नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल बळीराजा मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डिजिटल पद्धतीने ऊस लागवड व व्यवस्थापन या विषयी माहिती घेणार आहोत डिजिटल पद्धतीने ऊस कशी लागवड करता येईल याची सविस्तर माहिती घेणार आहोत भारतात ऊस हेहे महत्त्वाचे व्यावसायिक पिकापैकी एक पीक आहे आणि नगदी पीक म्हणून याच एक मुख स्थान आहे सन १९८०-८१ मध्ये उसाची उत्पादकता हेक्टरी ९० टनापेक्षा जास्त होती. परंतु, अनेक कारणामुळे ती घटत जाऊन २०११-१२ मध्ये हेक्टरी ७७ टनांपर्यंत खाली आली आहे. ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब व कारखानास्तरावरील नियोजन या बाबी समन्वयाने करणे आवश्यक आहे. उसात साखर आणि गुळाचे मुख्य स्रोत आहे भारत हा साखरेच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते. तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते.
जमिनीची लागवड आणि पूर्व मशागत :
उसाचे पीक शेतात दीर्घकाळ राहते, म्हणून पूर्वमशागत चांगली करणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पीक काढणीनंतर ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची उभी आडवी अशी दोन वेळा नांगरट करावी. ढेकळे फोडून आवश्यकतेनुसार १ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्व हंगामी लागवडी पूर्वी शक्य असल्यास ताग किंवा धेंच्या या सारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावी. हे शक्य नसल्यास २५ टन चांगले कुजलेले शेणखत आणि त्याबरोबर 60 किलो प्रति हेक्टरी गंधक जमिनीत मिसळावे. उसाची लागवड करताना भारी जमिनीसाठी दोन सऱ्यातील अंतर १२० सेमी ते १५० सेमी ठेऊन सरीची लांबी उतारा नुसार २० ते ४० मी. ठेवावी. उस पट्ट्या मध्ये काही प्रगतशील शेतकरी दोन सर्यामधील अंतर १५० सेमी ठेऊन लागवड करून विक्रमी उत्पादन घेत आहेत.

उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन स-यातील अंतर १०० ते १२० सें.मी व भारी जमिनीसाठी १२० ते १५० सें.मी. ठेवून सरीचा लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीसाठी ९०-१८० सें.मी पध्दतीचा अवलंब करावा. ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागण करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३०. सें.मी ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व वाफशावर कोली घेऊन लागण करावी. दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन टिप-यांमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावी. यासाठी ओल्या पध्दतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी १०,००० व मध्यम जमिनीसाठी १२,००० टिपरी लागतात.
एक डोळा रोपांपासून ऊस लागवड
तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात. यासाठी ९ ते १० महिने वयाचे चांगल्या बेणेमळ्यातील शुध्द, निरोगी बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे. ऊस बेणे लागणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली.मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्यरोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो. एक महिन्याच्या रोपांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी उसाची रोपे ३०-४० दिवस कोकोपीटमध्ये वाढविलेली असतात. त्यामुळे आपणास शुध्द निरोगी ऊस रोपे निवडून घेता येतात. निकृष्ट रोपे लागवडीस न वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पीक वाढते, एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळतेआडसाली उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. एकडोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करताना, ४ फूट अंतरावर सऱ्या काढून दोन रोपांमधील अंतर २ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी १३.५ ते १४ हजार रोपे लागतील.बेणे मळ्यात वाढविलेले १० ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्टया शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. उस बेणे लागवणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली. मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्य रोग आणि खवले किडीचा बंदोबस्त होतो. लागणीसाठी बेणे मळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ़ होते.

उसाच्या जाती
पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी फुले २६५, को. ८६0३२ (निरा) या मध्यम पक्वतेच्या आणि को. ९४o१२ (सावित्री), को. सी. ६७१, व्हीएसआय- ४३४ आणि याचवर्षी पूर्वप्रसारित करण्यात आलेला उसाचा नवीन वाण एमएस- १ooo१ या लवकर पक्व होणा-या सुधारित जातींची निवड करावी. वरील वाणाबरोबरच कोल्हापूर विभागासाठी को. ९२oo५ या वाणाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.
खत व्यवस्थापन
पुर्व हंगामी खत व्यवस्थापण
पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी योग्य वेळ आहे त्या वेळेला खत देणे गरजेचं राहतं.
शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास, ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे.
रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खते मुळाच्या सानिध्यात द्यावीत. युरियाबरोबर निंबोळी पेंडीचा १ः६ या प्रमाणात वापर करावा.
पुर्व हंगामी ऊस खत व्यवस्थापन करण्यासाठी 340:170:170 NPK पूर्वहंगामी ऊस लागवड केल्यानंतर ना खत व्यवस्थापन करणे गरजेचे राहतात यासाठी 340 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि पालाश 170 हेक्टरी देणे गरजेचं राहतं.
पूर्वहंगामी उसासाठी ५० ते ६० गाड्या चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्टखत टाकून जमिनीत मिसळावे
पाणी व्यवस्थापन:-
पूर्व हंगामी उसासाठी ३०० ते ३२५ हेक्टर सें.मी. पाण्याची गरज असते.
ऊस पिकासाठी हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) 18 ते 20 दिवसांनी, उन्हाळ्यात (मार्च ते जून) 8 ते 10 दिवसांनी आणि पावसाळ्यात (जुलै ते ऑक्टोबर) 12 ते 15 दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.
पाणी देताना दारे धरून पाणी द्यावे. उसाला शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन करावे.
मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात, त्यानंतर 10 सें.मी. खोलीच्या पाळ्या द्याव्यात.
अंतर मशागत :-
याऊस लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वापसावर असताना हेक्टरी ५ किलो अँट्रॅझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी एक किलो ५०० लीटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी
पीक ४ महिन्याचे होईपर्यत २ – ३ खुरपण्या कराव्यात .
कीड व रोग नियंत्रण :
उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्डची १० दिवसाच्या अंतराने आवश्यकते नुसार २-३ प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस हेक्टरी २.५ लि. ८०० लि. पाण्यात मिसळून जमीन वापस्यावर असताना सरीतून द्यावे. लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथरा, मायक्रोमस अशा मित्र कीटकांचे संवर्धन करावे. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर पंधरा दिवसांनी ऊस तोडणी पूर्वी १ महिन्या पर्यंत लावावीत.
खोडवा व्यवस्थापन
गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी, बुडखे मोकळे करुन पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत, छाटलेल्या बुडख्यावर ०.१ % टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू प्रति टन पाचटासाठी वापरावे व खोडवा पिकास पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर ५० टक्के रासायनिक खतांची शिफारशित मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या सहाय्याने बेटापासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फुट खोलीवर व दोन खड्ड्यामधील अंतर १ फूट ठेवून सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर १५ दिवसांचे आत द्यावी आणि उर्वरित ५० टक्के मात्रा याच पध्दतीने परंतु सरीच्या विरुध्द बाजूने १३५ दिवसांनी द्यावी.
उसाची तोडणी

- उसाची तोडणी पक्वता पाहून करावी.
- तोडणी पूर्वी पिकाचे पाणी १५ दिवस बंद करावे.
- तोडलेला ऊस ताबडतोब गळीतास पाठवावा.
- साधारणता पूर्व हंगामी उसाची १४-१५ महिन्यानंतर तोडणी करावी
ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 40 टक्के अनुदान
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी 192 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहेत व ही मंजुरी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
- सरकारनं आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
- ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.
- या निधीच्या माध्यमातून राज्यात नवीन 900 ऊस तोडणी यंत्र उपलब्ध होतील या यंत्रांचा लाभ हा वैयक्तिक शेतकरी, उद्योजक आणि साखर कारखान्यांना दिला जाणार आहे
- अनुदान हे व्यक्तिगत तसेच शेतकरी उत्पादक संस्था, खासगी आणि सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे.
- वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
- पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणं आवश्यक आहे.
उसाचे पाचट न जाळण्याचे फायदे
- पाचट ठेवल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते.
- जमिनीचा 1 ते 1.5 टन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्यामुळं जिवाणूंची संख्या वाढल्यानं खोडवा ऊसाच्या उत्पादनात वाढ होते
- पाचट ठेवल्यामुळं रासायनिक खतांची उपलब्धता होते.
- पाचट व्यवस्थापन केल्यामुळं लागणीच्या ऊसाला 95 तर खोडव्याचे ऊसाचे 83 टन एकरी उत्पादन मिळाले आहे. पाचट कुटी केल्यानंतर सेंद्रिय कर्बात वाढ होऊन जमिनीची सुपिकता वाढत आहे
सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस वाढीसाठी सरकार कटिबद्ध
- देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे सदस्य तसेच साखर कारखाना उद्योग तसेच इतर संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असणारे 5 लाख कामगार यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
- केंद्र सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे गेल्या 8 वर्षांत ऊस लागवड आणि साखर उद्योगाने मोठा पल्ला गाठला असून आता या क्षेत्राला स्वयं-शाश्वततेची पातळी गाठण्यात यश आले आहे
- वर्ष 2022-23 च्या म्हणजे येत्या साखर हंगामात, उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि अपेक्षित साखर उत्पादन यांच्यात होणारी वाढ लक्षात घेता, त्या हंगामात साखर कारखान्यांकडून 3600 लाख टन साखरेची खरेदी होईल आणि त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1,20,000 कोटी रुपयांचा भक्कम मोबदला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
- त्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (FRP) मंजुरी दिली आहे. 305 रुपये प्रति क्विंटल दर 10.25%, मूळ वसुलीसाठी, क्विंटलमागे 3.05 रुपये प्रीमियम प्रदान करते. 10.25% पेक्षा जास्त वसुलीतील प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.05 प्रति क्विंटल आणि एफआरपीमध्ये वसुलीतील प्रत्येक 0.1% घसरणीसाठी 3.05 रुपये प्रति क्विंटल कपात केली आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5%. पेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
गुऱ्हाळघर
- मध्यम स्वरूपाचं गुऱ्हाळघर उभारण्यासाठी जवळपास 15 ते 20 लाखांच्या पुढे भांडवल लागतं
- 15 ते 20 मजूर तिथे कामावर लागतात.
- 1 टन ऊस जर साखर कारखान्याला पाठवला तर त्यातून 3000 रुपये मिळतात. मात्र गुऱ्हाळघरामध्ये एक टन ऊस गाळला तर त्यातून 100 ते 120 किलो गूळ तयार होतो. हा सेंद्रिय पद्धतीचा, कोणत्याही रसायनाशिवाय बनवलेला गूळ आणि त्याच्या उत्पादनांना 120 रुपये किलोपर्यंत दर मिळतो.
- ऊस उत्पादनात अधिक नफा
- ऊसाला प्रति टन चार हजार रुपये दर मिळतो
- एक बेणे हे तीन वेळा वापरता येते.
- दर तीन वर्षांनी बेणे बदल करणे महत्त्वाचे असते
- बेणे पद्धतीने शेती करणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे
- रोपवाटिकेच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे
ऊस उत्पादनात भारताचा आर्थिक वाटा
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.
गेल्या पाच वर्षांत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांनी मिळून १११ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे, असे