मेथीची लागवड व फायदे मेथीवर कीड  रोग व  फवारणी औषधे दर हेक्टरी 7-8 टन कसुरी मेथीचे उत्पादन हेक्टरी 9-10 टन - डिजिटल बळीराजा

मेथीची लागवड व फायदे मेथीवर कीड  रोग व  फवारणी औषधे दर हेक्टरी 7-8 टन कसुरी मेथीचे उत्पादन हेक्टरी 9-10 टन

 

मेथीची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र मेथीची भाजी पालेभाजी म्हणून लोकप्रिय आहे. लवकर येऊन सर्वत्र विकली जाणारी मेथी ही एक चांगली भाजी आहे. मात्र पंजाबमध्ये व उत्तर भारतात आहारात मेथीची पाने कणकीत मिसळून मेथी पराठा दररोज खाण्याची प्रथा आहे. इजिप्तमध्ये अरबमेथीला ‘दुल्बा’ म्हणतात. मेथीचे मूळ स्थान पूर्व आशिया हे आहे. मेथीच्या बिया मेथीची पाने यांचे महत्त्व प्तालयाने अनेक देशामध्ये मेथीची यशस्वीपणे लागवड केली जाते. मेथी साधारण वीत ते दोन वीत उंच वाढते. मेथीच्या झाडांवर जुनमध्ये शेंगा येतात. त्या शेंगामधील बियांना ‘मेथ्या’ म्हणतात.

 

मेथी लागवड चे फायदे 

 

मेथीची पाने व बिया आरोग्यास हितावह असतात. स्त्रिला प्रसुतीनंतर जास्त दूध येण्यासाठी मेथ्याचे लाडू खावयास देतात. उन्हाळ्याची झळ लागल्यास सुकलेली मेथी थंड पाण्यात भिजत घालून ते पाणी वस्त्रगाल करून त्यात मध एकत्र करोन घ्यावे. मेथीचा वापर प्रामुख्याने केसांसाठी व सौंदर्य प्रसाधनांसाठी होतो. दुभत्या जनावरांना खुराकातून मेथी बी देतात. मेठीमाध्ये पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतू कर्बोदके, लोह, स्फुरद, सोडियम यासारखे शरीरास आवश्यक असणारे घटक उपलब्ध आहेत. तसेच अ, ब, क, ड जीवनसत्त्वे आणि अॅस्कार बिक आम्लाचे प्रमाण जास्त आढळते. मेथीची लागवड जम्मू काश्मिर, उत्तरप्रदेश , मध्येप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून केली जाते. मेथीची लागवड खरीप व रब्बी हंगामात करता येते. त्यामुळे मेथीचे लागवडीचे तंत्र सहज सोपे आहे.

 

मेथी पिकासाठी जमीन 

 

मेथी ओलिताची सोय असलेल्या जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते. पाण्याचा निचरा असणारी, मध्यम खोलीची, कसदार जमीन असावी.

हवामान 

मेथी लागवड थंड हवामानात तसेच योग्य सुर्यप्रकाश व हवेत आर्द्रता असताना करणे आवश्यक असते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उन्हाळ्यातदेखील चांगल्याप्रकारे उत्पादन घेत येते.

 

मेथी लागवड व   व्यवस्थापन

 

मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण मार खाते. त्यासाठी जमिनीची फणणी करून मशागत करावी. म्हणजे बियांची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुजतात. कल्पतरू सेंद्रिय खत टाकून सारे ओढावेत. मेथी फोकण्यापुर्वी १ पोत्यास १ लि. जर्मिनेटर + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + ५० ते ६० लि. पाणी या द्रावणामध्ये मेथी बी रात्रभर भिजवून नंतर उपसून सावलीत प्लॅस्टिक कागदावर सुकवावे. नंतर वाफ्यात पेरावे किंवा फोकावे. बी साधारण ४ ते ५ दिवसात कडक उन्हाळा असतानाही उगवून येते. एकरी बियाने ८० किलो लागते. भाजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारे पाडणे.

नेहमीची मेथी पेरणीनंतरे 3-4 दिवसाते उगवते तर कसुरी मेथीची उगवण होण्यास 6-7 दिवस लागतात. साध्या किंवा नेहमीच्यो मेथीच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते. आंतरपीक म्हणून घेताना बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठेवावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच बियांसाठी बीजप्रक्रिया करताना कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेे या प्रमाणात बियास चोळावे.

 

जात

महराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे नव्या वाणांच्या बियांची लागवड झालेली दिसते. १) कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन), २) पुसा अर्लि बंचिग, ३) मेथी नं. ४७ या प्रकारच्या जाती आढळतात.

१) कसुरी सिलेक्शन

या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात. आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेठीपेक्ष बारीक असतात. या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात, तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेठीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) हा सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केला असून तो दीड महिन्यात तयार होतो. हा वाण उशीरा तयार होणारा असला तरी त्याचे अनके खुडे घेता येतात आणि हा वाण परसबागेत लावण्यास फार उपयुक्त आहे. बी तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतात.

२) पुसा अर्ली बंचिंग

हा वाण लवकर वाढतो. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीचे पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठी असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात.

या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. पुसा अर्ली बंचिंग ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. या मेथीची वाढ उभट व लवकर होते. पाने हिरवी असून १२५ दिवसांत बी तयार होते.

 

३) मेथी नं. ४७ 

महराष्ट्रात मेथी नं. ४७ हा सुधारित वाण विकसित करण्यात आला आहे.

याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.

 

खते आणि पाणी व्यवस्थापन :

पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असली तरी हे शेंगावर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरवातीला हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किंवा पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन आणि प्रत सुधारते.

पिकाचा खोडवा घेतल्यासही वरीलप्रमाणे खतांचा वापर करावा. मेथीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोवळी आणि लुसलुशीत भाती मिळण्यासाठी 4-6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा नियमित पुरवठा केल्यास अधिक उत्पादन मिळवून खोडवेही जास्त येतात.

बी टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४० ते ५० किलो करावा. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जाते. रासायनिक खते शक्यतो देऊ नयेत.

 

मेथीची लागवड

 

मेथीवर कीड  रोग व  फवारणी 

 

मेथीवर रोग व किडींचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही. उन्हाळ्यात पालेभाज्यांचे बाजारभाव वाढलेले असतात. त्यामुळे बाजारभाव मिळण्यासाठी मेथी केली जाते. मात्र उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मेथीची मर मोठ्या प्रमाणात होते. इतर रासायनिक औषधे वापरून देखील फायदा होत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी बीजप्रक्रियेचेवेळेस जर्मिनेटरचा वापर करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या वेळेवर केल्या तर मर अगदी कडक उन्हाळ्यातदेखील होत नाही असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

मेथी पिकाला सुरुवातीला २० किलो नत्र आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर २० किलो नत्र हेक्टरी या प्रमाणात द्यावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. तसेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दहा लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया मिसळून त्याची फवारणी करावी .यामुळे उत्पादनात वाढ होते.

मेथी या पिकावर जास्त रोगांचा पादुर्भाव होत नाही. या पिकावर प्रामुख्याने पाने खाणारी अळी (लीप मायनर) आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो . मावा किड काळ्या रंगाची असते. मावा कीड पानाच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावरून मोठ्या प्रमाणात पानातील रस शोषून घेते. त्यामुळे रोपे खराब होऊन रोपांची प्रत खराब होते. पाने खाणारी ही पानावरील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे पुढे जाते. त्यामुळे पानावर पांढरया रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा दिसतात आणि रोपाची प्रत खराब होते.
किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान अवस्थेत असताना पिकावर निंबोळी अर्काची आणि डायमियोट ची फवारणी करावी.

 

अधिक, दर्जेदार उत्पादन घेण्याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २२ ते २५ दिवसांनी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ) :जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ हार्मोनी १५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १५० लि.पाणी.

 

काढणी 

मेथीची भाजी जातीनुसार ३५ ते ४० दिवसात काढणी योग्य होते. फुलोऱ्यावर येण्याअगोदर भाजीची काढणी करावी. वरीलप्रमाणे फवारणी केल्यास मेथीची पाने रुंद होऊन चमक व तेज येते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. तसेच नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस मेथीची पुर्ण वाढ होऊन काढणीस लवकर येते.

 

उत्पादन

 

पावसाळ्यात मेथीच्या १ गुंठ्यात १०० गड्ड्या निघतात. परंतु वरील पद्धतीने लागवड केल्यास ऐन उन्हाळ्यात देखील मेथीच्या १५० ते २०० गड्ड्याचे उत्पादन मिळते. आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी असते.  काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून कापडात किंवा जाळीदार पिशव्यांमध्ये अथवा बाबूंच्या टोपल्यामध्ये जुड्या व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात. मेथीच्या जुड्या तुडवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच काढणी संध्याकाळी करावी म्हणजे ताजी भाजी बाजारपेठेत पाठवता येते. मुळांना जास्त माती असल्यामुळे मुळे पाण्यात धुवून पाणी झटकून घ्यावे. म्हणजे भाजी सडत नाही. मेथीची काढणी आणि विक्री ह्यामध्ये कमीत कमी कालावधी असावा.

मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार दर हेक्टरी 7-8 टन इतके मिळते. कसुरी मेथीचे उत्पादन हेक्टरी 9-10 टन मिळते. मेथीचे पीक बियाण्यासाठी ठेवल्यास साध्या मेथीचे हेक्टरी 1 ते 1.5 टन तर कसुरी मेथीचे हेक्टरी 600 ते 700 किलो एवढे बियाणे मिळते.

 

निष्कर्ष (Conclusion) :

 मेथी लागवड संपूर्ण माहिती “ या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती जर आपणास फायद्याची वाटली तर कृपया आपल्या शेतकरी मित्रांना हि माहिती पाठवा.

 

हे पण वाचा 

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023 

अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट

पिक विमा योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023

Leave a Comment