कपाशीवरील लाल्या रोग

 

कापूस पिकावरील लाल्या रोग

नमस्कार शेतकरी बांधावर डिजिटल बळीराजाच्या वेबसाइटवर आपले स्वागत् आहे.आपणास माहित आहे की, कोणत्याही प्रकारची शेती केली त्यावर फवारणी  करताना कोणती काळजी घ्यावी लागणार आहे. याची संपूर्ण माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे. पिकावर पडणारे रोग कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल. व औषधांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान दुष्परिणाम होणार नाही.  याची काळजी घायवी लागणार आहे .

कपाशीवरील लाल्या रोग व नियंत्रण

भारतामध्ये कपाशीचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घेतात परंतु कपाशीची लागवड जास्त प्रमाणात असतानासुद्धा उत्पन्न कमी होण्याचे कारण म्हणजे लाल्या  या रोगामुळे पाने पिवळी पडतात व झाडावर पाणी खाली पडतात. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपणास योग्य औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे.

लाल्या रोग व लक्षणे 

कपाशीचे सुरवातीचे पाणी टोकाकडून कडीने पिवळसर पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर पानांमध्ये हिरवटपणा कमी होऊन  अँथोसायीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाणे लाल रंगाचे दिसू लागतात. झाडावर लाल पाणे शेवटी गळून पडतात. यामुळे कपाशीच्या झाडाची झीज होते . व त्याचाच परिणाम उत्पन्नावर होतो. झाडांना बोट कमी प्रमाणात लागतात.

कपाशीवर लाल्या रोग येण्याची कारणे

कपाशीवरील लाल्या रोग
कपाशीवरील लाल्या रोग

1) हलक्या जमिनीत कपाशीची लागवड केल्यास लाल्या रोग पटताना आपणास दिसते.

2) जमिनीत पाणी साचून राहिल्यास लाल्याची लक्षणे दिसतात.

3 प्रामुख्याने बोन्डे धरण्याच्या अवस्तेत असताना पानामध्ये नागाची जास्त गरज असते.

4)  परत परत एकच पीक दरवर्षी घेतल्यामुळे लाल्या रोग होतो. पाणी जुनी झाले की रंगहीन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

5 )तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला पानांच्या कडा पिवळ्या कालांतराने विटकरी होतात आणि मग संपूर्ण पान करपून नंतर पानांची गळ देखील होते. तसेच मॅग्नेशियम अन्नद्रव्याची  कमतरता असल्यास संपूर्ण पानाला लालसर पणा आलेला दिसतो. एकदा पाने लाल झाल्यानंतर ती पुन्हा हिरवी होत नाही आणि याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन उत्पादनावरती  होतो. सध्याच्या बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जातींमध्ये बोंड आळीला अटकाव करण्यासाठी चा गुणधर्म असतो. त्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात.  परिणामी जास्त बोंडाना जास्त प्रमाणात नत्राची गरज भासते व झाडास जमिनीतून आवश्यक त्या  नत्र न मिळाल्यास बोंडसाठी लागणाऱ्या नत्राची गरज पानातून भागवली जाते.  त्यामुळे पानांमधील नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.

6) लाल होण्याचे कारण तपासण्यासाठी, तळहातावर लाल पाने ठेवा आणि मुठ बंद करा आणि नंतर मुठ सोडा. जर पानांचे लहान तुकडे पडल्यास पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आहे असे समजावे तसेच मूठ उघडल्यास पान आपल्या तळहातावर तुकडे न होता सपाट राहिल्यास अन्नद्रव्ये कमतरता या कारणांमुळे ते लाल होत आहे असे समजावे. जर रात्रीचे तापमान २१ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी झाले तर पाने पुन्हा लाल होण्यास सुरूवात होते.

7)लाल प्रभामंडलाने वेढलेल्या पानांवर तपकिरी किंवा राखाडी ठिपके देठावरील लांबलचक लाल-जांभळ्या कॅंकर्समुळे वरील पाने कोमेजतात आणि मरतात. आणि बीपासून नुकतेच तयार झालेले रोप पाने विल्टिंग कडा क्लोरोटिक आणि नंतर होतात. जुनी झाडे कोमेजणे आणि पाने क्लोरोसिसची लक्षणे दर्शवितात कोमेजणे सामान्यत हळूहळू असते. परंतु उन्हाळ्याच्या जोरदार पावसानंतर उच्चारले जाऊ शकते. जर संसर्ग गंभीर असेल तर झाडे खुंटतात आणि मरतात. संक्रमित वनस्पतींची रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली विकृत होते आणि स्टेम कापून दिसू शकते.

 

लाल्या  रोगावरील उपाय

लाल्या रोग
लाल्या रोग

योग्य पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे. पाणी साचल्यास त्वरित चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

शिफारस केल्याप्रमाणे खतांच्या योग्य मात्रा द्याव्यात कोरडवाहू साठी नत्राची मात्रा दोन वेळा द्यावी आणि बघायची साठी तीन वेळा विभागून देणे अतिशय आवश्‍यक असते.

लाल्याची लक्षणे दिसताच 10 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात 2 ते 3 फवारण्या द्याव्यात. किंवा 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा क्लो थिनियाडीन (50 टक्के) एक ग्रॅम किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.

झाडाला स्ट्रेस असते तर अशा वेळी काय करायचं आपल्याला डीपीसी दोन टक्के डीपी फवारणी करायची.

भरपूर शेणखताचा पुरवठा, विवेकी सिंचन पद्धती आणि संतुलित खते दिल्यास ही समस्या टाळता येते. जर हे हंगामात लवकर होत असेल तर पोषकांच्या सुधारणेने समस्येचे निवारण केले जाऊ शकते.

आवश्यक असल्यास एस्कॉर्बिक अॅसिड ५०० पीपीएम + पीएमए १० पीपीएम फवारणी करावी.  शेतकर्यांनी शेतातील कोणत्याही सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता जाणून घेण्यासाठी, माती परीक्षण प्रयोगशाळांमध्ये माती परीक्षण करून घ्यावे.

ताण आणि वाडीच्या टप्प्याप्रमाणे सेंद्रिय खते देणे झाडास फायदेशीर असतात जर हंगामात उशिरा पाने लाल होणे सुरू झाले त्यात बहुतेक घटकामुळे प्रक्रिया सुरू झाली. तर जैविक नियंत्रणाची गरज नाही.

साधारणतः पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाचा कालावधी काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे ही पाने लाल पडू शकतात.

कपाशीला बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.

माहिती आवाढल्यास नकीच शेर करा अधिक माहितीसाठी www.digitalbaliraj.com 

By KARAN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *