महाराष्ट्र पिक कर्ज नोंदणी 2023 | Pik Karj Yojana 2023 |महाराष्ट्र पिक अर्ज करा २०२३ | महा पिक योजना योजना फॉर्म पिक कर्ज योजना 2023 महाराष्ट्र|Crop lon 2023 | महाराष्ट्र पिक कर्ज अर्ज फॉर्म 2023 | पिक कर्ज योजना फॉर्म 2023 महाराष्ट्र | महाराष्ट्र पिक कर्ज महिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पिक कर्ज योजना 2023 महाराष्ट्र शासन तसेच याच योजनेच्या संबंधित महाराष्ट्र पिक कर्ज या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही पीक कर्ज काढले आहे, अथवा काढण्याचा विचार करत आहेत. तर तुम्हाला हे सर्व शासन निर्णय खूप माहितीदायक ठरणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण नक्कीच वाचा.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळेल. पिक कर्ज योजना मंत्रिमंडळाने जाहीर केली. महाराष्ट्र राज्य शासनाने वेळोवेळी विविध योजना जाहीर केल्या. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिक विमा योजना फॉर्म आता त्यांना शून्य व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. योजनेबद्दल नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
पिक कर्ज योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठीत {Pik Karj Yojana)
पिक कर्ज योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याजदरात सवलत देण्यात येणार आहे. या योजनेत मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज दराने सवलत व १ ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १ टक्के व्याजदरात सवलत देण्यात येत होती. ती आता १ ते ३ लाख रुपये कर्ज मर्यादित शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय हा या मंत्रिमंडळ बैठकीत १२ जून २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे. पीक कर्ज शेतकऱ्यांना सरकारी बँका त्याच बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका या तसेच संबंधित खाजगी बँकांकडून कर्ज मिळते. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक कर्जाचा उद्दिष्ट हे ठरवण्यात येत असतं. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँका पीक कर्ज हे उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर सरकारी बँकांकडून पण मोठ्या प्रमाणात crop loan हे शेतकऱ्यांना मिळते.
तसेच केंद्र शासनामार्फत ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड जर केली, तर २ टक्के व्याज सवलत ही मिळणार आहे. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड ही मुदतीत मध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत ही मिळणार आहे. म्हणजेच त्यांना सदरचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
या मुळे कर्ज घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण देखील नक्कीच कमी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती उद्दिष्टे {Pik Karj Yojana 2023}
पीक कर्जाची नियमित आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १२ जुने २०२१ च्या शासन निर्णयानुसार ३ लाखापर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज करण्यात येणार आहे.
- राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी
- कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार होतात.
- नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते
- राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे ३ लाख रुपयेपर्यंतचे पिक कर्ज राज्य शासनाकडून दिले जाईल.
- ३ लाखापर्यंतचे पिक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केलेले आहे.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघेही शेतकऱ्यांना अधिक स्वावलंबी आणि सशक्त बनविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी सरकारने पिक कर्ज योजना 2023 सुरू केली आहे..
योजना | पिक कर्ज योजना 2023 |
व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://jalna.cropsloan.com/ |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्देश्य | पिक कर्ज योजना माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढविणे तसेच राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे |
लाभ | शेतीसाठी ट्रॅक्टर आणि संबंधित यंत्रांसाठी अनुदान लहान पोल्ट्री युनिट्स उभारण्यासाठी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन किंवा ऑफलाईन |
श्रेणी | राज्य सरकारी योजना |
वर्ष | 2023 |
पिक कर्ज योजना 2023 महाराष्ट्र फायदे
- देशातील सर्व पात्र शेतकरी पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ घेऊ शकतात.
- सरकारने सुरू केलेल्या पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात ३ लाखापर्यंतचे पिक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने थेट दिले जाते.
- या योजनेंतर्गत शेतकर्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात लाभ दिला जातो, त्यामुळे शेतकर्यांचे बँक खाते असण्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे देखील आवश्यक आहे.
पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 का घ्यावे?
अनेक कर्ज देणाऱ्या बँका त्यांच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी विविध कृषी कर्जे देतात. आणि शेतीशी संबंधित अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. तुम्हाला विविध कारणांसाठी कृषी कर्ज मिळू शकते, ते खालीलप्रमाणे आहेत.
- कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी.
- जमीन खरेदीसाठी.
- प्रकल्पांसाठी.
- वाहने किंवा कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी.
- डेअरी युनिटच्या स्थापनेसाठी.
- लहान पोल्ट्री युनिट्स उभारण्यासाठी.
- खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी.
- हंगामी गरजांसाठी.
- मासेमारीसाठी.
- इतर क्षेत्रांप्रमाणे जे शेतीशी संबंधित आहेत. त्यांच्यासाठी कर्ज घेता येईल. आणि तुम्ही कृषी कर्जाचा लाभ घेऊ शकता.
पिक कर्ज तीन लाखांपर्यंतचे शून्य टक्के व्याजाने
पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरू केलेला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे.
राज्यात पीक कर्जाचा व्याजदर हा द.सा.द.से. (दर साल, दर शेकडा) सात टक्के इतका आहे. मात्र, यापैकी केंद्र सरकार तीन टक्के व्याज सवलत परतावा देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजाने पडत आहे. याला पुणे आणि सातारा या दोन जिल्हा बॅंकांचा मागील सुमारे दीड दशकांपासून अपवाद आहे. या दोन्ही जिल्हा बॅंका या साधारणतः मागील पंधरा वर्षापासूनच तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहेत.
किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र सरकार 2023
पिक कर्ज योजना 2023 पात्रता आणि अटी
- अर्जदार शेतकरी हा भारताचा कायमचा रहिवासी असावा
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त (18 वर्षे) आणि 60 वर्षांपेक्षा कमी (60 वर्षे) असावे.
- अल्प/अत्यल्प शेतकरी या निकषाखाली असावे.
- पिक कर्जसाठी शेतकर्याकडे स्वतःची जमीन असली पाहिजे.
- या योजनेचा लाभ फक्त एकदाच दिला जातो परतफेड केल्याशिवाय मिळत नाही.
- जर जमीन दुसऱ्याच्या नावावर असेल, पिक कर्ज योजना 2023 त्याच्या नावावर घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही.
- शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते
पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 आवश्यक कागदपत्रे
- योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड (अर्जदाराचे आधार कार्ड)
- वैध ओळखपत्र- (जसे की मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स)
- अर्जदाराकडे जमिनीची कायदेशीर कागदपत्रे.
- 7/12 उतारा 8 अ दाखाला
- बँक खाते विवरण / बँक पासबुक |
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- स्टॅम्प (कर्ज रकमेनुसार १०० रुपयांचे ३ किंवा ४ स्टॅम्प)
पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
- सर्व प्रथम अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
- तिथून पीक कर्ज (Crop Loan) या सेक्शनमध्ये जायचे आहे.
- तिथे आल्यानंतर Apply for Crop Loan या बटनाला क्लिक करायचे
- त्यानंतर पीक कर्जाच्या वेबसाईटवर तुम्हाला Redirect केले जाईल.
- इथे आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जालना व जिल्हा अग्रणी बँक एसबीआय चा लोगो दिसेल आणि
- यामध्ये नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा आणि अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा हे दोन ऑप्शन असतील.
- तिथे नवीन कर्जासाठी (New Application for Crop Loan) येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- तिथे क्लिक केल्यानंतर खाली पीक कर्ज नोंदणी अर्जामध्ये शेतकऱ्याचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव टाकायचा आहे.
- मोबाईल क्रमांक नमूद करायचा त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकायचा.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर पॅन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे.
- राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करायची आहे आणि त्या गावाची निवड केल्यानंतर तेथे जी संलग्न असलेली बँक आहे त्या बँकेचे नाव तुम्हाला दिसेल.
- त्या बँकेच्या खाते क्रमांक ची माहिती तुम्हाला भरायची आहे ज्यामध्ये तुमचा तालुका ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे त्या बँकेचे नाव बचत खाते आहे त्या शाखेचे नाव आणि तुमचा बचत खाते क्रमांक नमूद करायचा आहे.
- हे टाकल्यानंतर आपण नवीन नोंदणी करण्यासाठी नोंदणी करणार आहात की जुन्या कर्जाचे नूतनीकरण करणार आहात ते विचारले जाईल.
- इथे तुम्हाला नवीन कर्जासाठी नोंदणी (Registration) करायचे आहे या बटनाला क्लिक करायचं आहे जर नूतनीकरण करणारा असाल तर जुन्या कर्ज खात्याचा तपशील तुम्हाला भरावा लागेल.
- त्यानंतर आपल्या शेतजमिनीची माहिती व लागवड केलेले पिकाची माहिती भरायची आहे.
- शेत जमिनीचा एकूण क्षेत्र कोणकोणती पिके तुम्ही घेताय त्याची माहिती भरायची पिकाची माहिती भरल्यानंतर प्लस बटन दाबावे.
- पिकाचे क्षेत्र किती आहे आणि सर्वे क्रमांक किती आहे ती माहिती तिथे भरायची आहे.
सर्व माहिती नीट भरल्यानंतर हा फॉर्म जतन करायचा आहे
यावर्षीचे पीक कर्ज म्हणजेच 2023 या वर्षाचे पीक कर्ज Crop Loan हे 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज हे जिल्हास्तरीय बँक व सहकारी बँक यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. जे शेतकरी विहित मुदतीच्या आत मध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे पण वाचा
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023
अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट