, कारली इत्यादी, कडधान्यांमध्ये ज्वारी मका गहू सोयाबीन तेलबियामध्ये भुईमूग करडई सूर्यफूल इत्यादींसाठी बी टोचून लावली जायची. आता मात्र यंत्र उपलब्ध असल्यामुळे ट्रॅक्टर पेरणी यंत्र याची मदत घेतली जाते. व कमी वेळामध्ये जास्त शेतीची पेरणी केली जाते.

पूर्वी आपल्याला शेतकरी बंधू पेरणीसाठी वापरली जाणारी ओते मोघे दुसे तिफन चोफणी पाभर आणि सहा फनी पाभर अशी वस्तू पेरणीसाठी शेतकरी बांधव वापरायचा.

कीटकनाशकांची फवारणी कशी करावी

शेतकरी बांधवांनो शेतीचे कामात कीटकनाशकाची फवारणी करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी निरनिराळ्या साधनाचा वापर करावा लागतो कीड व रोग यांचा पराभव लक्षात घेऊन फवारण्याची वेळ ठरवावी लागते त्याच्यात कापूस सोयाबीन मका त्यांच्यावर फवारणी करावा लागते.  अलीकडच्या काळात व्यापारी तत्त्वावर आंबा, नारळ काजू, संत्री, मोसंबी, इत्यादी फळे पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे. या पिकातही योग्य वेळी फवारणी करणे गरजेचे असते. भाजीपाल्यामध्ये जर पाहायला गेलं तर वांगे मिरची टमाटे शेवगाच्या शेंगा काकडी या वर फवारणी करणे गरजेचे आहे.

 

अधिक माहितीसाठी http://www.digitalbalira.com

2 thoughts on “डिजिटल शेती विषयक माहिती.”

  1. खरच गरज आहे आज आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शकाची

    Reply

Leave a Comment