फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्या (Updated 2023) फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे फार्मर प्रोड्यूसर कंपनी संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्या (Updated 2023) फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे फार्मर प्रोड्यूसर कंपनी संपूर्ण माहिती मराठी

फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे|फार्मर प्रोड्यूसर कंपनी संपूर्ण माहिती मराठी|शेतकरी उत्पादक कंपनी योजना|शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रक्रिया pdf|फार्मर प्रोड्यूसर कंपनी|farmer producer company in marathi|शेतकरी उत्पादक कंपनी

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्या  (FPC) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा  २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे. ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकर्‍यांचे गट. समूह एकत्र येवून शेतकर्‍यांसाठी काम करतात.कायद्यानुसार या कंपनीचे संचालक, सदस्य हे शेतकरी बांधवच असतात. तसेच कंपनीचे सर्व व्यवस्थापन सुद्धा शेतकरी बांधवाद्वारे करण्यात येते. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी १० शेतकरी बांधव असणे गरजेचे आहे. यामधील ५ संचालक तर ५ सदस्य म्हणून निवडावे. यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकर्‍यांना शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करायची असेल त्याचाकडे जमीन असणे गरजेचे आहे. स्वतः च्या नावावर ७/१२ असणे गरजेचे. किंवा आपल्या आई वडिलांच्या नावाने ७/१२ असेल तरी चालतो.

Table of Contents

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा  माध्यमातून तुम्ही खालील व्यवसाय करू शकता {फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे}

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्या नाबार्ड बँक महाराष्ट्र शासन
केंद्र शासन यांचीं कर्ज योजनेचा लाभ घ्या. 25% ते 35% टक्के सबसिडी सुद्धा मिळते.
तसेच तुम्ही शेतकरी लोकांना सभासद बनवू शकता.यातून जमा झालेला पैसा शेतीशी निगडित वेगवेगळ्या कोणत्याही व्यवसायात लावू शकता.

पोल्ट्री फार्मिंग
गोट फार्मिंग
डेअरी फार्मिंग,
मिल्क प्रोजेक्ट
फिश प्रोजेक्ट,
मशरूम प्रोजेक्ट
अंडी प्रोडक्शन,
fmcg प्रोडक्ट प्रोडक्शन
आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट, बायोफ्युल डेवलपमेंट प्लांट
ॲग्री आणि रिटेल मार्ट
ऑरगॅनिक फार्मिंग
व इतर आग्री प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग
कोल्ड स्टोरवगे
सीएस फार्मिंग
किसान सेवा केंद्र
किसान कॉल सेंटर
सेल्स आणि मार्केटिंग
महिला व पुरुष गटांना प्रशिक्षण देणे
पापड उद्योग
फुलाची शेती
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे
करार पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना पिकासाठी मोफत मार्गदर्शन करणे
शेतकऱ्यांना क्रेडीटवर रोपे अवजारे बी-बियाणे
खत-बियाणे देणे
स्वच्छ भारत अभियान राबवणे
प्रक्रिया उद्योग व विक्री
आठवडी बाजार
जलयुक्त शिवार अभियान
स्वच्छ भारत अभियान
आमचं गाव आमचा विकास अभियान
समृद्ध शेतकरी अभियान
उन्नत शेतकरी अभियान
आरोग्य विकास उपक्रम
वृक्षरोपण अभियान इत्यादी
वर्षभर हमीभाव माल खरेदी- विक्री करणे.

फार्मर प्रोड्यूसर कंपनी  कायद्या अंतर्गत  काय करू शकते?{फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे}

  1. उत्पादन, प्रोक्यूरमेन्ट, हार्वेस्टिंग सीडींग, पूलींग, हाताळणी, विपणन, मार्केटिंग, विक्री, निर्यात आयात, करू शकता. कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करून घेऊ शकतात.
  2. उत्पादन:- समजा एखाद्या कंपनीच्या 10 सभासदांनी 100 एकर हर बना आणि सोयाबीनची लागवड केली आहे
  3. हार्वेस्टिंग:- कंपनी स्वतः खर्चाने किंवा शेतकरी स्वतः खर्चाने कंपनीद्वारा दिलेल्या हार्वेस्टिंग ने मालाची काढणी करेल
  4. प्रॉक्यूरमेंट:- कंपनी या सभासदाकडून एका ठराविक दराने हरभरा आणि सोयाबीन खरेदी करेल
  5. पुलिंग,ग्रेटिंग:- कंपनी सर्व माल एका ठिकाणी जमा करून त्या मालाची ग्रेटिंग करेल तसेच कंपनी या मालावर प्रोसेसिंग देखील करू शकल.
    समजा हरभरा पासून ग्रेटिंग केलेले हरभरा डाळ आणि बेसन निर्माण केले तर सोयाबीन पासून ग्रेटींग केलेला सोयाबीन पनीर सोयाबीन तेल तसेच इतर पदार्थ तयार करेल

 

  1. विपणन विक्री:-   कंपनी या मालाची विक्री मार्केटिंग करेल या विक्रीतून येणारा नफा पुन्हा शेतकरी वाटून घेतील या ठिकाणी जर कंपनीचा कारभार हा दूरदृष्टी आणि सक्षम हातात असेल तर ती कंपनी परिसरातून भरपूर प्रमाणावर खरेदी करू शकते.
  • शेतकऱ्याचा माल चांगल्या दराने दलाली हमाली वराई आडत कमिशन ट्रान्सपोर्ट यांच्या शिवाय खरेदी केली जाईल. यात ते हवा तो दर त्यांना मिळू शकतो.
    अर्थात बाजारात प्रोसेसिंग केलेल्या मालाचा दर कसा ठेवतात त्यावर खरेदी दर अवलंबून असतील मालावर प्रक्रिया होऊन जो काही नफा राहील त्यात देखील वाटा राहील.

 

  • जर कंपनीला वाटते की शेतकऱ्यांना तीन-चार महिने शेती वापरण्याचे भाडे म्हणून दोन-तीन हजार रुपये देखील द्यायचे (अर्थात हे कंपनी व्यवस्थापन ठरवणार आहे आणि कंपनीकडे किती खेळते भांडवल राहते त्यावरून ते ठरेल) तर कंपनी देऊ शकते.
    शेतकरी जमिनीचे भाडे मालाला चांगला दर प्रक्रिया केल्यानंतर विक्री होऊन मिळणारा नफा प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार विक्रीसाठी रोजगार तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळू शकतात.

 

  • प्रक्रिया उद्योगाची सबसिडी बँकेकडून कर्ज तसेच इतर फायदे मिळतील.यात पीक लागवडीसाठी कर्जासाठी सहकारी क्षेत्रातून होणारे कर्ज वाटप यातून मिळणारी कर्ज जास्त योग्य ठरेल.केवळ कंपनीच्या प्रक्रिया आणि खेळते भांडवल यांसाठी बँकेकडून कर्ज घेणे जास्त योग्य ठरेल.आपल्या परिसरात जर शासनाने फूडपार्क किंवा मेगा फूड पार्क स्थापन केली असेल तर त्याठिकाणी शेती उत्पादक कंपनीची निर्माण व्यवस्था असावी लागते. हे फूड पार्क फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन मेगा फूड पार्क फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन राज्य शासनाने निर्देशित केलेले फळप्रक्रिया उद्योग पार्क, Sezs ज्यात फळ प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे आणि केंद्र शासनाद्वारे निर्देशित इतर फूड पार्क येथे जागा असावी लागते या योजनेत नाबार्ड एकूण खर्चाच्या 75% कर्ज उपलब्ध करून देते.
फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे
फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे

 

फार्मर प्रोड्यूसर कंपनी योजनेत खालील बाबीचा समावेश होतो.

फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करा

  1. फळे भाजीपाला मशरूम प्लांटेशन पिके आणि इतर
  2. फळपिके दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोंबडी आणि इतर
  3. मास मासे व इतर
  4. समुद्री प्राणी कडधान्य तृणधान्य आणि तेलबिया औषधीवनस्पती जंगलापासून निर्मित वन्यऔषधी कंजूमर फूड प्रॉडक्ट जसे बिक्री इतर रेडी टू इट उत्पादने कार्बोनेट ड्रिंक्स नॉन अल्कोहोलिक
    बिव्हेरेजेस एनर्जी ड्रिंक पॅकेजड ड्रिंक वॉटर सॉफ्ट ड्रिंक इत्यादी
    फुट फ्लेवर्स फूट कलर्स मसाले हेल्थ फूड हेल्थ ड्रिंक्स इत्यादी आणि इतर सर्व प्रकल्प जे केंद्रशासन फळप्रक्रिया म्हणून मान्यता देते.

 

फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी स्थापन करावी फार्मर प्रोड्यूसर कंपनी संपूर्ण माहिती  मराठी

 

  • कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्यांची वास्तविक शेती आहे. किंवा दोन आणि त्यापेक्षा जास्त संस्थां ज्या वास्तविक शेती उत्पादन करतात.
    किंवा याचा 10 किंवा त्यापेक्षा जास्तचा समजून या कायद्याच्या कलम 581ब मध्ये निर्देशित केलेल्या कृतीसाठी एकत्र येऊन कंपनी कायद्यात अंतर्गत शेती उत्पादन कंपनी स्थापन करू शकतो.
  • जर कंपनी रजिस्टार यांच्या कायद्याच्या पालनाबाबत समाधान झाले तर अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसात कंपनी स्थापन केल्याची पूर्तता झाल्याचा दाखला मिळतो म्हणजेच कंपनी स्थापन होते.
  • अशा कंपनीच्या सभासदाचे दायित्व लबिलिटी ही कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये निर्देशित केल्यानुसार त्यांनी गुंतवलेल्या शेअर कॅपिटल इतकी मर्यादित राहते. पेड किंवा अनपेड शेअर कॅपिटल कंपनी कशा पद्धतीने कार्य करेल कंपनी स्थापन करीत असताना ज्या सभासदांना घेऊन ती स्थापन झालेली आहे त्यातून किंवा बाहेरून कंपनी एक सी.ई.ओ (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर )ची नेमणूक करतात कंपनीसाठी सभासदातून एक चेअरमन ची नेमणूक करता येते.
  • कंपनीचे शेअर्स हे ट्रान्सफरेबल नसतात सभासदांनी सभासद होताना तीन महिन्याच्या आत सभासदाच्या मृत्यूनंतर कोणास त्याचे सभासदत्व ट्रान्सफर होईल हे कळणे गरजेचे असते.
  • कंपनी बोर्डाने वर्षातून एकदा जनरल मीटिंग घेणे बंधनकारक आहे त्या मीटिंगची वेळ ठिकाण आणि इतर बाबी सभासदांना कळवणे बंधनकारक आहे.
  • कंपनीत किमान 5 तर जास्तीत जास्त 15 डायरेक्टर असावेत कंपनीच्या मेमोरेंडम आणि असोसिएशन वर सही करतील ते डायरेक्टर असतात. फार्मिंग प्रोडूसर कंपनी ही शेतकरी मिळूनच स्थापन करू शकतात.

 

फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPO)नोंदणी करण्यासाठी लाणारीआवश्यक कागदपत्रे

farmer producer company in marathi

कमीत कमी 5 शेतकरी लोकांचे संचालक मंडळ
कमीत कमी 5 लाख शेअर्स कॅपिटल जे तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या बँक खात्यात ठेवावी लागते.
स्वतःची किंवा भाड्याची जागा 10 शेतकरी लोकांचे खालील डॉक्युमेंट

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • एक फोटो
  • सातबारा
  • बँक स्टेटमेंट
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • ऑफिस ऍड्रेस साठी लाईट बिल किंवा रेंट एग्रीमेंट

फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्ट्रेशन/नोंदणी कालावधी कमीत कमी 30ते 40 दिवस

 

कंपनीची नोंदणी झाल्यावर करावयाची कामे:-

farmer producer company in marathi

कमीत कमी दोन स्वाक्षरीने चालणारे बँक खाते उघडणे.

कार्यालया करिता विज पुरवठा, फर्निचर व नाम फलक उपलब्ध करावे लागते.

लाख रुपयांचे भाग भांडवल असणा-या कंपनीच्या नोंदणी करिता खालील खर्च लागतो.

 

अनु. क्र.                       बाब रक्कम 
अ) कपनीचे नाव मिळण्या करिता अर्ज करणे 1000/-
ब)  डिजिटल स्वाक्षरी 10,000/-
क)  स्टॅम्प ड्यूटी (MOA) 500/-
स्टॅम्प ड्यूटी (AOA) 2000/-
ड)  नोंदणी शुल्क  2500/-
ई) सीए किंवा सीएच ची फी कन्सलटन्सी फी 10,000/-
एकूण रू. 26,000/-

 

फार्मर प्रोड्युसर कंपनी ला तुम्ही खालील दिल्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची नावे देऊ शकता:-

उदाहरणार्थ:-👇

1) सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

2) प्रतिभा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

3) भूमित्र सेल्फ रिलायन्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

4) श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड

5) कृषी उत्नाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

6) सावित्रीबाई फुले शेळी पालक फार्मिंग प्रोडूसर कंपनी लिमिटेड

7) कुशल अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

8) कडेगाव तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

9) यशशिवनी अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड

 

फार्मर प्रोड्युसर कंपनीची नोंदणी प्रक्रिया:-

farmer producer company in marathi

डिजिटेल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) :

कमीत कमी एका संचालकाचे किंवा आध्यक्षाचे डिजिटेल सिग्नेचर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्वाक्षरीत करण्या करिता कंपनीने आपला एक प्रतिनिधी अधिकृत करणे आवश्यक आहे. हे प्रमाण पत्र मिळविण्या करिता आपणाला कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेब साईटवर उपलब्ध असून प्रणालीकरण यंत्रणेकडे तो ऑनलाईन भरावा लागतो..

डायरेक्ट आयर्डेन्टफिकेशन नंबर (DIN):

सदर क्रमांक हा कंपनी अफेअर कक्ष नोइडा उत्तर प्रदेश येथून ऑनलाईन मिळतो, त्या करिता पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, पतदान ओळखा पत्र किंवा पासपोटू आवश्यक आहे. या करिता ऑनलाईन अर्ज कार्पोरेट अफेअर्स मंत्रालया कडे करावा लागतो.

उत्पादक कपनीचे नाव निश्चित करणे

उत्पादक कंपनीचे नाव B उत्पादक कंपनी लिमिटेड असे ठेवावे लागते. कंपनीच्या मुख्य उद्देशाला अनुसरून असलेल्या 2 नावापैकी एक नाव निवडावे लागते. ते नाव या पूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीच्या नावासारखे नसावे. या करिता कंपनी निबंधकाकडे रू.1000/- चे शुल्क भरून e-form (A)s नमुन्यात http://www.mca.gov.in वर लॉगिन करावे लागते व डिजिटल स्वाक्षरी असणा-या व्यक्तीने अर्ज कराव लागतो. प्रस्तावित 2 नाव पैकी एखादे नाव उपलब्ध नसेल तर कंपनी निबंधका कडून तसे कळविले जाते त्या नंतर अर्जदाराने नवीन नाव सुचवायचे असते. एकदा निश्चित झालेले कंपनी चे नाव १/३ साधारण सभेच्या व २/३ संचालक मंडळाच्या बहुमताने ठराव पारित केल्यास व तसा अर्ज निबंधकाकडे केल्यास अर्जा सोबत र. 1000/- चे शुल्क भरून व 2 नीवन नावे प्रसावित करून बदलता येते.

मेमोरेन्डम ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (MOA व AOA) ही कागद पत्रे कागदाच्या दोन्ही बाजूवर प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो व त्या वर प्रवर्तकने स्वतःचे, वडिलांचे नाव, धंदा, पत्त व धारण केलेले शेअर्स ची संख्या ही माहिती भरून दिनांकासह स्वाक्षरी करायची असते.

 

रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे (ROC) नोंदणी करीता सादर करावयाची कागदपत्रे :-

 

रजिस्ट्रार यांचे कंपनीचे नाव उपलबध असल्या बाबतचे पत्र. (Name Approval Letter)

मेमोरन्डम ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ असोसीयशन (MOA व AOA) च्या स्टॅम्प लावलेल्या व स्वाक्षरी केलेल्या प्रती.

Form 32 Spice+ मध्ये कंपनीच्या नोंदणी कत कार्यालयाचा पूर्ण पत्ता.

Form INC 32 Spice+ मध्ये कंपनीच्या संचालकांची माहिती व कंपनी निर्मिती संबंधी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करीत असल्याचे डिक्लेरेशन.

फॉर्म INC -9 मध्ये संचालकांचे सम्मतीपत्र.

 

Certificate of Incorporation सर्टिफिकेट फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे

 

सर्टिफिकेट ऑफ इनकार्पोरेशन : सर्व आवश्यक कागद पत्रांचे पुर्तता झाली असे निंबधकाचे समाधान झाल्यास ३० दिवसाचे आत नोंदणी प्रमाण पत्र देण्यात येते. कंपनीला सामायिक शिक्का असतो. कंपनीचे संचालक मंडख किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा बाहेरील व्यक्तीची आपल्या वतीने काम करण्या करीता निवड करते त्यापा पॉवर ऑफ अटर्णी किंवा मुख्यत्यापत्र म्हणता. पॉवर ऑफ अटर्णी करिता कंपनी सेक्रेटरीची निवड करण्यात येते या करिता पॉवर ऑफ अॅटर्णी फार्म, स्टॅम्प लाऊन व संचालकांची स्वाक्षरी घेऊन दिला जातो.

 

फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे फायदे

 

  1. तृणधान्य कडधान्य व इतर शेती उत्पादने जसे की गहू ज्वारी बाजरी डाळी शेंगदाणे सोयाबीन तूर मूग हरभरा इत्यादी शेतकरी ग्रेडिंग करून पॅकिंग करून सरळ मार्केटमध्ये विकू शकतील.
    शेतकरी स्वतः उत्पादनावर प्रक्रिया करू शकतील.
  2. नाबार्डच्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्त देखील अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळू शकतो.
  3. कंपनी स्वतःदेखील माळ सरळ ग्राहकास विकू शकते.
  4. शेतकरी त्यांच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाहीत ती तक्रार कायमस्वरूपी बंद होईल.
  5. शहरातील आपलेच भाऊबंध यांना सरळ शेतक-यांकडुन माल मिळेल
  6. गावातच रोजगार निर्माण होईल
  7. नैसर्गिक आपत्तीपासून येणारे संकट कमी होईल
  8. फार्मिंग प्रोडूसर कंपनी मुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच आहे. गरज आहे ती केवळ त्याचा फायदा करून घेण्याची. सर्वात आधी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की शेतकरी जे पिकवतो ते खाल्ल्या शिवाय जग जगू शकत नाही. त्यामुळे जगाची चावी आपल्या हातात आहे ही जाण असणे गरजेचे आहे. सरळ उत्पादक आता गिऱ्हाईकशी बोलणार असल्याने त्या वेळेस हे असे सत्य मनात ठेवून सर्व मार्केटिंग जाहिराती वगैरे डिझाईन करता येतील

 

कंपनी चालवण्यासाठी लागणारे लायसन्स (Optional)

  • FSSA फुड लायसन
  • MSME उद्योग आधार
  • IEC एक्स्पोर्ट इम्पोर्ट
  • GST रजिस्ट्रेशन
  • ISO 9001:2015 सर्टिफिकेट
  • ISO 22000 सर्टिफिकेट
  • ISI मार्क सर्टिफिकेट
    BRC सर्टिफिकेट
  • Ayush सर्टिफिकेट
  • Halal सर्टिफिकेट
  • APEDA सर्टिफिकेट
  • ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन
  • पेटेंट रजिस्ट्रेशन

 

उत्पादक कंपनी नोंदणी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

भारतात उत्पादक कंपनी तयार करण्यासाठी किती संचालक आवश्यक आहेत?

किमान पाच संचालक आवश्यक आहेत.

तो एक ऑफलाइन प्रक्रिया आहे का?

NO. ऑनलाइन केले जाऊ शकते.

भारतात एक उत्पादक कंपनी तयार करण्यासाठी आवश्यक किमान भांडवल काय आहे?

उत्पादक कंपनी स्थापन  करण्यासाठी  किमान  रु. 5,00,000 / – आवश्यक आहे

उत्पादक कंपनी रजिस्टर कशी करावी?

उत्पादक कंपनी नोंदणी करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या चरणांचे अनुसरण करा.

उत्पादक कंपनी रजिस्टर करण्यासाठी किती वेळ लागतो?

सुमारे  35 ते 40 दिवस घेते.

 

Leave a Comment