शेळीपालन व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायातून भरपूर नफा कमावता येतो. शेतीसोबतच शेळीपालनही अगदी सहज करता येते एकूण शेतकऱ्यांपैकी 70 टक्के शेतकरी हे लहान व अल्पभूधारक आहेत बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेतीतून खात्री उत्पन्नाची हमी देणारी शेती अथवा शेती पूर्वक व्यवसायाची गरज आहे पशु व्यवसायामध्ये शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यास खात्रीशीर उत्पन्न मिळवून देऊ शकतो सन 2019 च्या पशुधन गुणोत्तर भारतात 148.88 दशलक्ष शेळ्या होत्या त्यापैकी महाराष्ट्रात दहा पॉईंट सात दशलक्ष शेळ्या होत्या दरवर्षी 36 टक्के शेळ्याची कत्तल होतं असली तरी शेळ्यांची संख्या दरवर्षी साधारणपणे 3.5 टक्क्यांनी वाढत आहे शेळीपालनास भांडवल गुंतवणूक कमी लागते शेळीपालनास शेळ्यांना जागा कमी लागते त्यामुळे निवऱ्याकरता कमी खर्च येतो शेळी व्यवसाय ही शेतकऱ्यांची बचत बँक किंवा एटीएम आहे गरज पडल्यास त्वरित काही शाळा विकून पैसा केला जाऊ शकतो शेळीपालनामुळे उत्पन्नात वाढ होते गोमासाची बंदी असल्याने शेळीच्या मासाची जास्त मागणी आहे शेळीच्या शरीराचे सर्व भाग उपयोगात आणले जातात
Table of Contents
शेळी पालन करण्यासाठी जागेची निवड
जागा ही मुख्य वाहतुकीच्या रस्त्यापासून शक्यतो एक ते दीड किलोमीटर अंतरावर असावी जागा मार्केट पासून लांब नसावी जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी व्हावा दवाखाना जवळच असावा 24 तास विजेची सोय असावी पाळण्याची उपलब्ध विहीर किंवा बोरवेल असावे शेळी साठी 24 तास पाण्याची उपलब्ध असावी औद्योगिक वसाहती अथवा दूषित हवा व पाणी यापासून दूर असावे
गोठ्याची जागा बिन पिकाची उंचावर पाण्याचा सहज निचारा होणारी मुरमाड असावी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करता येईल असे नियोजन असावे
गोठ्याच्या व्यवस्थापनात प्रामुख्याने मलमूत्राचा नीट निचरा होण्याची काळजी घ्यावी, गोठा कोरडा राहण्यासाठी चुन्याच्या भुकटीचा वापर करावा, गोठा दररोज झाडून घ्यावा तसेच गोठ्यातील खाचखळगे वेळच्यावेळी भरून काढावेत.
गोचीड, पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिन्यातून १ ते २ वेळा गरजेनुसार गोठा स्वच्छ करुन गोचीड व पिसवांचे नियंत्रण करावे.
शेळ्यांचा गोठा / शेड
आपल्याला किती शेळ्या ठेवायच्या याचा विस्तार केल्यास आणखी किती शेळ्या मावतील हे पक्के करावे गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश येईल हवा खेळती राहील तसेच पावसाची झाड आत येणार नाही अशी अवस्था असावी भिंती व जमीन यामध्ये ओलावा राहणार नाही व गोठा धुतलेले पाणी चारा पिकात जाईल अशी अवस्था असावी शक्यतो शाळेचे संपर्कात लोखंडी वस्तू येणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी पार्टीचे हे लाकडाचेच असावे आणि खाद्य व पाळण्यासाठी भांडी प्लास्टिकची असावी
मुख्य गोठा यामध्ये वेगवेगळे कप्पे करून शेळ्यांच्या गटवारीनुसार म्हणजे दुखत्या भाकड गाभण वाहिलेल्या ठाण्यातूत झालेली तीन महिन्यावर पिल्ले सहा महिन्यावरील व नर व मादी करडे यांची व्यवस्था असावी
आजारी शेळ्यांसाठी वेगळी अवस्था असावी आवश्यक खुराक चारा साठवण्यासाठी गोदाम शेळ्यांची चढ उतार करण्यासाठी धक्का बायोगॅस युनिट असावे
गवत अथवा पेंड्यापासून साकारली छप्पर केल्यास आगीपासून सुरक्षित व पावसाळ्यात गळणारे नसावे गोट्याच्या बाहेर वेगवेगळ्या गटाप्रमाणे तारेच्या कुंपणाने बंदिस्त असलेली जागा असावी त्यावर छत असण्याची गरज नाही मोकळी जागा ही शेळ्यांना आवश्यकतेनुसार स्वच्छ हवा घेता यावी यासाठी असावी खेड्याची लांबी पूर्व पश्चिम असावी पूर्व पश्चिम बाजूकडील भिंती पूर्ण छतापर्यंत पूर्ण बांधून घ्याव्यात तर दक्षिण उत्तरेकडील बाजू मशीन पर्यंत बांधून घ्याव्यात
शेळ्यांसाठी चारा
साधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते. शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूण घास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी; त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुशाचा वापर करावा
शेळ्यांच्या जाती
शेळीपालन करा डिजिटल पद्धतीने seli palan kara digital padhatine
भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते.
शेळीच्या करडांसाठी प्रथिनयुक्त खुराक
प्रथिनयुक्त खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 18 टक्के इतके व एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण 75 टक्के इतके असावे.
शेळीपासून वेगळे केलेल्या पिलास उत्तम वाढीसाठी अधिक पोषणतत्त्वांची गरज असते. अशी पोषणतत्त्वे/ अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी करडांना दूध पाजणे बंद करण्याआधीपासूनच प्रथिनयुक्त खुराक दिला जातो.
प्रथिनयुक्त खुराक देण्याचे फायदे
प्रथिनयुक्त खाद्य देण्यामुळे शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांचे वजन वाढीसाठी विशेषतः जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. सदर खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 2 टक्के इतके असते.
कमी वयात विक्री करण्याइतपत करडांचे वजन वाढते.
वसंत ऋतूमध्ये जन्मलेल्या (21 मार्च ते 22 जून) पिलांचे उन्हाळ्यातील उष्णतेमुळे येणारा ताण कमी होण्यास मदत होते.
त्यामुळे उन्हाळ्यातही करडांचे वजन वाढण्यासही मदत होऊन नफ्यामध्ये वाढ होण्यास मदत होते.
शेळीपासून पिलास वेगळे केल्यास पिलावर एक प्रकारचा ताण येतो.
प्रथिनयुक्त खाद्य पिलास शेळीपासून वेगळे करण्यापूर्वीपासून दिल्यामुळे पिलांवर असा ताण येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच या
शेळयांचे व्यवस्थापन कसे करावे
शेळयांच्या संख्येच्या ३ ते ४ टक्के पैदाशीचे बोकड ठेवावे म्हणजेच २५ ते ३० शेळयांना १ बोकड हे प्रमाण ठेवावे.
दर दोन वर्षांनी शेळयामधील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.
गाभण / दुधाळ शेळयांना आणि पैदाशीच्या बोकडांना पैदास काळात त्यांच्या वजनानुसार अतिरिक्त हिरवाचारा, वाळलेला चारा व खुराक देण्यांत यावा.
सर्व शेळयांना नजिकच्या पशुधन विकास अधिका-यांच्या सल्ल्याने लसीकरण आणि जंतप्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करावा.
गोचीड, उवा इत्यादी बाहय किटकांच्या प्रतिबंधासाठी किटकप्रतिबंधक औषध फवारणी करावी.
बंदिस्त शेळी पालनाचे फायदे
शेळी आकाराने लहान असल्यामुळे जागा कमी लागते.
जागेचा व बांधकामास खर्च कमी येतो
औषध उपचारावरील खर्च कमी होतो
शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
शेळ्यांचे खत उत्तम असते.
आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.
या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. निवड पद्धतीने जुळी करडे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे.
संगमनेरी शेळी –
या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी असतात. या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 40 ते 50 टक्के आहे. ही जात दूध आणि मांसासाठी वापरली जाते.
शेळी आजार व उपचार शेळ्यांचे आरोग्य आणि लसीकरण
शेळ्यांच्या रोगाची लक्षणे सारखीच असल्यामुळे रोगाचे अचूक निदान होत नाही आजारी शेळ्या रोग झाल्यावर औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे रोग झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोग व कृमीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी
आजारी शेळीची लक्षणे
हालचाल व भूक मंदावते
डोळे निस्तवेच खोलवर आत गेल्यासारखे दिसतात
कळपात वेगळे राहतात
रवंत करत नाहीत मुस्कट कोरडे राहते
विचलित होत नाही एकाच वस्तूकडे टक लावून पाहतात
डोळे निस्त वेज खोल व आत गेल्यासारखे दिसतात
कातळावरील केस ताठ उभे राहतात केसाची तकाकी कमी होते
डोळ्याच्या कोपऱ्यातून पाणी व घाण बाहेर पडते
लघवीचा रंग गडद होऊन उग्र वास येतो
शरीर क्रियाच्या प्रमाणात बदल दिसून येतात
निरोगी शेळ्याच्या शरीर क्रियाची प्रमाणके खालील प्रमाणे
एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.
एका वर्षामध्ये या जातीच्या #नराचे 25 किलो आणि #मादीचे 21 किलो वजन भरते.
#करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो,
तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते.
पूर्ण वाढ झालेल्या #बोकडाचे सरासरी 50 किलो, तर
#शेळीचे वजन 32 किलोंपर्यंत भरते.
ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते.
#जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
शेळीच्या दुधाचे महत्त्व
हृदयाचे आजार कमी करते वजनावर नियंत्रण करून पोटाचे विकार कमी करायला शेळीचे दूध उत्पादक आहे हाडे मजबूत होतात
शेळीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशिअम आणि क्लोरीनचे प्रमाण जास्त असते, सोडियम आणि सल्फरचे प्रमाण कमी असते
शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त फॅटग्लोब्युल्स असतात.
केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आवश्यक आहे. यामुळे केस गळणे थांबते. शेळीच्या दुधात दोन्ही जीवनसत्त्वे असतात. ते घेतल्याने केस गळती कमी होऊ शकते.
रोग प्रतिकारशक्ती बूस्टर -शेळीच्या दुधात सेलेनियम नावाचे खनिजे अधिक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे दूध एड्स ग्रस्त रूग्णांना दिले जाते कारण त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.
चेसाठी चांगले- शेळीच्या दुधातील पीएच पातळीचे प्रमाण त्वचेच्या पीएच पातळी इतके असतात. याचे सेवन केल्यामुळे सुरकुत्या कमी होतात, तसेच चेहर्यावरील डाग देखील कमी होतात.
शेळ्यांचाविमा
4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.
अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.
शेळीपालन अनुदान
महाराष्ट्र शासनाने कमी व्याजावर बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शेळी पालन कर्ज योजना 2023 सुरू केली असून या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी मदत दिली जाणार आहे. या योजनेचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्यात पशुसंवर्धनाला चालना मिळावी आणि शेळीपालनातून मिळणाऱ्या नफ्यासह राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.
शेळीपालन करा डिजिटल पद्धतीने seli palan kara digital padhatine
शेळी पालन अनुदान योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा?
महाराष्ट्रात शेळी पालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागेल.
महाराष्ट्र शेळीपालन कर्जाविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेतून किंवा ग्रामपंचायतीमधून फॉर्म मिळवू शकता.
यानंतर, तुम्हाला फोरममध्ये नाव, पत्ता, बँक खाते, फोटो अशी तुमची माहिती द्यावी लागेल.
सर्व माहिती दिल्यानंतर तुमचा फॉर्म संबंधित विभागात जमा करा.
यानंतर तुम्हाला शेळी पालन पोषण योजना 2023 चा लाभ मिळेल.
शेळी शेती अनुदान योजनेचा लाभ
योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्यातील नागरिक शेळीपालन करून शेळीचे दूध विकू शकतात.
यानंतर, तुम्हाला हे देखील माहित असेल की बकरीचा वापर मांस म्हणून केला जातो. यातूनही राज्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
शेळीपालनात गुंतवणूक खूप कमी आहे परंतु शेळीपालनातून होणारा नफा खूप जास्त असेल.
शेळीपालनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
योजनेच्या माध्यमातून व्याजावर सबसिडी दिली जाईल, ज्यामुळे कर्जाची परतफेड करणे खूप सोपे होईल.
महाराष्ट्र शेळीपालन योजना आवश्यक पात्रता
अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तुम्ही शेळी पालन अनुदान योजनेंतर्गत इतर कोणतेही कर्ज घेतले असले तरीही तुम्ही योजनेसाठी पात्र आहात.
असे सर्व शेतकरी ज्यांची स्वतःची जमीन नाही ते या योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मिळणार आहे.
राज्यातील शेतकरी इतर प्रकारच्या नागरी योजनांसाठी पात्र असतील.
अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.