औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

 

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते . रेशीम व्यवसाय हे रोजगाराचे उत्तम साधन आहे. आज भारतात रेशीम व्यवसाय हा बहुतांशी ग्रामीण भागात केला जातो आणि लाखो शेतकरी या व्यवसायातून नफा कमावतात. हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये रेशीम किड्यांचे संगोपन करून रेशीम उत्पादन करता येते. यातून खूप चांगला नफा मिळू शकतो. हा कृषी आधारित उद्योग आहे. भारतातील अनेक लोक या उद्योगातून आपला उदरनिर्वाह करत आहेत.रेशीम उद्योगाला भारतातील प्रमुख कुटीर उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. रेशीम किड्यांचे संगोपन करण्यासाठी तुती, सायकॅमोर, पलाश इत्यादी झाडे लावणे, कीटकांचे संगोपन करणे, रेशीम साफ करणे, सूत तयार करणे, कापड तयार करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. हा व्यवसाय ग्रामीण भागात सहज सुरू करता येतो

फॅशनच्या या युगात रेशमापासून बनवलेल्या कपड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे बाजारात त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा प्रकारे, हा व्यवसाय तुमच्या उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय आहे आणि अशा उद्योगाला जास्त भांडवल लागत नाही. जर तुम्हालाही रेशीम किटकांचे संगोपन करायचे असेल तर रेशीम किटक संगोपन कसे करावे? त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे दिली जात आहे.

 

Table of Contents

औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

 

रेशीम  व्यवसाय  म्हणजे काय((What is Rashim Business?)  

रेशीम व्यवसाय हा कुटीर व्यवसायाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कोकून नावाची अंडी रेशीम किडे घालतात. त्याच्याकडून कच्चा रेशीम तयार होतो. या व्यवसायाला रेशीम व्यवसाय म्हणतात. हा व्यवसाय रेशीम किड्यांच्या संगोपनापासून रेशीम साफ करणे, सूत कापणे आणि ज्यावर रेशीम किडे वाढतात ते माहूत, पलाश, गुलार इ.

हा व्यवसाय ग्रामीण भागात कमी खर्चात सुरू करता येतो आणि तो पर्यावरणपूरकही आहे. हा केवळ सध्याचा व्यवसाय नाही तर शतकानुशतके चालत आलेला व्यवसाय आहे.

आज भारत रेशीम उत्पादनात चीननंतर जगातील दुसरा सर्वांत मोठा रेशीम उत्पादक देश बनला आहे. 

रेशीम हा एक प्रकारचा पतला आणि चमकदार धागा असतो. ज्याचा पासून कपडे विणले जातात, हा धागा फिलामेंटस सेल मध्ये राहणाऱ्या कीटक पासून तयार केला जातो.रेशीम उत्पादनासाठी रेशीम उत्पादक जीवांचे संगोपन मोठ्या प्रमाणात करावे लागते. रेशीमच्या वाढत्या मागणीमुळे तो आता एक उद्योग बनला आहे, ज्याला आपण कृषी आधारित कुटीर उद्योग म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग अगदी कमी खर्चात उभारता येतो आणि हे काम तुम्ही शेतीच्या कामांबरोबरच घरातील इतर कामंही अगदी सहज करू शकता. आपल्या देशातील ६० लाखांहून अधिक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीम किड्यांचे पालन करतात.हा एक बारीक चमकदार फायबरचा प्रकार आहे, ज्यापासून कपडे विणले जातात. हे फिलामेंटस सेलमध्ये राहणाऱ्या वर्म्सपासून तयार केले जाते. रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळावे लागतात, याला रेशीमपालन किंवा रेशीम कीटक पालन म्हणतात.रेशीम किड्यांचे संगोपन करून रेशीम तयार करावे लागते. त्यातून चांगला नफाही मिळतो.

रेशीम उद्योगासाठी किती जमीन लागते

  1. औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन  या व्यवसाय करिता लागणाऱ्या जमिनीचा जर आपण विचार करतो तर याला 1 यकर शेती लागेल व 1700 sqfoot शेड, ज्यामध्ये आपण रेशीम अळ्यांचे संगोपन करू.
  2. हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शेतीची आवश्कता या करिता आहे, औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन  मध्ये आपल्याला तुती या रोपाची लागवड करावी लागते, या तुतीच्या पाल्या वर आपल्याला रेशीम किडे जगवावे लागतात, हा पाला त्यांना खावू घालावा लागतो.
  3. तुतीची लागवड व व्यवस्थापन करण्यासाठी चांगली कसदार जमीन लागते. तुतीच्या रोपांची लागवड करताना दोन रोपंमधील अंतर चार ते पाच फूट ठेवावे लागते, यामुळे तुतीची वाढ चांगल्या प्रकारे होते.
  4. तूती ही जंगली झाड असल्यामुळे या झाडाला पाणी कमी प्रमाणात लागते. जेवढे पाणी एक एकर संत्रा बागेला लागते तेवढ्या पाण्यात तीन एकर तुती आरामात जगते.
  5. या झाडांनाऔद्योगिक पद्धतीने पाणी देण्यासाठी आपण ठिबक सिंचन वापरू शकतो. ज्यामुळे आपले पाणी कमीत कमी लागते किंवा पाणी मुबलक प्रमाणात असेल तर आपण पारंपरिक पटाचे पाणी देऊ शकता.
  6. तुती ही लागवडीपासून 45 दिवसात कापणीला येऊन जाते आपण याचे अडीच ते तीन महिन्यातच उत्पन्न घेवु शकतो.
  7. एक वेळ आपण तुटीची लागवड केली की लावलेली तुती ही आपण 10 वर्षापर्यंत आरामात ठेवू शकतो, 10 वर्ष आपल्याला तुटीची पुन्हा लागवड करण्याची गरज नाही भासणार.

 

रेशीम उद्योग महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्टे:

रेशीम उद्योगाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • समूह आधारावर रेशीम उद्योगाचा सर्वांगीण विकास.
  • तुती उत्पादन आणि रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढवणे.
  • शेतकऱ्यांपर्यंत नाविन्यपूर्ण रेशीम तंत्रज्ञान आणणे.
  • रेशीम योजनेचे परिणाम आणि यश याबद्दल व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहित करणे.
  • नवीन तंत्रज्ञानाने रेशीम धाग्याच्या उत्पादनात गुणात्मक सुधारणा घडवून आणणे. कौशल्य सुधारणा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सतत प्रयत्न.
  • शीम उद्योगाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी व इतर गरीब घटकातील लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
  • कोकून उद्योग अंतर्गत नैसर्गिक प्रजाती आणि पाळीव प्रजातींच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि या कामाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढवणे.
  • योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लाभार्थ्यांची निवड करून गट तयार करून कामे पार पाडणे

 

रेशीम शेतीचे प्रकार (Types Of Silk Farming )

रेशीम शेतीचे प्रामुख्याने ६ प्रकार पडतात.

  1. एरी या अरंडी रेशीम
  2. मूंगा रेशीम
  3. गैर शहतूती रेशीम
  4. तसर (कोसा) रेशीम
  5. ओक तसर रेशीम
  6. शहतूती रेशीम
औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन
औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

 

 

 

रेशीम उद्योगासाठी लागणारे साहित्य

 

रेशीम किडे ठेवण्यासाठी शेड तयार करावी लागते. यासाठी, घराची कोणतीही रिकामी खोली वापरली जाऊ शकते, जिथे बांबू किंवा इतर साहित्याचा वापर करून चटईसारखी रँक तयार केली जाऊ शकते, जी रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी हलविली जाऊ शकते.  जिथे रेशीम किडे ठेवले जात आहेत.

तेथून अंडी पुंज मिळाले की प्रश्न येतो ते अंडी पुंज ठेवायचा तर या करिता आपल्याला तयार करावे लागेल एक शेड, ज्याचा खर्च हा 200 ते 300 अंडकोश जर आपण ठेवत असू तर येईल 2 ते 2.5 लाख रुपये. हे शेड आपल्याला 1700 sqfoot चे तयार करावे लागे

शेडचा आकार हा एका एकर तुती साठी 65 फूट लांब आणि 34 फूट रुंद असावा.

एक बॅच निघाल्या नंतर दुसरी बॅच त्या शेडमध्ये आणण्यापूर्वी संपूर्ण शेड व ज्या रॅक मध्ये आपण अळ्यांना ठेवतो ते सर्व निर्जंतुक करून घ्याव.

शेड अशा प्रकारे बांधावे जेणेकरून त्या शेड मध्ये इतर प्राणी किंवा कीटक येणार नाही.

आपण या अळ्यांना रॅक मध्ये ठेवतो या रॅक मध्ये कधी कधी काही अळ्या मरतात सुद्धा तर या मेलेल्या अळ्यांना मुंग्या लागायची भीती राहते ज्यामुळे जिवंत अळ्यांना सुध्धा मुंग्या लागू शकतात.

 

कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर त्याच्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, रेशीम किटक संगोपनासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देत ​​आहोत, ती पुढीलप्रमाणे 

  • ट्रायपॉड्स (हे लाकूड किंवा बांबूचे बनलेले असतात)
  • जाळी – (लहान कापडाची जाळी, ज्यातून उरलेली पाने आणि कीटकांची विष्ठा साफ केली जाते)
  • पाने कापण्यासाठी चाकू आवश्यक आहे.
  • हायग्रोमीटर आवश्यक आहे.
  • उष्णता उत्पादक A कूलर.

 

रेशीम कीटक पालनासाठी हवामान

राज्यातील सर्व जिल्ह्यातील हवामान कमी / अधिक प्रमाणात तुती लागवड़ीकरिता पोषक असून, रेशम कीटक संगोपनाकरिता लागणारे २५ ते २८ अंश सेंन्सियस तापमान व ६५ ते ८५ टक्कें आर्द्रता राज्यात मिळू शकते.

 

तुती बेणे तयार करणे:

तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.

 

औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन
औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया: 

  • तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी. 
  •  थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत. 
  •  बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात. 
  •  तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.

पट्टा पध्दतीच्या तुती लागवड

  1. या पध्दतीमुळे झाडाची सं’या मोठया प्रमाणात वाढते
  2. बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो.
  3. शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते. 
  4. मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते.
  5. तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते. 
  6. आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते. 
  7.  कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो.  

 

तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी

लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. 

जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.

तुतीची लागवड 5 द 3 द2 किंवा 6 द 2 द 1 अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी.

तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही

लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.

 

खत व्यवस्थापन 

गांडुळ खत वापरतांना घ्यावयाची काळजी:

  1. गांडूळ खत रासायनिक खतामध्ये मिश्रण करुन टाकु नये. 
  2. रासायनिक खत वापरण्याआधी 1 महिन्या अगोदर गांडुळ खत तुती झाडांना द्यावे. 
  3. गांडुळ खतामध्ये शेणखत, कम्पोस्ट खत मिसळून टाकल्यास त्यांचा चांगला फायदा होतो. 
  4. गांडुळखत वापरल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल. 
  5. पहिल्या वर्षी नविन तुती लागवडीङ्ढकरीता डिसेंबर महिण्यात गांडुळ खत वापरावे

 

रासायनिक खते:

  1. तुती लागवड केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात कलामांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी 24 किलो नत्र, स्पुरद, पालाश रिंग पध्दतीने तुती झाडांचय बाजुला गोल खड्डे करुन द्यावे
  2. दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र रिंग पध्दतीने द्यावा
  3.  प्रत्येक पिकाच्या छाटणीनंतर अंरमशागत झालेनंतर कोंब फुटतेवेळी 14 ते 21 व्या दिवशी देण्यात यावे.

 

 

औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन
औद्योगिक पद्धतीने रेशीम व तुती लागवड व व्यवस्थापन

 

तुतीच्या झाडांवरील रोग व नियंत्रण

कलमावरील बुरशी :

अतिपाण्यामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे सालीच्या आतील बाजूस काळी बुरशी येते, यामुळे झाडास फुटवा येत नाही किंवा आलेला फुटवा जळून जातो. 

उपाय: 

बुरशी नाशक द्रावणात तुती कलमे लावण्यापूर्वी 5-10 मिनिटे बुडवावीत व मग लागवडीस वापरावीत. प्रादर्भाव जास्त असेल तर फुटवा झालेवर देखील झाडांवर औषधे फवारावे.

वाळवी/उदई: 

हलक्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव होतो हलक्या जमिनीत लागवड केली की त्या जमिनीत मोठया प्रमाणात वाळवीचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेणखतातून जमिनीत उदई अथवा उदडीचा प्रादुर्भाव होतो. उदई कोवळी कांडी कुरतडून खातात व झाडांची मर वाढते

उपाय:

  1. लागवड करतांना क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात, कांडया (कलमे) बुडवून लावावेत. 
  2. फुटवा झाल्यावर फयुरॉडॉन औषध मुळांजवळ दिल्यास वाळवी अथवा उदईचा त्रास होत

 

मिरची लागवड व खत व्यवस्थापन

 

शेळीपालन करा डिजिटल पद्धतीने

 

झाडांवर आढळून येणारी कीड:

टूक्रा (बोकडया): 

लक्षणे: 

  1. शेंडयाच्या पानाचा आकार बदलतो. 
  2. पाने कोमजल्यासारखी दिसतात किंवा घडया पडून आकसतात. 
  3. ज्या फांदीवर टूक्रा आढळतो, तो भाग जाड किंवा चपटा बनतो. 
  4. पाने गडद हिरव्या रंगाची बनतात.

 

उपाय: 

  1. टूक्रा रोग असलेले झाडाचे शेंडे तोडून जाळून टाकावेत. 
  2. 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात (10 लिअर पाण्यात 50 ग्रॅम साबण टाकवा) 0.2 टक्के डी.डी.व्ही.पी. (न्युआन 2 मि.ली. 1 लिटर पाणी) चे द्रावण तयार करुन झाडांवर फवारावे. 
  3. क्रिप्सोलिनस मौंटेजरीचे 100 प्रौढ किटक 10 ते 12 हजार तुतीच्या झाडामध्ये सोडावेत.

 

पोखरा मधून रेशीम लागवड व अनुदान योजना

 

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोखरा प्रकल्पातून सुद्धा तृतीय रोपवाटिका कृती लागवड कीटक संगोपन ग्रह व संगोपन साहित्य खरेदीसाठी सुद्धा भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत रेशीम लागवडीसाठी अनुदान देण्यात आलेला आहे

 ही योजना महा रेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून त्यासाठी 15 नोव्हेंबर पासून १५ डिसेंबर पर्यंत हे अभियान कार्यान्वित असणार आहे याच अंतर्गत आपणास अर्ज करावा लागणार आहे  रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून एकूण तीन लाख 42 हजार रुपये अनुदान देण्यात येते 

 

 योजनेचा लाभ कोणाला घेता येणार 

 

  •  अनुसूचित जाती जमाती
  • भटक्या जमाती
  • भटक्या उमुक्त जमाती
  • दारिद्र रेषेखालील कुटुंब
  • महिला प्राधान्य कुटुंब
  • शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंब
  • बुसुधार योजनेचे लाभार्थी
  • इंद्रा आवास योजनेचे लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत अनिवासी
  • कृषी माफी योजना सन 2010 नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी या योजनेत लाभ घेऊ शकतात

 

 रेशीम लागवड अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

 

  1.  जमिनीचा 7/12 व8 अ उतारा
  2.  राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  3.  अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  4.  ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अथवा मतदान कार्ड
  5.  मनरेगाच्या जॉब करण्याची झेरॉक्स प्रत

लाभार्थी :

  • रेशीम उद्योग अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • या योजनेच्या अंतर्गत पूर्व मंजुरीच्या वेळेपासून प्रकल्पाचे बांधकाम करावे आणि तुती लागवड पूर्ण झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत ऑनलाइन अनुदानाची विनंती करावी.
  • रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी, या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी ग्राम स्तरांवर गठीत केलेल्या समितीच्या उपस्थितीत करावी.
  • रेशीम उद्योग क्षेत्रातील अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. त्या बरोबर खरेदी देयकाची मूळ प्रत, आणि खरेदी समितीच्या खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व-साक्षांकित केले पाहिजे आणि ऑनलाइन अपलोड केले पाहिजे.
  • लाभार्थ्यांनी हा व्यवसाय किमान 3 वर्षे करणे आवश्यक आहे.

 

कुकुट पालन कर्ज योजना

 

औद्योगिक पद्धतीने  रेशीम उद्योगातून इतर फायदे

  1. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
  2. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते
  3.  रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
  4. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
  5. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
  6. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
  7. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
  8. रेशीम किड्यांचे विष्ठा शुगर ग्रास सारख्या दुग्धजन्य जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येते. यामुळे 1 ते 1.5 लिटर दूध वाढते.
  9. वाळलेल्या तुतीच्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात. हे खत म्हणून देखील वापरले जाऊ शकते.
  10. संगोपनात वापरत असलेला पेंढा बनवून त्यावर मश्रूमची लागवड करता येते आणि नंतर पेंढ्यापासून गांडूळ खत तयार करता येते.
  11. रेशीम उद्योगातून देशाला परकीय चलन मिळते आणि देशाच्या विकासाला हातभार लागतो.
  12. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
  13. एक तुतीचे झाड सुमारे 15 वर्षे उत्पन्न देत राहते.

 

 

Leave a Comment