सोयाबीन लागवड - डिजिटल बळीराजा

सोयाबीन लागवड

सोयाबीन
सोयाबीन

नमस्कार शेतकरी बंधुनो सोयाबीनची पेरणी कश्या प्रकारे करता येईल. व पेरणी करताना कोनकोत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे.अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो .याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया बिस्कीट,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते.

 

सोयाबीन लागवड व पेरणी  लागवडीचे अंतर किती ठेवावे ?

पेरणी यंत्र
पेरणी यंत्र

पेरणी उताराला आडवी तसेचपूर्व पश्चिम करावी.पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ X ०.५ सें.मी. (भारी जमीन) किंवा ३० X १० सें.मी. (मध्यम जमीन) अंतरावर करावी. सोयाबीन लागवडी करिता हेक्टरी किती बियाणे लागते ? सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण पेरणीसाठी ४५-५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया – बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळणारे जीवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.

हवामान

सोयाबीन दिवसा कमी तास सुर्यप्रकाश लागणारे पिक आहे. सोयाबीन ला जसा जसा दिवसाचा सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसे तसे फुल धारणा होत असते. उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची                                                                                                                        आवश्यकता असते.

जमीन –

सोयाबीनच्या लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी, गाळाची जमीन उत्तम ठरते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते .पाणी साठून राहणाऱ्या जमिनीतीत सोयाबीनचे पीक चांगले येत नाही. सोयाबीन लागवडीच्या जमिनीचा PH ६ ते ६.५ च्या आसपास असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक अधिक उत्तम येते. म्हणून या सर्व गोष्टीचा विचर करून सोयाबीन पिकासाठी जमीन निवडावी.

या बियाणांचा करा वापर:-

यंदा सोयाबीनच्या बीजोत्पादन फुले संगम, केडीएस ७५३ (फुले किमया) एमएयूएस. १६२. एमएयूएस – १५८, एमएमएयूएस ७२, एमएयूएस-६१2 जेएस-३३५. डीएस २२८ या वाणांचा समावेश आहे. तूर, मूग, उडीद, ज्यूट आदी पिकांचा मिळून ८३१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून, त्यापासून १० हजार ४५६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे तुरीच्या बीएसएमआर ७३६, बीडीएन ७११. उडदाच्या टीएयू १. मुगाच्या उत्कृष बीएम- २००२-१ बीएम- २००३ २, ज्यूटच्या जेआरओ-५२४ या वाणांचा समावेश आहे.

सोयाबीन लागवड/ पेरणी कधी आणि कशी करावी?

मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच सोयाबीन ची लागवड करावी. सोयाबीन ची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. १ एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात. पेरणी करताना जमिनीत फार खोलवर पेरणी करु नये.

सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

बुरशीजन्य रोगापासून संरक्षण :-

उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. लागवड करताना प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी, त्यानंतर प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धके आणि २५ ग्रॅम पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सावलीत हलके वाळवून लगेचच पेरणी करावी.

सोयाबीन खत व्यवस्थापन

  • एकरी 12 किलो नत्र व 30 किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे. म्हणजेच डीएपी एकरी 60 ते 70 किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते. काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणी पूर्वी वापरतात. हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.
  • ज्या जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी 12:32:16 किंवा 14:35:14 ही खते सुद्धा उपयुक्त ठरतात. सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यावी, दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची दुसरी मात्रा देऊ नये.
  • त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सल्फर दाणेदार किंवा एक किलो सल्फर WDG + पाच किलो ह्युमिक ऍसिड दाणेदार जसे रायझर-जी किंवा ह्यूमॉल किंवा ह्युमिसील पेरणी बरोबर दिल्यास चांगला फायदा होतो.
  • सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.

उगवणशक्ती कमी होण्याची कारणे

सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर साठवणूककेलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो व त्याचापरिणाम उगवणशक्तीवर होतो.साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी

सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके :-

पेरणीनंतर २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनंतर दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार खुरपण्या देऊन पीकातील तण काढून घ्यावे.रासायनिक तणनाशका वापरून सोयाबीनमधील तणांवर  नियंत्रित ठेवावे.

दिवसेंदिवस मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याने तणनाशकाच्या माध्यमातून तणनियंत्रण करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोयाबीन मधील बरीच तणनाशके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी इमॅझिथॉपर या तणनाशकाचा वापर वाढत आहे.सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, ही तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनिधि, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवून, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवून वापरावे.तणनाशक केव्हा वापरावे. तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलीन ३० ई.सी. पेरणीच्यावेळी प्रति एकरी १ ते १.३ लिटर २५० ते ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी एक कोळपणी एक खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी इमिझाथ्यापर ४०० मिली. २०० – २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे.

सोयाबीन पिकावर प्रमुख किडी:-

किडरोग
किडरोग
  • पाने पोखरणारी अळी : कमी पाऊस कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानांच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानांवर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते नंतर सुकून गळून पडते.
  • मावा : ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानांच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयाबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
  • खोडमाशी : ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयाबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.
  • तांबेरा : सतत पाऊस व ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगांचा इतर भागात प्रसार होतो. या रोगांमूळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकांची वाढ मंदावते पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.

 

पिकाची काढणी, मळणी

काढणी यंत्र
काढणी यंत्र

जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी. सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करतांना सोयाबीनच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक आहे. जर बियांणामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशावेळी मळणी करतांना दाण्याची फूट होऊन दाळ होण्याचे प्रमाण वाढते.हाताने कापणी केलेल्या सोयाबीनमधील ओलाव्याचे

माहिती आवडल्यास नक्की शेर करा अधिक माहिती www.digitalbaliraja.com

 

 

Leave a Comment