वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध वांग्याची शेती करायची असल्यास शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात - डिजिटल बळीराजा

वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध वांग्याची शेती करायची असल्यास शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध ची सविस्तर माहित पाहणार आहोत .आपण दररोजच्या खाण्यामध्ये वांगी हा प्रकार वापरतो तर वांगी म्हणजे भाजीपाल्याचा एक प्रकार आहे . या पिकाची लागवड शेतकरी वर्षभर पूर्ण हंगामात सुद्धा घेऊ शकतो म्हणजे खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात सुद्धा या पिकाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.कोणत्याही जमिनीमध्ये म्हणजेच कोरडवाहू शेतीमध्ये म्हणा किंवा मिश्र पिके यामध्ये म्हणून वांग्याची लागवड करता येते.

आपल्या आहारात वांग्याची भाजी, वांग्याची भजी, आणि वांग्याची इतर पदार्थ सुद्धा आपण करून त्याचा खाण्यामध्ये उपयोग घेतो.राज्यात अनेक शेतकरी सांगतात की, वांग्याच्या शेतीत (Brinjal Farming) भरपूर नफा मिळतो. कारण त्याचे भाव कधीच कमी होत नसतात की याचा फटका थेट शेतकऱ्यांना (Farmers) सहन करावा लागेल. वांग्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. वांग्याची लागवड ही अशी शेती आहे जी दीर्घकाळ उत्पन्न देते आणि त्याच वेळी कमाईही करते. हे पीक वर्षभर घेतले जाते. वांगी शेतात तसेच कुंडीतही पिकवता येतात. याची लागवड वर्षभर होत असल्याने कोणत्याही हवामानाच्या जमिनीत याची लागवड अगदी सहज करता येते.

Table of Contents

वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

हवामान :

कोरडया आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी १३ ते २१ सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पिक चांगले येते. वांग्याची लागवड करताना थोडी काळजीपूर्वक करावी लागते योग्य वातावरण व तापमान बघून वांग्याची लागवड करणे ही आपल्याला उपयुक्त ठरेल.

 

जमिन :-वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत यांग्याचे पिक घेता येते परतू सुपिक चांगला पाण्याचा निचरा होणा-या मध्यम काळ्या जमिनीमध्ये यांग्याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू ६ ते ७ असल्यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते.

 लागवडीचा हंगाम

वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध
वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

वांग्याची लागवड तिन्ही हंगामात करता येते.

 

१) खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै, ऑगस्टमध्ये केली जाते.

२) रब्बी किंवा हिवाळी हंगाम बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करता आणि रोपे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावतात.

३) उन्हाळी हंगाम बी जानेवारीच्या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत करता.

 

बियांचे प्रमाण: एक हेक्टर लागवडीसाठी ८०० ते १००० राम बियाणे पुरसे होते,

 

पूर्वमशागत :- वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

 

मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळयाच्या शेवटच्या पाहीसोबत दर हेक्टरी ३०-५० गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे.

 

वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध-वांग्याची लागवड

वांग्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करतो. गादीवाफे ३१ मीटर आकाराचे आणि १० ते १५ सेमी उंचीचे करावेत. गादीवाफ्याभावती पाणी देण्यासाठी सरी ठेवावी. एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा १५ ते २० पाण्यातील रोपे पुरेशी होतात. वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी ४०० ते ५०० गेम वी पुरते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ८०० ते १००० ग्रॅम बी पेरन अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्हणजे काही रोप न जगल्यास ही रोप नांगे भरण्यासाठी यापरता येतात. गादी वाफ्यावरील रोपे १२ ते १५ सेंटिमीटर उंचीची झाल्यावर म्हणजे ६ ते ८ पानांवर आल्यावर लावणीस तयार होतात.

बी पेरणीपासून साधारणपणे ४ ते ५ आवडयांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत यापयांना सुरुवातील झारीने आणि नंतर पाण्याच्या भोवती असलेल्या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे,कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरु असताना केल्यास फायदेशीर ठरते. उन्हाळयात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी ४ नंतर ऊन कमी झाल्यावर करावी.

रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (हेक्‍टरी 30 ते 40 टन) शेणखत मिसळून द्यावे.

 

रोपांतील अंतर 

 

  • हलक्‍या जमिनीत – 75 x 75 सें.मी.
  • संकरित जातीसाठी – 90 x 90 सें.मी.
  • कमी वाढणाऱ्या जातीसाठी/ मध्यम जमिनीत – 90 x 75 सें.मी.
  • जास्त वाहणाऱ्या जमिनीसाठी/ भारी जमिनीसाठी – 120 x 90 सें.मी.

काळया कसदार जमिनीत १०० १०० सेंटीमीटर, मध्यम प्रतीच्या जमिनीत ७५ ७५ सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीत ६० ६० किंवा ७५ ६० सेंटीमीटर अंतर ठेवावे.

 

रोपवाटिका कशी तयार करावी

 

ज्या ठिकाणी रोपवाटिका लावायची आहे त्या ठिकाणी प्रथम १ ते दीड मीटर लांब व ३ मीटर रुंद बेड तयार करून कुदळ करून मातीची मळणी करावी. त्यानंतर प्रति बेड 200 ग्रॅम डीएपी टाकून जमीन सपाट करा. जमीन सपाट केल्यानंतर तिथली माती पायाने दाबा. यानंतर, वांग्याच्या बियांवर बाविस्टिन किंवा थिरमची प्रक्रिया करावी. नंतर गाडलेल्या सपाट जमिनीवर रेषा काढून संकरित वांग्याच्या बिया पेराव्यात.रोपवाटिकेची जमीन तागाच्या पोत्याने किंवा कोणत्याही लांब कापडाने झाकून ठेवावी. बियाणे उगवण अवस्थेत असल्यास किंवा अंकुर वाढले असल्यास, पेंढा आणि कापड काढून रोपवाटिकेत हवा द्यावी. त्यानंतर रोपवाटिकेला हलके पाणी द्यावे.

 

खते आणि पाणी व्यवस्थापन 

 

वांग्याच्या बागायती पिकास दर हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धेनत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर ३० दिवसांनी यावे. ही खते ९ ते १० सेंटीमीटर खोलीवर झाडाच्या बुंध्याभोवती १० ते १५ सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने पावीत. वांग्याच्या कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र आणि २५ किलो स्फुरद द्यावे.

रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे.खरिपाच्या पिकास पाऊस नसताना १० ते १२ दिवसांच्या अंतराने, हिवाळयात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळयात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.

 

 

हे पण वाचा   

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

सौर कृषी पंप योजना 2023 

 

 

तण काढणे

 

वांग्याच्या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे. त्याकरिता अवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे. तसेच झाडास मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो. 

 

वांग्याचे प्रकार

 

  • स्वर्ण शक्ती: ही वांग्याची संकरित जात आहे. वांग्याची ही जात उत्पन्नाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानली जाते. एका वांग्याचे वजन 150 ते 200 ग्रॅम असते आणि रंग जांभळा असतो. प्रति हेक्टरी सुमारे 700 ते 750 क्विंटल वांगी मिळू शकतात.
  • सुवर्ण प्रतिभा: या प्रजातीची वांगी आकाराने मोठी आणि उंच, चमकदार जांभळ्या रंगाची असतात. प्रति हेक्टरी सुमारे 600 ते 650 क्विंटल वांगी मिळू शकतात .
  • स्वर्णश्री : त्याची झाडे ६० ते ७० सें.मी. उंच असतात. त्याची पाने रुंद असतात. या प्रजातीची वांगी अंडाकृती आणि पांढर्‍या रंगाची असतात. वांग्याचे उत्पादन हेक्टरी 550 ते 600 क्विंटल आहे.
  • गोल्डन स्वॅलो: या प्रकारच्या वनस्पतींमध्ये वाढणारी वांगी गोल आणि हिरव्या रंगाची असतात. वांग्याच्या वरच्या बाजूला पांढरे पट्टे असतात. वांगी लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी झाडांपासून मिळू शकतात . प्रति हेक्टरी सुमारे 600 ते 650 क्विंटल वांगी मिळू शकतात.
  • सोनेरी रत्न: त्याची पाने जांभळ्या रंगाची असून झाडाची लांबी सुमारे ७० ते ८० सें.मी. एका वांग्याचे वजन सुमारे 200 ते 300 ग्रॅम असते. प्रति हेक्टरी सुमारे 600 ते 650 क्विंटल वांग्याचे उत्पादन घेतले जाते.
वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध
वांगी किड रोग व उपाय फवारणी साठी औषध

   वांग्याच्या जाती :

 

पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का, नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड

 वांगी फवारणी वेळापत्रक

 

एन.ए.ए.या संजीवकाची २० पी.पी.एम (२० मिली. १ लीटर पाण्यात) पीक फुलो-यावर असताना फवारणी केल्यास फळांची वाढ चांगली होउन उत्पादन वाढते.

  •  वांग्याचे उत्पादन जास्त                मिळविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी कार्बेन्डँझिम (०.१ टक्के) तीन फवारण्या फळ लागल्यापासून एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.
  • मावा, तुडतुडे किडी व रोग नियंत्रणासाठी रोगर १०मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा कार्बारील २० ग्रॅम यापैकी एक औषध  बदलून १० लिटर पाण्यातून फवारावे. ५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी

 

वांगी रोग किड व उपाय

 

बोकडया किंवा पर्णगुच्छ:-

या रोगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकडल्यासारखी दिसतात. याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो.

 

उपाय:- १)

बी पेरताना दोन ओळीत फोरेट हे दाणेदार औषध प्रती वाफ्यास २५ ग्रॅम या प्रमाणात यावे (२) रोपे लावणीपूर्वी ती मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १५ मिली व ऐक्रामायसिन ५ ग्रॅम व १० लिटर पाणी या मिश्रणामध्ये साधारण पाच मिनिटे बुडवून लावावीत. (३) लागवडीनंतर १० दिवसांनी फोरेट प्रती हेक्टरी १० किलो याप्रमाणे प्रतयेक झाडाभोवती गोल रिंग काढून द्यावे. (४) लागवडीनंतर ४५ दिवसांनी १२ मिली मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूएससी किंवा ३० ग्रॅम ५० टक्के कार्बरिल १० लिटर पाण्यात सिळून फवारावे. त्यानंत १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारे द्यावेत.

२) मर:-

हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणा-या फ्युज्यारियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरेमधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात. झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.

उपाय:-

रोगास बळी न पडणा-या जातींची लागवड करावी. पिकांची फेरपालट करावी, नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रतिकिलो थायरम बियाण्यास चोळावे.

 

१) शेंडा आणि फळे पोखरणारी अळी :

शेंडा
शेंडा

या किडीमुळे वांगी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. चिकट पांढ- या रंगाच्या या आळया शेंडयातून खोडात शिरुन आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडची वाढ खुंटते फळे लहान असताना अळी देठाजवळून फळात शिरुन फळाचे नुकसान करते.

उपाय:-

किड लागलेले शेंडे अळिसकट नष्ट करावेत. ४० ग्रॅम कार्बारिल किंवा १४ मिली मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के किंवा २.४ मिली सायफरमेथ्रिन २५ टक्के १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा १० टक्के कार्बारिल भूकटी दर हेक्टरी २० किलो या प्रमाणात झाडांवर धुराळावी.

 

२) तुडतुडे:

 

हिरवट रंगाची किड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकल्यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकडया या विषाणू रोगाचा प्रसार होतो.

 

   उपाय:-

रोपांच्या पुर्नलागवडीनंतर २ आठवडयांनी १२ मिली एन्डोसल्फान, ३५ टक्के प्रवाही किंवा २० मिली मेलाथिऑन ५० टक्के प्रवाही १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

३) मावा :-

ही अतिशय लहान आकाराची किड पानांच्या पेशीमध्ये सोंड खुपसून यपानातील रस शोषून घेते. उपाय:- २० मिली मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी

●एन.ए.ए.या संजीवकाची २० पी.पी.एम (२० मिली. १ लीटर पाण्यात) पीक फुलो-यावर असताना फवारणी केल्यास फळांची वाढ चांगली होउन उत्पादन वाढते.

●वांग्याचे उत्पादन जास्त मिळविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी कार्बेन्डँझिम (०.१ टक्के) तीन फवारण्या फळ लागल्यापासून एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.

●मावा, तुडतुडे किडी व रोग नियंत्रणासाठी रोगर १०मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा कार्बारील २० ग्रॅम यापैकी एक औषध बदलून १० लिटर पाण्यातून फवारावे. ५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी.

 

वांग्याची तोडणी व उत्पादन

 

रोप लावणीनंतर १० ते १२ आठवडयांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाटून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जुन फळे गि-हाईकांच्या पसंतीस उतरत नाहीत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने १० ते १२ वेळा वांग्याची तोडणी करता येते. यांग्याची काढणी साधारणपणे ३ ते ३ १/२ महिने चालू राहते.

वांगी पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन जाती परत्वे १०० ते २५० क्विंटल पर्यंत येते.

 

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारची माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a Comment