सोयाबीन पिवळे पडणे व उपाय|Soyabin pivale padne upay)लक्षणे,कारणे,उपाय संपूर्ण माहिती मराठी - डिजिटल बळीराजा

सोयाबीन पिवळे पडणे व उपाय|Soyabin pivale padne upay)लक्षणे,कारणे,उपाय संपूर्ण माहिती मराठी

नमस्कार मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिवळे पडणे व उपाय (Soyabin pivale padne upay) या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत .  सोयाबीन पिवळे पडणेमध्ये अन्न द्रव्य कमतरता दिसत आहे. ह्या मुळे शेतकऱ्याचे सोयाबीन पिवळे पडणे ह्या सारखी समस्या येत आहे.काही शेतकऱ्यांन मध्ये असा गैरसमज आहे कि हा वायरस, बुरशी किवी येल्लो मोसॅक आहे.तर शेतकरी मित्रानो तस काही हि नसून हि समस्याअन्न द्रव्य यांच्या कमतरते मुळे येत आहे.मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन पिवळे पडल्याची माहिती घ्यायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला. राज्यात सोयाबीन पिकाची बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे. कमी पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत असून, पीक पिवळे पडत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून समजते. पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची प्रमुख कारणे

 

सोयाबीन पिवळे होण्याचे प्रमुख कारणे(Soyabin pivale padne upay)

मुख्यतः यामध्ये झिंक, फेरस, आणी पोटॅश ची कमतरता आहे.ह्यामुळे तुमचे सोयाबीन पिवळे पडणे अशी समस्या होत आहे. हि समस्या मुख्यतः कमी किंवा जास्त पावसामुळे येते. किंवा चुनखडी युक्त जमिनी मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो.

  • अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो. परिमाणी पिक वाढीकरिता आवश्यक असणारे पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता उद्भवल्याने सोयाबीन पिक पिवळे पडते.
  • अधिक पावसामुळे जमिनीमध्ये अधिक ओलावा साचून राहून जमीन संपृक्त होते. अशा स्थितीत हवा खेळती न राहल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यांना जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेता येत नाही. परिणामी शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.
  • सततच्या पावसामुळे शेतीत ओलावा कायम असल्यामुळे डवरणी करण्यास अडचण निर्माण होते. अति ओलाव्याने पाने पिवळी पडतात.
  • ज्या जमिनीचा सामू अधिक आम्लधर्मीय असतो, अशा शेतातील पाने जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळेसुद्धा पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येते.
  • जमिनीतील अन्नद्रव्ये उदा. नत्र, लोह व पालाश यांची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात. मात्र, पानाच्या शिरा ह्या हिरव्याच दिसतात.
  • सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्य प्रकाशामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. यामुळे पाने पिवळी पडतात. यामध्ये शिरासुद्धा पिवळ्या होतात.
  • अत्याधिक ओलावा असल्याने नत्राच्या गाठी तयार होत नाहीत. नत्राची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात.
    रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात.
  • पिवळा मोझॅक या रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र पानावर हिरव्या- पिवळ्या चट्ट्यांचे मिश्रण आढळते. मुळकूज व मर या रोगाच्या प्रादुभार्वाने देखील पाने पिवळी पडतात. मात्र यामध्ये पाने झाडाच्या खालच्या दिशेने झुकतात. असे झाड उपटल्यास सहज हातात येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव या किडीचा सोयाबीन पिकावर प्रमुख्याने पेरणीनंतर १०-१५ दिवसांनी दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला शेंड्या कडील तीन पाने पिवळी होवून झाड सुकायला सुरुवात होते. पिवळ्या रंगाची लहानशी २ मि.मी लांब अळी खोडामध्ये पोखरत जाते. त्यामुळे रोपाला अन्नद्रव्ये व जल पुरवठा बंद होतो. झाडे पिवळी पडतात, सुकतात व मरतात.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 

सोयाबीन पिवळे होण्याचे लक्षणे

लोह (फेरस)या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल(वाहू न शकणारे) आहे.लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते.म्हणूनच,नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते,वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे:-लोह ची कमतरता विशेषत:कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते.वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह(फेरस)आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्यअसते. व्यवस्थापन:०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी .

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2023 महाराष्ट्र

 

Soyabin pivale padne upay

 

 

सोयाबीन पिवळे पडणे व उपाय

 

  1. सोयाबीन पेरणीकरिता मध्यम स्वरुपाची, भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी, उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली जमीन निवडावी. चोपण, क्षारपड व एकदम हलक्या जमिनीमध्ये पेरणी करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यंत असावा.
  2. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रीया केलेली असावी.
  3. अत्यल्प पाऊस झालेल्या किंवा पाऊस होवून बराच काळ लोटला असल्यास पिकास सिंचन देण्याची व्यवस्था करावी.
  4. अधिक पाऊस झालेल्या प्रदेशांमध्ये शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी.
  5. नत्राची कमतरता असल्यास युरिया ०२ टक्के (२० ग्रॅम प्रती लीटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.
  6. चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ५ ग्रॅम अधिक २.५ ग्रॅम कळीचा चुना प्रती लीटर पाणी या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये केल्यास लोहाची कमतरता पिकास भासणार नाही.
  7. पिवळा मोझॅक रोग व्यवस्थापन पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यासोबतच निंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मिली प्रती लीटर याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर ३० दिवसांनी पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी त्यानंतर १० दिवसांनी करावी

 

व्हाट्सअप वर जॉईन होण्यासाठी 

हे पण वाचा

ठिबक सिंचन अनुदान योजना 

शेततळे व मत्स्यपालन व्यवसाय

बांबू लागवड कशी करावी

दूध डेअरी व्यवसाय

महाराष्ट्र शबरी आदिवासी घरकुल योजना 2023

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Leave a Comment