Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र|ऑनलाइन अर्ज नोंदणी,लाभ,पात्रता,नियम वअटी संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र|ऑनलाइन अर्ज नोंदणी,लाभ,पात्रता,नियम वअटी संपूर्ण माहिती मराठी

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra|डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र| स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज 2023 | डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना रजिस्ट्रेशन फॉर्म |डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2023: रजिस्ट्रेशन| Ambedkar Krishi Swavalamban Yojana | Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Maharashtra | Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2023 | Dr Babasaheb Krushi Swavalamban Yojana | Swavalamban Yojana In Marathi|मागासवर्गीय विहीर योजना | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, नोंदणी, लाभार्थी यादी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना PDF 

शेतकऱ्याच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते त्यासाठी सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची शुरुवात करत असते त्या योजनांपैकी एक योजना जिचे नाव Dr.Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे विविध प्रयत्न केले जातात.

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजनांची सुरुवात करते असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील राज्य सरकार या योजनेअंतर्गत नवीन विहिर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच(ठिबक सिचन आणि तुषार सिंचन) ,पीव्हीसी पाईप, परसबाग इ. गोष्टींसाठी अनुदान देणार आहे. महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध उपाययोजना करण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे, 

Table of Contents

Dr.Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra|संपूर्ण माहिती मराठी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सन 1982-83  पासून राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता, सदर योजनेमध्ये सुधारणा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णया अंतर्गत राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विविध उपाययोजनांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.

या योजनेचे पुनर्विलोकन करण्यासाठी नियुक्त समितीने केलेल्या शिफारशी नुसार, विहिरीसाठी अनुदानाची मर्यादा एक लाखावरून दोन लाख एवढी करण्याची शिफारस केलेली आहे, या नुसार आयुक्तालयाने नवीन विहीर बांधणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी दोन लाख, विद्युत पंपासाठी 25,000/- आणि वीज जोडणीसाठी 10,000/- व ठिबक सिंचन संचासाठी 50, 000/-, स्प्रिंकल सिंचन संचासाठी 25,000/- रुपये या प्रमाणे 2,85,000/- रुपये किंवा 2,60,000/- रुपये एवढ्या रकमेची आर्थिक सहाय्यता देण्याची शिफारस केली होती.

सोयाबीन पिवळे पडणे व उपाय

योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र
व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
सूर करण्याची तारीख 27 एप्रिल 2016
लाभार्थी राज्याचे अनुसूचित व नवबौद्ध शेतकरी
अधिकृत वेबसाईट https://agriwell.mahaonline.gov.in/
उद्देश्य अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
श्रेणी राज्य सरकारी योजना
वर्ष 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
राज्य महाराष्ट्र

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्रचे उद्दिष्ट

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी बनवने हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेद्वारे सिंचनासंबंधी कोणतीही सुविधा मिळू शकते. या योजनेंतर्गत 2.5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
 • राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
 • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे
 • राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
 • राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी आकर्षित करणे
 • शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
 • शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 •  जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच(ठिबक सिचन आणि तुषार सिंचन) ,पीव्हीसी पाईप, परसबाग इ साठी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
 • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी उपकरणे खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने स्वावलंबन योजना सुरु करण्यात आलेली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्रचे वैशिष्ट्ये 

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • महाराष्ट्र सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न या योजनेच्या माध्यमातून वाढविण्याचा प्रयत्न करण्यात  येणार आहे
 • ही योजना महाराष्ट्र कृषी विभागामार्फत चालविली जाईल.
 • दीर्घकालीन सिंचन करून आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवल्यास उत्पन्न वाढेल.  या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कोणती आर्थिक मदत दिली जाईल?
 • ही योजना राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते स्वयंपूर्ण होतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतात यांत्रिकी करणाचा वापर करण्यासाठी २.५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.
 • राज्यातील  ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • 27 एप्रिल 2016 रोजी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली.
 • तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन करू शकता.
 • महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एका महत्वपूर्ण योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल
 • अर्ज केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अर्जाची प्रत सर्व आवश्यक कागदपत्रांसह कृषी अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
 • तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
 • या योजनेची निवड प्रक्रिया महा DBT पोर्टलद्वारे लॉटरीद्वारे केली जाईल.
 • या योजनेत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. तथापि, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश नाही.
 • कोरोना संसर्गामुळे ही योजना 2020-21 मध्ये थांबवण्यात आली होती. मात्र, या योजनेचे पुनरुज्जीवन केले जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र चे  फायदे

Dr.Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 
 2. या योजनेचा लाभ राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 3. या योजनेंतर्गत देशातील सर्व कष्टकरी शेतकऱ्यांना सरकारकडून नवीन विहिर बांधण्यासाठी, निधी दिली जाणार आहे.
 4. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांनीअर्ज करणे आवश्यक आहे.
 6. गरीब अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
 7.  राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या योजनेत समावेश केला जाईल.
 8. या योजनेतून राज्यातील गरीब अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
 9. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 27 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे.
 10. तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र अनुदान किती मिळणार आहे?

 • नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख )
 • जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार)
 • इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार )
 • पंप संच– रु. २०,००० (वीस हजार )
 • वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार )
 • शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख)
 • सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)
 • पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार)
 • परसबाग– रु. ५०० (पाचशे)

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजनाचे लाभ

Dr.Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कार्य संबंधित कार्यासाठी 30000/- रुपयांपासून 2.5 लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेचा लाभ देशातील गरीब राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील प्रत्येक गरीब शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून  जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच(ठिबक सिचन आणि तुषार सिंचन) ,पीव्हीसी पाईप, परसबाग इ  देण्यात येईल.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनेल.
 • राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
 • राज्यातील शेतकऱ्यांचे सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास, विहिरीसोबतच पंपसंच, वीज जोडणी आकार, असे एकत्रित 2.85 लाख/2.60 लाख रुपये च्या मर्यादेत व उपसमितीने निश्चित केलेल्या सूत्रांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान अनुज्ञेय राहील, असे एकत्रित पॅकेज देण्यात येईल.
 • राज्यातील नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
 • नागरिकांना शेती कार्य संबंधित लागणाऱ्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजनाच्या संबंधित नियम व अटी

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र  चा लाभ दिला जाईल.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे वय २० वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
 • 60 वर्षांवरील महिलाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
 • या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांच घेऊ शकतात.
 • अर्जदार अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये
 • जर अर्जदारने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र लाभ घेतला असेल तर अशा अर्जदार शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही
 • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार अपंग पुरुष व महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र लाभार्थी पात्रता 

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे 
 • शेतकऱ्याकडे सक्षम प्रधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे 
 • ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घावायाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.40 हे. शेतजमीन असणे आवश्यक आहे.
 • या योजनेंतर्गत सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हे. धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल 
 • ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटका व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान 0.20 हे. शेतजमीन असणे आवश्यक आहे 
 • या योजनेंतर्गत कमाल शेतजमिनीची अट 6.00 हे आहे 
 • शेतकऱ्यांच्या नावाने जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे, (नगरपंचायत, नगर पालिका आणि महानगर पालिका क्षेत्राबाहेरील)
 • लाभार्थी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे 
 • लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे, 
 • स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल.
 • अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न वार्षिक 150000/- रुपये पेक्षा जास्त नसावे 
 • ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न वार्षिक 1,50,000/-रुपये च्या मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांचेकडून त्यावर्षीचा उत्पन्न दाखला घेणे आवश्यक आहे आणि अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)|मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Maharashtra

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • अर्जावर शेतकऱ्याचे अलीकडे काढलेला फोटो 
 • बँकेच्या पासबुकाची प्रत 
 • जमिनीची कागदपत्रे
 • ७/१२, ८अ
 • शपथ पत्र

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम, तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
 • होम पेज आता तुमच्या समोर येईल.
Krushi Swavalamban Yojana Maharashtra
 • तुम्हाला मुख्यपृष्ठावरील नवीन वापरकर्ता लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.
Krushi Swavalamban Yojana Maharashtra
 • त्यानंतर, एक नवीन पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव, जिल्ह्याचे नाव, तालुका, गाव, पिन कोड इत्यादी माहिती भरणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि ओटीपी पाठवा बटणावर क्लिक करा.
 • तुम्ही आता OTP बॉक्समध्ये OTP टाकणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर, आपण आपले वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
 • तुम्ही आता नोंदणी बटणावर क्लिक केले पाहिजे.
 • त्यानंतर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करू शकाल.

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

पोर्टलसाठी लॉगिन प्रक्रिया

सर्वप्रथम, तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
 • पोर्टलवर प्रवेश करा
 • होम पेज आता तुमच्या समोर येईल.
 • मुख्यपृष्ठावरील लॉगिन विभागात, वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
 • तुम्ही आता लॉगिन बटणावर क्लिक केले पाहिजे.
 • तुम्ही या पद्धतीने पोर्टलवर प्रवेश करू शकाल.
अहवाल पाहण्याची प्रक्रिया
 • सर्वप्रथम, तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
 • होम पेज आता तुमच्या समोर येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
 • तुम्ही होम पेजवर रिपोर्ट लिंकवर क्लिक केले पाहिजे.
 • बाबासाहेब आंबेडकर यांची कृषी स्वावलंबन योजना
 • तुमच्या समोर एक नवीन पेज दिसेल, ज्यावर तुम्ही वर्ष निवडणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर, तुम्ही योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निवडणे आवश्यक आहे.
 • आता तुम्ही तुमचा जिल्हा निवडला पाहिजे.
 • त्यानंतर, तुम्हाला पीडीएफमध्ये निर्यात अहवाल पर्याय निवडणे आवश्यक आहे.
 • तुमची संगणक स्क्रीन अहवाल प्रदर्शित करेल.
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
योजनेचे माहिती PD इथे क्लिक करा
हेल्पलाइन नंबर 022-49150800

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Leave a Comment