रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी| Shet Jamin Mojani |शेत जमीन मोजणी अर्ज online| PDF फॉर्म संपूर्ण माहिती - डिजिटल बळीराजा

रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी| Shet Jamin Mojani |शेत जमीन मोजणी अर्ज online| PDF फॉर्म संपूर्ण माहिती

रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी |Rover Machine Set Jamin Mojani| rover machine for land measurement| PDF फॉर्म संपूर्ण माहिती |सरकारी जमीन मोजणी संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज rover machine for land measurement रोवर मशीनद्वारे जमिनीची मोजणीची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या गोष्टीसाठी रोवर मशीनद्वारे जमिनीची मोजणी सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव रोवर मशीनद्वारे जमिनीची मोजणी केली जाणार आहे. तसेच कधी रोवर मशीनद्वारे जमिनीची मोजणी लाभ घेता येणार नाही. rover machine for land measurement लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या कारणास्तव लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा , संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

“अनेकदा शेत जमीन मोजणी संदर्भात शेतकऱ्यांना विविधअशा अडचणींचा सामना करावा लागतो. भावकीचे आपापसात बांधावरून वाद होत असतात. जमिनीत मोजण्यासाठी कालावधी लागत असतो तो कालावधी यापुढे लागणार नाही. कारण यापुढे रोवर मशीन उपलब्ध झाले आहे.अतितातडीच्या जमीन मोजणीसाठी अर्ज केला तरी देखील लवकर जमीन मोजणी होत नाही. शिवाय जमीन मोजणीत अचूकता अनेकदा पाहावयास मिळत नाही. मात्र आता जमीन मोजणी मध्ये अचूकता आणि हे कार्य जलद होण्यासाठी रोवर मशीनच्या माध्यमातून जमीन मोजणी प्रक्रिया राज्यभर सुरू केली जात आहे.रोव्हर या मशीन मुळे घंटो का काम मिनिट मे होणार आहे. चालू हप्त्यात हे मशीन भूमी अभिलेखा विभागाला उपलब्ध झाले आहे. या मशीनमुळे जमिनीचे मोजणी ही अर्धा तासात होणार आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजना 2023

रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी रोव्हर मशीन म्हणजे काय?

महाराष्ट्रात ७७ ठिकाणी उपग्रह केंद्र (कन्टिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स सिस्टिम) स्थापन केले आहे. या केंद्राचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. तसेच रोव्हर हा एक मूव्हिंग ऑब्जेट आहे. जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो. रोव्हरचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे मोजणी अचूक होईल. शेतकऱ्याने वहिवाटीच्या खुणा दाखवल्यावर रोव्हर त्याठिकाणच रीडिंग एका मिनिटात घेईल.

लेक लाडकी योजना 2023

रोवर मशीनद्वारे शेत जमीन मोजणी वैशिष्ट्य 

  • अचूकपणा व पारदर्शीपणा हे या मशीनचे वैशिष्ट्य आहे. 
  • रोवर मशीनने अचूकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नानाविध तंत्रज्ञानाचा वापर केला आहे
    महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेखा विभागाला या मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत
  • रोवर मशीन मुळे हेक्टर ची मोजणी लवकरात लवकर होते.
  • शासनाने ४० कोटी रुपये खर्च करून ८०० रोव्हर खरेदी केले आहे
  • शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल

रोवर मशीनद्वारे शेत जमीन मोजणीचे उद्देश्य

  1. रोवर मशीनद्वारे  2 वर्षांत प्रत्येक सर्व्हेअरकडे रोव्हर मशीन देण्याचं उद्दिष्ट आहे.
  2. रोवर मशीनद्वारे शेत जमीन मोजणी राज्यातील कोणतीही मोजणी रोव्हरच्या साहाय्यानं करता येईल. किंवा ईटीस मशीनचं रोव्हरमध्ये रुपांतर करून ती करता येईल.
    अनेकदा शेतकऱ्यांची तक्रार असते की त्यांचा बांध कोरून जमीन बळकवण्यात आले आहे,आता मात्र रोवर मशीनद्वारे अशा शेतकऱ्यांची तक्रार आता दूर होणार आहे.
  3. बांध कोरण्यासारख्या घटनेवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
  4. भाऊबंदकी मधील वाद यामुळे संपुष्टात येण्यास मदत होईल
  5. भूकंप झाला, पूर आला, दगड खूना वाहून गेल्या, तरी रोवर मशीनद्वारेअक्षांश रेखांश असल्यामुळे रोवर मशीनद्वारे तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या हद्दी या साहाय्यानं दाखवू शकतात. 

अटल पेन्शन योजना

रोवर मशीनद्वारे शेत जमीन मोजणीचे फायदे

  • रोव्हर हा एक मोहीम सेट आहे जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो. रोव्हर कनेक्शन सॅटॅलाइटशी असतं त्यामुळे कुठे सुद्धा गेल्यावर पूर्व वर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूक ता दर्शवतो हे रोवर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी जाऊ शकता.
  • मोजणीसाठी लागणारा कालावधी हा कमी होणार 
  • रोवर मशीन मुळे हेक्टर ची मोजणी लवकरात लवकर होते.
    शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल
  • बांध कोरणारे उघडे पडतील.  समोरच्यानं किती बांध कोरला हे स्पष्ट होईल 

रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी

रोवर मशीनद्वारे शेत जमीन मोजणीची फी (Jamin Mojani Fees)

मोजणीचा प्रकार मोजणीची फी
साधी मोजणी १,०००/- रुपये प्रति हेक्टर
तातडीची मोजणी २,०००/- रुपये प्रति हेक्‍टर
अतितातडीची मोजणी ३,०००/- रुपये प्रति हेक्‍टर
अति अतितातडीची मोजणी १२,०००/- रुपये प्रति हेक्‍टर

महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र 2023

रोवर मशीनद्वारे शेत जमिनी मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • जमिनीचा चालू महिन्यातील सातबारा उतारा
  • जमिनीच्या चतु: सीमेचा तलाठी कार्यालयाकडून दिला गेलेला दाखलाजमीन मोजणी ही साधी मोजणी, तातडीची मोजणी किंवा अति तातडीची मोजणी यापैकी जी मोजणी तुम्हाला करावयाची आहे, त्याचा उल्लेख अर्जामध्ये व त्यानुसार मोजणीचे भरलेले बँक चलन.
  • जमिनीच्या ज्या बाजूला वाद आहे, त्याबाबत तपशील .
  • तसेच तुमच्या ज्या जमिनीची मोजणी करायची आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा
  • जमीन मोजणीसाठी अर्ज, जमिनीची हद्द कायम करणे, पोट हिश्श्याची मोजणी, वहिवाटीप्रमाणे क्षेत्र दर्शवणे अथवा अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शवणे यापैकी ज्या साठी अर्ज करावयाचा आहे ते नमूद करणे.

रोवर मशीनद्वारे शेत जमिनी मोजणीसाठी अर्ज कसा भरायचा

या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाका.
पहिल्या पर्याय: “अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता” याविषयी माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.

दुसरा पर्याय:मोजणीच्या प्रकारासमोर “मोजणीचा कालावधी” आणि “उद्देश” लिहायचा आहे. त्यापुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे.

तिसरा पर्याय: फीची रक्कम.मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.

चौथ्या पर्याय: ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.

पाचव्या पर्याय:लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता” लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.

सहाव्या पर्याय:अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन” दिलेलं आहे.

शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.

जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.

ही सगळी माहिती भरून झाली की कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

एकदा का अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत फीड (दाखल) केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.

त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

रोवर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

जमीन मोजणीचा अर्ज

शासकीय जमीन मोजणीचा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेण्यासाठी  जमीन मोजणी अर्ज या लिंक वर क्लिक करा. 

FAQ

जमीन मोजणीची आवश्यकता काय?

शेतकऱ्याकडून बांध पोकरून जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे प्रत्यक्षात किती क्षेत्रावर अतिक्रमण केले गेलेले आहे हे निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून सरकारी मोजणी केली जाते.

जमीन मोजणी साठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला  जमीन मोजणी साठी अर्ज करायचा असेल, तर तूम्हाला तुमच्या तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित अर्ज सादर करावा लागेल.

रोव्हर मशीन म्हणजे नेमकं काय?

महाराष्ट्रात 77 ठिकाणी CORS (continuously operational reference station) स्थापन केलेले आहेत. यांचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. आणि रोव्हर हा एक मूव्हिंग ऑब्जेट आहे, जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो.

निष्कर्ष,

आशा करतो कि रोवर मशीनद्वारे शेत जमिनी मोजणी   सर्व माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले  रोवर मशीनद्वारे शेत जमिनी मोजणी संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील  लाभ घेऊ शकतील.

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Leave a Comment