Madhmashi Palan Yojana Maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)मराठी ऑनलाइन अर्ज,फॉर्म,PDF नोंदणी,पात्रता, अनुदान संपूर्ण माहिती मराठी  - डिजिटल बळीराजा

Madhmashi Palan Yojana Maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)मराठी ऑनलाइन अर्ज,फॉर्म,PDF नोंदणी,पात्रता, अनुदान संपूर्ण माहिती मराठी 

Madhmashi Palan Yojana Maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)|मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2023|Pocra Yojana Maharashtra 2023 In Marathi | मध केंद्र योजना महाराष्ट्र | Madh Mashi Palan Yojana | पोकरा अंतर्गत मधुमाशी पालन योजना 2023 | मध योजना | Madh Kendra Yojana Maharashtra | Madh Kendra Yojana 2023 | मध केंद्र योजना अर्ज प्रक्रिया | Madh Kendra Yojana Application Process | Honey Center Scheme | मधमाशा पालन योजनाऑनलाइन अर्ज, नोंदणी, पात्रता, अनुदान|

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्रआहे.या योजनेची सुरुवात 2019 साली करण्यात आली.मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.महाराष्ट्र राज्यात सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिवीका करत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते.मधमाशांमुळे शेती उत्पनात भरघोस वाढ होत असल्याने मध उद्योगाला अधिक चालना देणे आवश्यक आहे. ज्यामध्ये मधमाश्या एका विशिष्ट बॉक्समध्ये ठेवतात. आणि मध तयार करून तो बाजारामध्ये विकला जातो. मधमाशी ही फुलातील रसाला मधात बदलत असते. त्यास आपल्या पोळ्यात जमा करते.

बाजारात मध आणि त्याच्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे, मधमाशी पालन हा एक फायदेशीर आणि किफायतशीर व्यवसाय म्हणून आता प्रस्थापित झाला आहे मधमाशी पालनाचा पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो. कारण परागीकरण करण्यासाठी मधमाश्या महत्त्वाची भूमिका पार पडतात.Madhmashi Palan हा शेतीवर आधारित उपक्रम आहे, शेतकरी हा उद्योग करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. मधमाश्या फुलांच्या मकरंदाचे  मधात रूपांतर करतात आणि पोळ्यांमध्ये साठवतात. जंगलातून मध गोळा करण्याचा उद्योग फार पूर्वीपासून आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे Madhmashi Palan मधमाशी पालन योजना महाराष्ट्र.

आज आपण madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)ची माहिती आजच्या लेखात पहाणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य काय आहे, या योजनेअंतर्गत लाभ कोणते, पात्रता काय, अटी व शर्ती कोणत्या, फॉर्म , अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्ही हि या योजनेअंतर्गत मधमाशी संच आणि इतर घकांसाठी अनुदान मिळवू इच्छिता, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

Table of Contents

 madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)संपूर्ण माहिती मराठी 

 

मधमाशी पालन हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये लोक मधमाश्या पाळतात आणि त्यांच्याकडून मध किंवा मधमाशी संबंधित उत्पादने गोळा करून ते बाजारामध्ये विकतात शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अशीच एक योजना राबवली जाते. महाराष्ट्र राज्य खाद्य व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वकांक्षी योजना ज्यामध्ये मधमाशी योजनेअंतर्गत होतकरू व इच्छुक शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी मोफत प्रशिक्षण त्यासोबत व्यवसाय करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं.मधमाश्या पोळ्यात किंवा पेटीत राहतात आणि मधमाश्यापालक त्यांना अन्न देऊन त्यांची काळजी घेतात. त्या बदल्यात, मधमाश्या मध बनवतात जे पैसे कमवण्यासाठी विकले जाते.

मधमाश्या पालन हा एक महत्वाचा व्यवसाय आहे कारण मधमाश्या ह्या फक्त मधचं देत नाहीत तर त्या वनस्पतींचे परागकण करण्यात मोठी मदत करतात.मधमाश्यापासून वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये किमतीचा मध मिळू शकतो, मध हे एक शक्तिशाली, पौष्टिक अन्न आणि औषध आहे, मेण हे एक सौंदर्यप्रसाधन उत्पादनातील तसेच औद्योगिक उत्पादनातील महत्वपूर्ण घटक आहे,

मधमाशी पालन उद्योग करण्यासाठी लागणारे साहित्य,मधपेट्या,मधयंत्रे,लोखंडी स्टॅन्ड व इतर साहित्य यासाठी भांडवलाची गरज असते तसेच योग्य मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते. परंतु राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना मधमाशी पालन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे त्यांना मधमाशी पालन व्यवसाय करण्यास खूप साऱ्या अडचणी येतात.शेतकऱ्यांच्या या सर्व अडचणींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने  madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत योजनेची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते व उर्वरित 50 टक्के रक्कम हि लाभार्थ्यांची स्वगुंतवणूक असेल. तसेच पोकरायोजनेतून अर्जदारास कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

किसान ड्रोन योजना महाराष्ट्र 

madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत) उद्देश्य 

 • राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहात मधुमक्षिका पालन भूमिहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पादन मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी चालना मिळणे.
 • या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते
 • मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देऊन उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मधुमक्षिकापालन (पोखराअंतर्गत) या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.
 • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
 • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
 • राज्यातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्यात नवीन उद्योग निर्माण करणे
 • नागरिकांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहित करून मधमाशी केंद्र सुरु करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2023.

madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत) योजनेची वैशिष्ट्ये

 1. मध केंद्र योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
 2. राज्याच्या खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्हास्तरावर या योजनेची अमंलबजावणी केली जाणार आहे.
 3. मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी व मधपाळ या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 4. या योजनेचा लाभ राज्यातील तरुणांसोबत तरुणी सुद्धा घेऊ शकतात व स्वतःचे मध केंद्र सुरु करू शकतात.
 5. राज्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 6.  योजनेअंतर्गत होतकरू व इच्छुक शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी मोफत प्रशिक्षण त्यासोबत व्यवसाय करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं
 7. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून 
 8. ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी चालना मिळणे.
 9. नागरिकांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये.
 10. या योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना दिली जाणारी लाभाची राशी त्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
 11. वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये किमतीचा मध मिळू शकतो,

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

योजनेचे नाव मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)
व्दारा सुरुवात महाराष्ट्र सरकार
राज्य महाराष्ट्र
योजनेची तारीख 2018-19
लाभार्थी राज्यतील भूमिहीन आणि शेतकरी
उद्देश्य मधुमक्षिका पालनाव्दारे राज्यातील भूमीहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पादन मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अधिकृत वेबसाईट https://dbt.mahapocra.gov.in/
विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वर्ष 2022
श्रेणी राज्य सरकार
अनुदान 2 हे. जमीनधारकांना 75 टक्के आणि 2 ते 5 हे. जमीनधारकांना 65 टक्के अनुदान 

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत) योजनेचे फायदे

 

 • शुद्ध मधाचे व  शुद्ध मेणाचे उत्पादन.
 • मधचा औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये बनवताना वापर होतो
 • मधमाशा पालनाचे त स्पर्धा कमी आहे शेती, फळबाग आणि भाजीपाला ह्या व्यवसायला जोडून करता येतो
 • निसर्ग संतुलन आणि संवर्धनत परागीभवन द्वारे  मधमाशा मोठ योगदान करत असतात
 • एक उत्तम नैसर्गिक ऊर्जा देणारा अन्नघटक.
 • उत्कृष्ट प्रतिजैविक आणि जंतुनाशक, स्नायू टॉनिक.
 • यकृत व पोटाचे आजार, खोकला, कफ, दमा यासाठी उपयुक्त
 • त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. थकवा दूर करून कामाची शक्ती वाढवण्यास मदत होते.
 • सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी उपयुक्त
 • मधमाशी पालन योजनेअंतर्गत स्वतःचे मधमाशी पालन सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी,मधपाळ तसेच इच्छुक तरुण/तरुणीस महाराष्ट्र शासनाकडून योजनेच्या खर्चाची 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.
 • पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन हा पूरक जोड व्यवसाय महत्वाचा आहे.
 • मधमाशी पालनात सर्व गोष्टी विकता येतात. मधमाशी पालनात कोणतीच गोष्ट वाया जात नाही.
 • मधमाशी पालनातून पेटी किरायाने देऊन देखील पैसे मिळवू शकतो.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
 • मधमाशी पालन योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून शकतील ज्यामुळे त्यांना नोकरीसाठी वणवण फिरण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • मधमाशी पालन योजनेच्या सहाय्याने राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 • राज्यातील तरुण/तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
 • Honey Bees Venom आणि Royal Jelly: मधमाशीचे विष हे वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात येते.
 • Wax: मधमाशी पालन केल्याने मेन आणि रॉयल जेली मिळते. हे मेन आणि जेली सौन्दर्य प्रसाधनात वापरात येते.
 • Propolis-प्रोपोलिस हे मेडिसिनल पदार्थ दाताचे डॉक्टर वापरतात.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक स्वतःचा स्वरोजगार सुरु करून राज्यातील इतर बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतील.
 • मधमाशी पालन योजनेच्या सहाय्याने शेतकरी स्वतःच्या उत्पन्न वाढ करून शकतील.
 • मधमाशी पालन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना, मधपाळ, तरुण/तरुणींना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी, मधपाळ यांचा आर्थिक विकास होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल व त्याचे भविष्य उज्वल बनेल.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र

madhmashi palan yojana maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत) योजनेच्या पात्रता नियम व अटी

 • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जातील.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना मध केंद्र योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदाराने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या मध माशी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • अर्जदार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 •  अर्जदार व्यक्तिच्या नावे अथवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे.का घरातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • एका कुटुंबातील एकाचा व्यक्तीला या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येईल 
 • लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय हा किमान तीन वर्षे करणे आवश्यक आहे 
 • या योजनेच्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर, ग्रामसभा कार्यालयातील नोटीसबोर्ड, योजनेची कामगिरी, मेळावे, इत्यादिव्दारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी 
 • या योजनेच्या अंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार मधुमक्षिका पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे 
 • मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक इतर व्यवस्था स्वतः करावयाची आहे.

 

madhmashi palan yojana maharashtra 2023 योजना अंतर्गत किती अनुदान मिळते ?

या योजनेच्या अंतर्गत 2 ते 5 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 65 टक्के अनुदान देय आहे. खर्चाचे निकष- कमाल 50 मधमाश्याचे संच (रु. 100000), 50 स्टॅडर्ड मधमाश्याचे खोके (रु. 100000), आणि मध कापणी यंत्र आणि फूड ग्रेड मध कंटेनर (रु. 20000) एकूण 220000 रुपये या घटकांतर्गत खर्च मंजूर आहे.

मधमाशी पालन व्यवसायासाठी किती भांडवल लागते?

मधमाशी व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल हे आपण किती मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु करतो यावर अवलंबून असते. त्यानुसार या व्यवसायासाठी साहित्य विकत घ्यावे लागते, व त्यानुसार भांडल कमी- जास्त लागू शकते. तरी साधारणपणे एका पेटीला ६००० ते ८००० रुपये इतका खर्च सुरुवातीला येतो. जेवढ्या पेट्या तेवढी गुंतवणूक हा व्यवसाय सुरु जाण्यासाठी सुरुवातीला लागते.

Madhmashi Palan Yojana Maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत)  आवश्यक कागदपत्रे 

महाराष्ट्र मधुमक्षिका पालन योजनेला आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील 

 • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
 • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
 • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 • मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र
 • खरेदी समितीचे प्रमाणपत्र

Madhmashi Palan Yojana Maharashtra 2023|मधमाशी पालन योजना महाराष्ट्र (पोकरा अंतर्गत) ऑनलाइन अर्ज कसा करावा 

या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसर करावे

 

Madhmashi Palan Yojana Maharashtra

 

 • पात्र इच्छुक लाभार्थीने या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://dbt.mahapocra.gov.in) ऑनलाइन नोंदणी करून अर्जाला आवश्यक असलेलीं सर्व कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावी
 • त्यानंतर तुमची या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी पूर्ण झाल्यावर, पुढील मार्गदर्शनानुसार अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता.

 

संपर्क माहिती

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
मधुमक्षिका पालन योजना माहिती PDF इथे क्लिक करा
संपर्क माहिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA), 30 अ/ब, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफपरेड, मुंबई 400005. Phone: 022-22163351 Email: pmu@mahapocra.gov.in

 

 

 

मधमाशी पालन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

कोणत्या पिकांमध्ये मधमाशी पालन फायदेशीर असते?

मधमाशी पालन हे सूर्यफूल, मोहरी, गाजर, मका, सीताफळ, आंबा, नारळ, पेरू, सुपारी, सीताफळ,मोसंबी, जांभळी, चिकू, शेवरी, शेवगा, गवत, बिजली ह्या सारख्या विविध पिकांमध्ये उत्तम प्रकारे केले जाऊ शकते.

एका पेटीतुन वार्षिक किती मध मिळतो?

एका पेटीतून वर्षाला सुमारे ४ किलो ते ८ किलो पर्यंत मध मिळू शकतो.

मधमाशी पालनाची सुरुवात कधी करावी?

मधमाशी पालन पावसाळ्याच्या सुरुवातीला केले तर फायदा होतो.

मधमाश्यांचे कोण-कोणत्या किड्यांपासून संरक्षण करावे लागते?

कोतवाल, बेडा, पाल, सरडा, मुंग्या, बेडूक, गोगलगाय, अस्वल, माकड, ग्रीन बिटर यासारख्या किडी व प्राण्यांपासून मधमाश्याचे संरक्षण करावे लागते.

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

 

Leave a Comment