कुकुट पालन

महाराष्ट्र शासनाच्या कुक्कुट पालन कर्ज योजनेच्या माध्यमातून ज्यांना शेतीसोबतच कुक्कुट पालनासारखे पशुपालन करायचे आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे.

महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुक्कुट पालन कर्ज योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात शेती करणारे शेतकरी कुक्कुट पालन, कोंबडी फार्म बांधण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

कुक्कुट पालनाची महत्त्वाची योजना म्हणजे सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याची महत्त्वाची योजना आहे. सार्वजनिक तसेच खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुकुट विकास गटाची स्थापना या kukut palan yojana 2023 अंतर्गत करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 302 तालुक्यांपैकी प्रति तालुका एक याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. सघन कुकुट पालन विकास गटाची स्थापना करण्याकरिता या योजने अंतर्गत सध्या अर्ज सुरु झालेले आहे.

कुकुट पालन योजना महाराष्ट्र Kukut Palan Yojana

कुकुट पालन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार अशा लोकांना कर्ज उपलब्ध करून देईल. ज्यांना त्यांचा नवीन कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करायचा आहे. आम्ही तुम्हाला कुकुट पालन कर्ज योजनेची संपूर्ण माहिती देऊ. या योजनेचे फायदे आणि तुम्ही या कुकुट पालन कर्ज योजनेसाठी कसा अर्ज करू शकता. आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील. आमचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. आपल्या महाराष्ट्र राज्यात कुकुट पालन व्यवसायाला चालना मिळावी तसेच कुकूट पालन व्यवसायाची वाढ व्हावी तसेच जास्तीत जास्त लोकांनी कुकुट पालन हा व्यवसाय करून त्यांचा स्वतःचा आर्थिक विकास करून घ्यावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने त्याचबरोबर नाविन्यपूर्ण योजना यांच्यामार्फत वेळोवेळी कुकुट पालन योजना राबविण्यात येत असतात. या योजनांच्या माध्यमातून कुकूटपालन करिता अनुदान तसेच कुक्कुटपालन पक्षांच्या खरेदी करिता अनुदान वितरित करण्यात येत असते.

कुकुट पालन 2023 ची उद्दिष्टे

कुकुट पालन
कुकुट पालन

राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेमुळे महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल. म्हणूनच या योजनेंतर्गत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात रोजगार निर्मिती होईल.

कुकुट पालन योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.

कुकुट पालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.

या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे. जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुकुट पालन हा व्यवसाय मिळणार आहे

 

कुकुट पालन योजना 2023 पात्रता.

  • कुकुट पालन योजनेच्या लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासांसाठी मर्यादित आहे.
  • कुकुट पालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी आणि कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • शेतकरी असला पाहिजे.
  • ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
  • महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत.
  • संघटित आणि असंघटित क्षेत्रांचे गट पात्र आहेत.
  • अशासकीय संस्था देखील पात्र आहेत.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा उद्योजक असणे आवश्यक आहे.
  • कुकुट पालन योजनेच्या लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासांसाठी मर्यादित आहे.

 

कुकुट पालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  1. अर्जदाराचे आधार कार्ड·
  2. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो·
  3. मतदार कार्ड·
  4. महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी वास्तव्य प्रमाणपत्र·
  5. शासनाने रेशनकार्ड ·
  6. व्यवसाय योजना किंवा प्रकल्प अहवाल·
  7. बँक स्टेटमेंट प्रत इ.

 

कुकुट पालन कर्ज योजनेत नाबार्ड बँका कोण आहेत?

या योजनेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही नाबार्ड बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

ज्या एकूण 4 बँका आहेत. ज्यांची नावे खाली नमूद केली आहेत.

1.       प्रादेशिक सहकारी बँक

2.       राज्य ग्रामीण बँक

3.       सर्व व्यापारी बँका

4.       राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक

5        कुकुट पालनासाठी शासनाकडून 25% पर्यंत अनुदान दिले जाते.

6      अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लोकांना कुकुट पालन नासाठी शासनाकडून 35% पर्यंत अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र कुकुट पालन कर्ज योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम

7  मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या कुकुट पालन योजनेंतर्गत कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रादेशिक        ग्रामीण बँक, राज्य सहकारी बँक, ग्रामीण विकास बँकेतून 50 हजार रुपये सहज मिळू शकतात, ते म्हणजे काय? ही बँक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकते. पण जर       तुम्हाला पोल्ट्री व्यवसायाचा आणखी विस्तार करायचा असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत दीड लाख ते साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता.

      मुक्त संचार पद्धतीने कुक्कुट पालन करण्याचे फायदे

1 मजुरांवरील खर्च अणि खाद्यवरील खर्चा मधे बचत होते. फ़क्त नैसर्गिक शत्रु, कोल्हे, कुत्रे, मुंगुस यांपासून रक्षण करावे लागते.
2 सुधारित जातीचा कोंबड्या नैसर्गिकच स्वतःचे खाद्य शोधून पोट भरू शकतात. हे पक्षी परिसरामधे फिरून कीड़े, कोवळे गवत तसेच टाकाउ अन्न पदार्थ खाऊन जगतात.
3 सुधारित जातींचा कोंबड्या, गिरीराज, वनराज, RiR जाती कोंबड्या लवकर अंडी देण्यास सुरुवात करतात अणि जास्त अंडी देतात.
4 मुक्त संचार पद्धतिमधे कोंबड्या फ़क्त रात्री निवाऱ्यासाठी शेड मधे येतात. त्यामुळे स्वछता करने अत्यंत सोप् असते.

पोल्ट्री फार्म कसा बनवायचा

कुकुट पालन फार्म उंच ठिकाणी करावे.ज्या ठिकाणी खूप सूर्यप्रकाश असतो, खूप पाऊस पडतो, किंवा खूप उष्णता असते, अशा ठिकाणी पोल्ट्री फार्म बांधू नये.पोल्ट्री फार्मच्या वरच्या बाजूला म्हणजे गवत, पेंढा छप्पर म्हणून वापरावा.मुर्गी पालन फार्मचा मजला काँक्रिटचा बनवावा जेणेकरून उंदीर, साप त्यात छिद्र करू शकत नाहीत आणि कोंबड्यांना कोणतीही इजा होणार नाही.पोल्ट्री फार्मच्या भिंती सर्व बाजूंनी मजबूतप्रकारे कराव्यात. ते मजबूत असावे आणि त्यात हवाई देवाणघेवाण चांगली झाली पाहिजे.

कुकुट पालन उत्पन्न- आणि खर्च

शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या पिल्ला पासून सुरुवात करावी. एक दिवसाचे पिल्लू घेऊन ते अंडयावर येई पर्यंत अंदाजे 120 ते 150 रुपये खर्च होतो. अनेक शेतकरी सध्या असे उत्पन्न मिळवत देखील आहेत. गावरान अंडी उत्पादन हे उद्दीष्ट ठेवून कुक्कुट पालन करने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गावठी अंडया ला नेहमी चांगला दर मिळत आलेला आहे. आपल्या घरांत असलेल्या खुडूक गावठी कोंबडी खाली सुधारित जातींच्या कोंबडी ची अंडी उबवून अगदी स्वस्तात सुधारित गावरान पिल्ल निर्माण केलि जाऊ शकतात. सुधारित जातींच्या कोंबड्या जलद वजन वाढ आणि अधिक अंडी उत्पादन देतात तसेच उत्तम रोगप्रतिकार असल्याने परसात सहज संभाळता येतात. ज्यामुळे आपल्या आहारामध्ये चविष्ट आणि पौष्टिक मांस आणि अंडी येतात. त्यापुढे पक्षी आणि अंडी विक्री तुन अतिरिक्त पैसा देखील कमावता येतो

100 कोंबड्यांपैकी 60 ते 70 माद्या निघाल्यास 40 ते 45 अंडी अंदाजे दररोज मिळणे अपेक्षित आहे. बाजारात या अंडयाला 5 ते 8 रुपये दर मिळतो. येथे आपला एक अंडे तयार करायचा खर्च 2 ते 3 रूपये एवढा होतो.
-अंडीविक्रीतील उत्पन्नासोबतच उत्तम असे कोंबडी खत देखील मिळते. घरातील वाया गेलेले अन्न, भाजीपाला, धान्य किंवा आंतरपीक म्हणून घेतलेली मक्का यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च आणखी कमी करता येऊ शकतो.
-72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घेऊन नंतर हे पक्षी कत्तल केले जावेत. यावेळी सर्वसाधारण 150 ते 200 रूपयाना विकले जातात. हे अतिरिक्त उत्पन्न आणि अतिरिक्त नफा ठरतो.
-स्वछ पाणी, योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी गावरान कुक्कुटपालन हा अतिशय उत्तम असा व्यवसाय होउ शकतो.

www.digitalbaliraja.com

कुकुट पालन योजना अधिक माहिती करिता संपर्क:

मित्रांनो कुकुट पालन योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा नवीन योजना सुरू झालेली आहे का? याबद्दल माहिती करिता तुम्ही जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच तालुका पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधू शकतात.

By KARAN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *